Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीच्या आजारांसोबत इतर अनेक नवनवीन विषाणूंची शरीराला लागण होते. या आजारांची लागण झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती काहीशी कमी होऊन जाते, ज्यामुळे शरीरात सतत थकवा जाणवतो. मागील काही दिवसांपासून लहान मुलांना हँड फूट माउथ डिसीजया व्हायरल इन्फेक्शनची लागण झाल्याचे दिसून आले आहे. हे इन्फेक्शन मुलांना कॉक्ससॅकी व्हायरस नावाच्या एन्टरोव्हायरसमुळे होत आहे. या नव्या विषाणूची लागण ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये दिसून येत आहे. साथीच्या आजारांची लागण झाल्यास ती इतर मुलांनासुद्धा सहज होते. हँड फूट माउथ डिसीज झाल्यानंतर ७ दिवसांमध्ये रुग्ण बरा होतो, पण शरीराची रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत होऊन जाते. ज्या मुलांची रोगप्रतिकारशक्ती खूप जास्त नाजूक आणि कमकुवत आहे, अशांना हँड फूट माउथ डिसीजची लागण लवकर होऊ शकते.(फोटो सौजन्य – istock)
साथीच्या रोगांचं थैमान; डेंग्यू 113, मलेरिया 100, चिकनगुनियाचा कहर; रुग्णसंख्येतही वाढ
हँड फूट माउथ डिसीज झालेल्या मुलाच्या संपर्कात आल्यानंतर इतरांना सुद्धा या गंभीर विषाणूची लागण होऊ शकते. त्यामुळे क्रमित पृष्ठभाग, खेळणी किंवा भांडी इत्यादी गोष्टींना संपर्क केल्यास शरीराला गंभीर विषाणूची लागण होऊ शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हँड फूट माउथ डिसीज झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. एकत्र ग्रुपमध्ये खेळणाऱ्या मुलांना या विषाणूची लागण लगेच होऊ शकते. त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी.
हँड फूट माउथ डिसीज झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये शरीरात कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. ५ किंवा ६ दिवसांनंतर सगळ्यात आधी मुलांना ताप येणे, डोकेदुखी, घसा खवखवणे आणि भूक न लागणे इत्यादी लक्षणे शरीरात दिसून येतात. वारंवार तब्येत बिघडल्यामुळे लहान मुलं सतत चिडचिड करतात. हा आजार वाढू लागल्यानंतर तोंडात फोड किंवा अल्सर तयार होणे, गिळताना त्रास होणे इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.
सकाळी उठल्यानंतर नियमित फॉलो करा ‘या’ सवयी! चेहऱ्यावरील घाण होईल कायमची स्वच्छ, वाढतील आनंदी हार्मोन
कालांतराने हँड फूट माउथ डिसीज झाल्यानंतर हाताच्या तळव्यावर, पायाच्या तळव्यावर, गुडघ्यावर किंवा मुलांच्या कोपरांवर लाल पुरळ येते. तसेच सतत ताप येणं, उलट्या होणं, वारंवार लघवी होणं किंवा डिहायड्रेशन इत्यादी अनेक गंभीर लक्षणे शरीरात दिसू लागतात. वारंवार लहान मुलांच्या शरीरात ही लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.