Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raksha Bandhan 2026: ‘इको-फ्रेंडली’ राख्यांना विशेष पसंती! राखी बांधा आणि झाड लावा’, काय आहे विशेष उपक्रम?

जुन्या कापडाचे तुकडे, लोकर, कागद, धागे आणि मणी यांचा वापर करून घरच्या घरी राखी तयार करण्याकडेही काही कुटुंबांचा कल आहे. मुलांसाठी आयोजित कार्यशाळांमधून सर्जनशीलतेसोबत पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 25, 2026 | 07:46 PM
‘इको-फ्रेंडली’ राख्यांना विशेष पसंती

‘इको-फ्रेंडली’ राख्यांना विशेष पसंती

Follow Us
Follow Us:

राखीच्या धाग्यात पर्यावरणाची वीण
पुण्यात ‘इको-फ्रेंडली’ राख्यांना विशेष पसंती
घरच्या घरी राखी तयार करण्याकडेही काही कुटुंबांचा कल

सुनयना सोनवणे / पुणे: भावंडांच्या नात्याची वीण घट्ट करणाऱ्या राखीला यंदा पर्यावरण संवर्धनाची जोड मिळाली आहे. प्लास्टिक, कृत्रिम मणी आणि न विघटनारे साहित्य टाळून कापूस, ज्यूट, कागद, लाकूड, कापड आणि बियाण्यांपासून तयार केलेल्या राख्यांना ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. त्यामुळे मनगटावर बांधला जाणारा धागा आता निसर्गाशी नाते जोडण्याचे माध्यम ठरत आहे. शहरातील बाजारपेठांमध्ये पारंपरिक राख्यांसोबत पर्यावरणपूरक राख्यांचे (Raksha Bandhan) विविध प्रकार उपलब्ध आहेत. त्यामध्ये ‘राखी बांधा आणि झाड लावा’ ही संकल्पना विशेष लक्षवेधी ठरत आहे. वापरल्यानंतर राखी मातीत लावल्यास त्यातील बियाण्यांपासून रोप उगवावे, अशी या राख्यांची संकल्पना आहे.

कचरा कमी करण्याचा प्रयत्न 

रक्षाबंधनानंतर राख्या आणि त्यांचे प्लास्टिक पॅकेजिंग मोठ्या प्रमाणावर कचऱ्यात जाते. त्यामुळे यंदा कागदी पाकिटे, कापडी पिशव्या आणि पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर केला जात आहे. सजावटीसाठीही प्लास्टिकऐवजी कागद, कापूस, लाकूड आणि नैसर्गिक साहित्याला प्राधान्य दिले जात आहे.

घरच्या घरी राखीची निर्मिती

जुन्या कापडाचे तुकडे, लोकर, कागद, धागे आणि मणी यांचा वापर करून घरच्या घरी राखी तयार करण्याकडेही काही कुटुंबांचा कल आहे. मुलांसाठी आयोजित कार्यशाळांमधून सर्जनशीलतेसोबत पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जात आहे.

Raksha Bandhan 2026: सोन्याची वा चांदीची राखी बांंधण्याचे नियम, करू नका ‘ही’ चूक

स्थानिकांना रोजगार 
पर्यावरणपूरक राख्यांची निर्मिती महिला बचतगट, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक कारागिरांकडून केली जात आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक उत्पादनांना चालना मिळण्याबरोबरच स्थानिक कौशल्य आणि रोजगारालाही हातभार लागत आहे. विविध कंपन्या आणि संस्थांकडूनही कर्मचाऱ्यांसाठी अशा राख्यांची निवड केली जात असून, त्यासोबत रोप किंवा पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जात आहे.

काय असते ‘इको-फ्रेंडली’ राखी?
– कापूस, ज्यूट, कागद किंवा लाकडाचा वापर
– प्लास्टिक व कृत्रिम सजावट टाळली जाते
– बियाणे असलेल्या राख्या
– मातीत मिसळणारे साहित्य
– कागदी किंवा कापडी पॅकेजिंग
– स्थानिक कारागिरांकडून निर्मिती

‘ग्राहक आता केवळ राखी सुंदर आहे का, एवढाच विचार करत नाहीत; ती कोणत्या साहित्यापासून तयार केली आहे आणि वापरल्यानंतर तिचे काय होणार, याचाही विचार करू लागले आहेत. त्यामुळे नैसर्गिक साहित्यापासून तयार केलेल्या राख्यांना यंदा चांगला प्रतिसाद मिळत आहे.’
–  वर्षा गरड, महिला कारागीर व बचतगट प्रतिनिधी

Avoid gifts on Raksha Bandhan: बहिणीसाठी राखीचं गिफ्ट घेताय? ‘या’ ५ वस्तू चुकूनही देऊ नका!

‘राखी बांधल्यानंतर ती कचऱ्यात जाण्यापेक्षा तिच्यापासून एखादे रोप तयार झाले, तर  त्यातून भावंडांच्या नात्याची आठवणही जपली जाते आणि निसर्गाशी नातेही जोडले जाते.’
– मिताली वाघमारे, ग्राहक

Web Title: Weaving environmental consciousness into rakhi thread eco friendly rakhis special preference pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 07:45 PM

Topics:  

  • pune news
  • Rakhi Pournima
  • rakshabandhan

संबंधित बातम्या

MPSC Protest : आंदोलनात संजय राऊतांची एन्ट्री; ‘जंतर-मंतर जिल्ह्या-जिल्ह्यात उभं राहिलं तर मंत्रालयाबाहेर पडता येणार नाही’
1

MPSC Protest : आंदोलनात संजय राऊतांची एन्ट्री; ‘जंतर-मंतर जिल्ह्या-जिल्ह्यात उभं राहिलं तर मंत्रालयाबाहेर पडता येणार नाही’

जेजुरीत भाजप युवा मोर्चाचे शक्तिप्रदर्शन; ‘युवाशक्तीला संघटनेत व्यासपीठ द्या’, गोपीचंद पडळकरांचे आवाहन
2

जेजुरीत भाजप युवा मोर्चाचे शक्तिप्रदर्शन; ‘युवाशक्तीला संघटनेत व्यासपीठ द्या’, गोपीचंद पडळकरांचे आवाहन

हवेली-७ कार्यालयाच्या तपासणीत २१ दस्तांवर आक्षेप; संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची रोहन सुरवसे पाटलांची मागणी
3

हवेली-७ कार्यालयाच्या तपासणीत २१ दस्तांवर आक्षेप; संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची रोहन सुरवसे पाटलांची मागणी

कचरा गोळा करणारी घंटागाडीच मद्यधुंद चालकाच्या ताब्यात; पुण्यात गुन्हा दाखल
4

कचरा गोळा करणारी घंटागाडीच मद्यधुंद चालकाच्या ताब्यात; पुण्यात गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.