
Fatty liver म्हणजे काय? लिव्हरमध्ये जमा झालेली अनावश्यक चरबी नष्ट करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
फॅटी लिव्हरची कारणे?
लिव्हर स्वच्छ ठेवण्यासाठी उपाय?
लिव्हर डे का साजरा केला जातो?
दरवर्षी १९ एप्रिल रोजी लिव्हर डे साजरा केला जातो. मेंदूनंतर लिव्हर शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव मनाला जातो. रक्त शुद्ध करणे, शरीरातील घाण बाहेर काढून टाकणे, पित्त तयार करणे, चांगले फॅट्स तयार करणे इत्यादी ५० पेक्षा जास्त कामे लिव्हर करते. पण धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि कामाच्या वाढत्या तणावामुळे शरीराकडे जास्त लक्ष दिले जात नाही. लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीराला हानी पोहचते. शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात. त्यामुळे लिव्हरच्या आजारांबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि निरोगी जीवनशैली प्रोत्साहित करण्यासाठी लिव्हर डे साजरा केला जातो. चला तर जाणून घेऊया फॅटी लिव्हर म्हणजे काय आणि फॅटी लिव्हरपासून सुटका मिळवण्यासाठी काय करावे, याबद्दल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
चुकीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, कमी पाण्याचे सेवन, आहारात सतत होणारे बदल इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे शरीरातील अवयवांचे कार्य बिघडते. सतत तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे अनावश्यक चरबी लिव्हरमध्ये साचून राहते. परंतु ही चरबी ५ ते १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढते, अशा स्थितीला फॅटी लिव्हर असे म्हंटले जाते. फॅटी लिव्हर झाल्यानंतर वेळीच लक्ष न दिल्यास लिव्हर कॅन्सर किंवा लिव्हर सोरायसिससारखे गंभीर आजार होऊ शकतात.
पालेभाज्या शरीराला भरपूर पोषण देतात. उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर पालेभाज्या उपलब्ध असतात. पालेभाज्यांचा आहारात समावेश केल्यास शरीरातील घाण बाहेर पडून जाईल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. पालेभाज्यांमध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे वाढलेले वजन कमी होण्यासोबतच आतड्यांमध्ये जमा झालेली घाण सुद्धा बाहेर पडून जाते. मेथी, मुळा, पालक या भाज्यांचा आहारात समावेश करावा.
जेवणाला फोडणी देण्यासाठी लसूण वापरली जाते. लसूण टाकल्यामुळे पदार्थाची चव वाढण्यासोबतच सुगंध सुद्धा वाढतो. फॅटी लिव्हर असलेल्या लोकांनी सकाळी उठल्यानंतर नियमित एक किंवा दोन कच्च्या लसूण पाकळ्या चावून खाव्यात. यामुळे लिव्हरमधून चरबी जळून जाण्यास मदत होईल. लिव्हर स्वच्छ करण्यासाठी लसुणचा जेवणात समावेश करावा.
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं फळे खायला खूप जास्त आवडतात. सफरचंद, संत्री, द्राक्षे, लिंबू आणि बेरीजमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि विटामिन सी मोठ्या प्रमाणात असते. लिव्हरच्या पेशींचे नुकसान होऊ नये म्हणून आंबट फळे खावीत. तसेच वेगवेगळ्या भाज्या, सुका मेवा आणि नट्सचा आहारात समावेश करावा.
Ans: लिव्हरमध्ये अनावश्यक चरबी जमा होणे म्हणजे फॅटी लिव्हर होय. हे प्रामुख्याने चुकीच्या आहारामुळे, लठ्ठपणामुळे किंवा मद्यपानामुळे होते.
Ans: फॅटी लिव्हरचे दोन प्रकार आहेत – अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आणि नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर
Ans: तळलेले पदार्थ, जंक फूड, साखरयुक्त पेये, मद्यपान आणि जास्त तेलकट आहार टाळावा.