Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weekend Special : रविवारचा करा मजेदार बेत, घरी बनवा मसालेदार आणि चविष्ट ‘चिकन कोफ्ता करी’

Chicken Kofts Curry Recipe : रविवारी अनेकांच्या घरी नॉनव्हेजचा प्लॅन बनतो म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी विकेंड स्पेशल एक चविष्ट आणि पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी चिकनची रेसिपी घेऊन आलो आहोत.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 18, 2025 | 08:15 PM
Weekend Special : रविवारचा करा मजेदार बेत, घरी बनवा मसालेदार आणि चविष्ट 'चिकन कोफ्ता करी'

Weekend Special : रविवारचा करा मजेदार बेत, घरी बनवा मसालेदार आणि चविष्ट 'चिकन कोफ्ता करी'

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय पाककृतीत “शाही” हा शब्द ऐकताच आपल्याला दरबारातील राजेशाही जेवण, सुगंधी मसाले, नाजूक चव आणि श्रीमंतीचा स्पर्श यांची आठवण होते. मुघलकालीन स्वयंपाकातून शाही डिशेसची परंपरा सुरु झाली आणि त्यात कोफ्ता करीला विशेष स्थान मिळाले. कोफ्ते म्हणजे मांस किंवा भाज्या वापरून तयार केलेले गोल मऊसर गोळे, जे मसालेदार ग्रेव्हीत शिजवले जातात. शाही चिकन कोफ्ता ही अशीच एक डिश आहे जी आपल्या जेवणाला दरबारी टच देते.

देसी स्टाईल तवा बर्गर आता घरीच बनवा, मुलेच काय तर घरातील मोठेही होतील खुश; नोट करा रेसिपी

या डिशमध्ये चिकनच्या कीम्याचे छोटे मऊसर कोफ्ते तयार करून ते काजू, क्रीम आणि दुधी मसाल्याच्या श्रीमंत ग्रेव्हीत टाकले जातात. ही डिश लग्न, खास पाहुण्यांसाठीचा बेत किंवा एखाद्या खास रात्रीच्या जेवणासाठी अगदी योग्य ठरते. गरमागरम नान, बटर पराठा किंवा जीराराईससोबत ही रेसिपी अतिशय अप्रतिम लागते. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य:

कोफ्त्यासाठी:

  • चिकन कीमा – ५०० ग्रॅम
  • आलं-लसूण पेस्ट – १ टेबलस्पून
  • हिरवी मिरची – २ (बारीक चिरलेली)
  • कोथिंबीर – २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
  • बेसन – २ टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • गरम मसाला – ½ टीस्पून

ग्रेव्हीसाठी:

  • कांदे – २ (स्लाइस करून परतून पेस्ट केलेले)
  • टोमॅटो – २ (प्युरी केलेले)
  • काजू – १०-१२ (पाण्यात भिजवून पेस्ट केलेले)
  • आलं-लसूण पेस्ट – १ टेबलस्पून
  • दही – २ टेबलस्पून
  • क्रीम – ३ टेबलस्पून
  • हळद – ½ टीस्पून
  • लाल तिखट – १ टीस्पून
  • धणे-जिरे पावडर – १ टीस्पून
  • गरम मसाला – १ टीस्पून
  • तूप/तेल – ३ टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • कोथिंबीर – सजावटीसाठी

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट केशर शिरा, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • यासाठी सर्वप्रथम चिकन कीम्यात आलं-लसूण पेस्ट, मिरची, कोथिंबीर, बेसन, मीठ व गरम मसाला घालून छान मळून घ्या.
  • तयार मिश्रणाचे लहान लहान गोळे बनवा आणि हलक्या तेलात तळून घ्या.
  • कांदे तूपात सोनेरी होईपर्यंत परता आणि थंड झाल्यावर मिक्सरमध्ये पेस्ट करा.
  • एका कढईत तूप गरम करून त्यात आलं-लसूण पेस्ट, कांदा पेस्ट, टोमॅटो प्युरी घालून परता.
  • आता त्यात हळद, तिखट, धणे-जिरे पावडर, मीठ घालून मध्यम आचेवर छान परता.
  • काजू पेस्ट आणि दही घालून ग्रेव्ही घट्ट होईपर्यंत परता.
  • आता या ग्रेव्हीत थोडे पाणी घाला आणि तळलेले चिकन कोफ्ते टाका. झाकण ठेवून ८-१० मिनिटे मंद आचेवर शिजू द्या.
  • शेवटी क्रीम आणि गरम मसाला घालून छान हलवा. वरून कोथिंबीर घालून सजवा.
  • गरमागरम शाही चिकन कोफ्ता नान, तंदूरी रोटी, बटर पराठा किंवा जीराराईससोबत सर्व्ह करा.

Web Title: Weekend special make tasty and spicy chicken kofta curry at home note down recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • non veg

संबंधित बातम्या

विदेशी पदार्थाला द्या देसी तडका! घरी बनवा चिजी, सॉसी आणि भाज्यांनी भरलेला चविष्ट ‘पिझ्झा’; चव अशी की सर्वच होतील खुश
1

विदेशी पदार्थाला द्या देसी तडका! घरी बनवा चिजी, सॉसी आणि भाज्यांनी भरलेला चविष्ट ‘पिझ्झा’; चव अशी की सर्वच होतील खुश

संध्याकाळी भूक लागल्यानंतर काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत स्वीट कॉर्न कटलेट, नोट करा रेसिपी
2

संध्याकाळी भूक लागल्यानंतर काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत स्वीट कॉर्न कटलेट, नोट करा रेसिपी

पार्टी स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय, घरी बनवा टेस्टी ‘बेबी कॉर्न चिली’; अवघ्या 10 मिनिटांची रेसिपी
3

पार्टी स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय, घरी बनवा टेस्टी ‘बेबी कॉर्न चिली’; अवघ्या 10 मिनिटांची रेसिपी

Recipe : हिवाळ्यातील पौष्टिक भाज्यांची मजा लुटा, घरी बनवा मसालेदार अन् चमचमीत ‘व्हेज कोल्हापुरी’
4

Recipe : हिवाळ्यातील पौष्टिक भाज्यांची मजा लुटा, घरी बनवा मसालेदार अन् चमचमीत ‘व्हेज कोल्हापुरी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.