सकाळी उठल्यानंतर नियमित फॉलो करा 'या' सवयी!
चुकीची आहार, वाढलेली काम, तणावपूर्ण जीवनशैली, जंक फूडचे अतिसेवन, मानसिक तणाव, अपुरी झोप आणि चुकीच्या वेळी अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात अनेक लहान मोठे बदल दिसून येतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.पचनाची समस्या उद्भवू लागल्यानंतर काहींच्या त्वचेवर सतत पिंपल्स आणि मोठे मोठे फोड येतात, तर काहींचे झपाट्याने वजन वाढते. वजन वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. वाढलेले वजन कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या वेग्वेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. कधी डिटॉक्स वॉटर प्यायले जाते तर कधी वेगवेगळ्या सप्लिमेंटचे सेवन केले जाते. पण हे उपाय करून सुद्धा वाढलेले वजन कमी होत नाही.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे त्वचा अतिशय खराब होऊन जाते. याशिवाय चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात. सकाळी फॉलो केलेल्या चुकीच्या सवयी शरीरासाठी अतिशय घातक ठरतात. त्यामुळे त्यामुळे कायमच निरोगी आणि सुंदर त्वचेसाठी योग्य सवयी फॉलो करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यानंतर कोणत्या सवयी फॉलो केल्यास स्किन डिटॉक्स होण्यास मदत होईल, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या सवयी फॉलो केल्यामुळे शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतात. नियमित २१ दिवस शरीरात केलेल्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.
रात्री झोपण्याआधी एक ग्लास पाण्यात ४ किंवा ५ मनुके आणि दोन काड्या केशर टाकून पाण्यात भिजत ठेवा.तयार केलेल्या पाण्याचे सेवन सकाळी उपाशी पोटी सेवन करावे. पाण्यातील मनुके चावून खावेत. मनुके आणि केशराचे पाणी प्यायल्यामुळे शरीरातील रक्त शुद्ध होण्यास मदत होते. याशिवाय केशरमध्ये असलेले गुणधर्म त्वचेतील नैसर्गिक चमक वाढवतात. पचनक्रिया सुधरण्यासाठी मनुक्यांचे पाणी प्यावे.
सकाळी उठल्यानंतर नियमित योगासने किंवा ध्यान करणे आवश्यक आहे. यामुळे मानसिक संतुलन सुधारते. याशिवाय आरोग्य कायमच निरोगी राहते. रोज सकाळी उठल्यानंतर १ मिनिट कपालभाती प्राणायाम करावे. नियमित व्यायाम केल्यामुळे शरीराला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होतो. ध्यान केल्यामुळे मेटाबॉलिझम वेगवान वाढते.
अंघोळ करण्याच्या आधी ड्राय ब्रशिंग करावे. यामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारते. याशिवाय उन्हामुळे त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी नियमित स्क्रब करावे. लिम्फॅटिक सिस्टीम सक्रिय झाल्यानंतर शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते. नैसर्गिक पद्धतीने पोटावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी आहारात डिटॉक्स पेयांचे सेवन करावे.
World Physiotherapy Day : जखमांच्या पलीकडील “वेलनेस”कडे नेणारी फिजिओथेरपी, म्हणजे नक्की काय?
सकाळच्या चांगल्या सवयी:
उठल्याबरोबर फोन वापरण्याची सवय टाळा, कारण यामुळे तणाव वाढू शकतो. सकाळी उठल्यावर पाणी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. मेंदूच्या कार्यासाठी आणि हार्मोन्सचे नियमन करण्यासाठी पौष्टिक नाश्ता करणे महत्त्वाचे आहे.
सकाळी व्यायाम केल्यामुळे शरीराला होणारे फायदे:
आठवड्यातील बहुतेक दिवस किमान 30-45 मिनिटे एरोबिक व्यायाम (उदा. तेज चालणे) करा. शरीराला पुरेशी विश्रांती मिळणे आवश्यक आहे, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी सोप्या टिप्स:
वजन कमी करण्यासाठी आहार आणि व्यायामाचे मिश्रण आवश्यक आहे; यात प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे, भाज्या, फळे आणि प्रथिनांचा आहारात समावेश करणे महत्त्वाचे आहे, तसेच आठवड्यातून किमान 30 मिनिटे एरोबिक व्यायाम आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग करणे गरजेचे आहे.