Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय आहे एव्हीएन अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस? यामुळे सांधेदुखीची होईल गंभीर समस्या

AVN Avascular Necrosis: अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे नेमके काय? हा कोणता आजार आहे, याची कारणे, लक्षणे आणि उपाय नक्की काय आहेत? शरीराच्या कोणत्या भागावर याचा परिणाम होतो याची माहिती तज्ज्ञांकडून या लेखातून आपल्याला घेता येईल. जाणून घ्या अधिक माहिती

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 12, 2024 | 11:25 AM
काय आहे AVN Avascular Necrosis

काय आहे AVN Avascular Necrosis

Follow Us
Follow Us:

अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस याला ऑस्टिओ नेक्रोसिस असेही म्हणतात. यामध्ये हिप्सच्या जॉईंटना रक्तपुरवठा पोहोचत नसल्यानं हाडांच्या ऊती मृत पावतात. वय आणि लिंगाचा यावर कोणताही परिणाम होत नसून एव्हीएनचा त्रास हा कोणालाही कोणत्याही वयात होऊ शकतो. सामान्यत: 30 ते 50 वयोगटातील व्यक्तींमध्ये ही समस्या सामान्य आढळून येते. ही एक अशी समस्या आहे ज्यास विकसित होण्यासाठी काही महिने आणि वर्षे लागू शकतात. 

अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ही एक वेदनादायक स्थिती आहे जी हाडांवर दुष्परिणाम करते आणि कालांतराने अस्वस्थता निर्माण करू शकते. उपचार न केल्यास सांधेदुखी आणि संधिवातासारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. अचानक होणारी दुखापत, स्टिरॉइड्सचा दीर्घकाळ वापर, मद्यपान आणि वैद्यकीय परिस्थितीमुळे एव्हीएनचा समस्या आणखी गंभीर रुप धारण करते. डॉ. आशिष अरबट, ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, जहांगीर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स, पुणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock) 

कारणीभूत घटक कोणते?

अचानक दुखापत होणे: हाडांचे फ्रॅक्चर यासारखी अचानक झालेली दुखापत किंवा हाडं निखळणे हे तुमच्या रक्तवाहिन्यांना गंभीर नुकसान करू शकते. जेव्हा रक्तवाहिन्या खराब होतात, तेव्हा हाडांच्या ऊतींना ऑक्सिजन समृद्ध रक्त पुरवठा करणे जवळजवळ अशक्य होतो.

स्टिरॉइड्सचा दीर्घकाळ वापर: संधिवात, दमा किंवा ल्युपस यांसारख्या परिस्थितींवर उपचार करण्यासाठी, जळजळ कमी करण्यासाठी डॅाक्टर स्टिरॉइड्स लिहून देतात. या स्टिरॉइड्सच्या उच्च डोसमुळेदेखील रक्तवाहिन्यांमध्ये फॅट्स जमा होऊ शकतात. यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या अरुंद होऊ शकतात परिणामी हाडांना रक्तपुरवठा कमी होतो.

अल्कोहोलचे सेवन: स्टिरॉइड्सचा दीर्घकाळ वापर केल्यास, जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने रक्तवाहिन्यांमध्ये चरबीयुक्त पदार्थ जमा होऊ शकतात. हे हाडांमधील रक्त प्रवाह अवरोधित करतात, परिणामी अव्हॅस्कुलर नेक्रोसिस होतो.

ठराविक वैद्यकीय परिस्थिती: रक्त विकार, दाहक रोग आणि चयापचय विकारांसारख्या आरोग्याच्या स्थितीमुळे अव्हॅस्कुलर नेक्रोसिसची सुरुवात होते. सिकल सेल ॲनिमिया सारख्या रक्त विकारांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो.

लक्षणे कोणती?

कोणती लक्षणे दिसतात

अव्हॅस्कुलर नेक्रोसिस हाडांवर परिणाम करू शकते, परंतु ते बहुतेक आपल्या नितंबांवर परिणाम करते. हाडांवर दाब आल्याने सतत वेदना होणे, सांध्यामधील ताठरता आणि अस्वस्थता निर्माण होणे, हालचाल मर्यादित होणे आणि नितंबामध्ये किंवा गुडघ्यांमध्ये एव्हीएन विकसित झाल्यास लंगडत चालणे यासारखी लक्षणे दिसून येतात. यामुळे उभे राहणे, चालणे आणि पायऱ्या चढणेही कठीण होते. ही लक्षणे ओळखल्यास त्वरित निदान होऊ शकते आणि सकारात्मक परिणामाची शक्यता वाढते.

जाणून घ्या उपचार 

अव्हॅस्कुलर नेक्रोसिसच्या उपचारांचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे अस्वस्थता कमी करणे, हाडांचे नुकसान होण्यापासून रोखणे आणि तुमचे संपुर्ण आरोग्य सुधारणे. वय, आजाराची तीव्रता, हाडांचे नुकसान याचबरोबर एव्हीएनचे मूळ कारण शोधून उपचार योजना ठरवली जाते. जर तुमचे अव्हॅस्कुलर नेक्रोसिस सुरुवातीच्या टप्प्यावर असेल, तर काही औषधे जसे की NSAIDs, ऑस्टिओपोरोसिस औषधे आणि रक्त पातळ करणारी औषधे ही तुमची स्थिती सुधारण्यास मदत करू शकतात. 

हिप रिप्लेसमेंट हादेखील पर्याय 

हिप रिप्लेसमेंटचा तज्ज्ञांचा सल्ला

हिप रिप्लेसमेंट ही एखाद्या व्यक्तीच्या जीवनाची गुणवत्ता आणि हालचालींमध्ये सुधार आणू शकते जेव्हा नितंबामध्ये वेदना होतात तेव्हा एखाद्याच्या दैनंदिन कार्यात अडथळे येतात. सध्या, सुपरपॅथ हाय रिप्लेसमेंट हे एक प्रभावी तंत्र ठरत असून ते एव्हीएनग्रस्त रुग्णांसाठी आशादायक ठरत आहे. यामध्ये एक लहान छिद्र पाडून उपचार केले जातात ज्यामुळे हिप डिस्लोकेट होत नाही किंवा जवळच्या स्नायूंना किंवा स्नायुबंधास देखील हानी पोहोचवत नाही. 

तज्ज्ञांचा सल्ला 

यामुळे रुग्णाचा रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी होतो, रक्तस्राव कमी होते. ही पद्धत अत्यंत सुरक्षित असून त्याचे यशस्वी परिणाम पहायला मिळतात. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण दुसऱ्याच दिवशी कोणत्याही त्रासाशिवाय चालू शकतो.ज्यांना नितंबाच्या असह्य वेदनांपासून आराम मिळवायचा आहे त्या रुग्णांकडून या तंत्रास पसंती मिळत आहे. तुमच्या सांध्यातील हालचाल सुधारण्यासाठी तज्ज्ञ तुम्हाला फिजिओथेरपीसारख्या विविध उपचारांची शिफारस करू शकतात आणि प्रभावित क्षेत्रावर ताण पडू नये म्हणून शारीरिक हालचालींवर मर्यादा घालण्याचा सल्ला देतात.

Web Title: What is avn avascular necrosis causes symptoms and treatment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2024 | 11:23 AM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

Walking Tips: ना जिम, ना ट्रेडमिल! फक्त चालण्याच्या पद्धतीत करा ‘हे’ सोपे बदल; शरीर राहील फिट
1

Walking Tips: ना जिम, ना ट्रेडमिल! फक्त चालण्याच्या पद्धतीत करा ‘हे’ सोपे बदल; शरीर राहील फिट

Digestion Health: गणेशोत्सवात जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने पोटाचा होऊ शकतो त्रास, पचनाचे आरोग्य महत्त्वाचे
2

Digestion Health: गणेशोत्सवात जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने पोटाचा होऊ शकतो त्रास, पचनाचे आरोग्य महत्त्वाचे

रूम फ्रेशनरचा वापर करताय? ‘या’ गंभीर आजारांचा वाढतोय धोका; जाणून घ्या आरोग्यासाठी किती आहे घातक!
3

रूम फ्रेशनरचा वापर करताय? ‘या’ गंभीर आजारांचा वाढतोय धोका; जाणून घ्या आरोग्यासाठी किती आहे घातक!

मॅग्नेशियमची कमतरता पडू शकते महाग! जाणून घ्या शरीरासाठी का महत्त्वाचे आहे हे पोषक तत्व?
4

मॅग्नेशियमची कमतरता पडू शकते महाग! जाणून घ्या शरीरासाठी का महत्त्वाचे आहे हे पोषक तत्व?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.