तरुण वयात डोळ्यांखाली काळे डाग नेमके कशामुळे येतात?
चुकीची जीवनशैली, कामच वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, मानसिक तणाव आणि अपुऱ्या झोपेमुळे आरोग्यासोबतच त्वचेचे सुद्धा नुकसान होते. हल्ली सर्वच महिलांना डोळ्यांखाली काळी वर्तुळ येत आहेत. डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळ आरोग्यासंबंधित समस्या आणि मानसिक तणावामुळे येतात. तसेच काळे डाग आल्यानंतर त्वचा अतिशय निस्तेज आणि रुक्ष दिसू लागते. डोळ्यांभोवती आलेल्या काळ्या वर्तुळांमुळे डोळ्यांचं सौंदर्य पूर्णपणे बिघडून जाते. ही वर्तुळ वाढल्यानंतर बऱ्याच महिला महागडे स्किन केअर किंवा वेगवेगळ्या क्रीम लावून त्वचेवर डाग घालवतात. मात्र तरीसुद्धा डोळ्यांखाली आलेले काळे डाग कमी होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डोळ्यांखाली काळी वर्तुळ नेमकी कशामुळे येतात? हे डाग घालवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – pintrest)
बऱ्याचदा अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळ येतात. तर शरीरात निर्माण झालेल्या पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा डिहायड्रेट होऊन जाते. तसेच जास्त वेळ फोनचा वापर, मानसिक तणाव, आहारातील बदल, अपुरी झोप, डिहायड्रेशन, जास्त उन्हात राहणे आणि कधी कधी हार्मोनल बदलांमुळे सुद्धा डोळ्यांखाली काळी वर्तुळ येण्याची जास्त शक्यता असते. हल्ली प्रत्येक व्यक्ती डार्क सर्कल्सच्या समस्येने त्रस्त आहे. वय वाढल्यानंतर हळूहळू त्वचेचा लवचिकपणा कमी होऊन जातो. तसेच त्वचेमधील कोलेजनसुद्धा कमी होते, ज्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळ येतात.
चमकदार आणि डाग विरहित चेहऱ्यासाठी दूध लावणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या कोणी चेहऱ्यावर दूध लावावे
त्वचेसंबंधित कोणत्याही समस्या उद्भवल्यानंतर बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. डोळ्यांभोवती आलेले काळे डाग घालवण्यासाठी वाटीमध्ये कोरफड जेल घेऊन त्यात खोबऱ्याचे तेल आणि विटामिन ई कँप्सूल टाकून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण मिक्स केल्यानंतर डोळ्यांच्या खाली लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे डेड स्किन कमी होण्यास मदत होईल. तसेच कोरफडचे मिश्रण तुम्ही संपूर्ण त्वचेवर सुद्धा लावू शकता. याशिवाय नियमित 7 ते 8 तासांची शांत झोप घेणे आवश्यक आहे. झोपल्यामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि आरोग्य सुधारते. याशिवाय तुम्ही डोळ्यांखाली काकडीचे तुकडे ठेवू शकता. यामुळे डोळ्यांभोवती वाढलेला काळेपणा कमी होईल.