मधुबनी पेंटिंग कशी बनवली जाते?
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा 2025- 2026 चा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करण्यासाठी त्यांनी सोनेरी बॉर्डर असलेली कॉटनची ऑफ व्हाईट मधुबनी कलाप्रकारातील साडी परिधान केली होती. त्यावर त्यांनी लाल रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज परिधान केला होता. निर्मला सीतारमण यांनी परिधान केलेल्या साडीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांनी नेसलेल्या साडीची काही खास वैशिट्य सुद्धा आहेत. पहिली खास गोष्ट म्हणजे निर्मला सीतारमण यांनी नेसलेली साडी त्यांना पद्म पुरस्कार विजेत्या बिहारच्या दुलारी देवी यांनी भेट म्हणून दिली आहे.(फोटो सौजन्य – pinterest)
साडी परिधान करून त्यांनी अर्थसंकल्प सादर केला. शतकानुशतके जुन्या मधुबनी शैलीने सजवलेल्या साडीवर अतिशय सुरेख नक्षीकाम तयार करण्यात आले आहे. शतकानुशतके जुन्या मधुबनी शैलीने सजवलेल्या साडीची भुरळ त्या काळी ब्रिटिश अधिकाऱ्यांना सुद्धा पडली होती. तसेच असे म्हटले जाते की, साडीवर तयार करण्यात आलेली चित्रकला प्रथम राजा जनकाने बनवण्याचा आदेश दिला होता. चला तर जाणून घेऊया बिहारमधील मधुबनी साडीच्या सौंदर्यची सविस्तर माहिती.
मधुबनी पेंटिंगला मिथिला पेंटिंग असे सुद्धा म्हंटले जाते. पूर्वीच्या काळी या पारंपारिक कला शैलीचा उगम बिहारच्या मिथिला प्रदेशात झाला होता. माता सीता आणि श्री राम यांच्या विवाहाच्या वेळी राजा जनक यांनी चित्रांच्या रूपात विधी कोरण्याची जबाबदारी महिला कलाकारांवर दिली होती, असे सांगितले जाते. त्यानुसार या शैलीतील मधुबनी पेंटिंग तयार करण्यात आले.
पूर्वीच्या काळी चित्रकला, हस्तकला, विणकाम इत्यादी हाताने तयार केलेल्या जाणाऱ्या कलांना विशेष महत्व होते. पूर्वीच्या काळी तिथे आलेल्या भूकंपानंतर आधुनिक काळात विल्यम जी यांनी तिथे असलेल्या घरांची पाहणी केली. त्यावेळी भितींवर अशाप्रकारचे पेंटिंग दिसून आले होते. भितींवर तयार करण्यात आलेले चित्र पाहून ते अधिक प्रभावित झाले , असे सांगितले जाते.
Budget Session 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा पहा खास लूक; साडीवरील डिझाईनने वेधले लक्ष
मधुबनीची चित्रे पारंपारिकपणे डहाळ्या, माचिस आणि बोटांनी बनवली जातात. मात्र काही वर्षांनंतर ही चित्र काढण्यासाठी ब्रशचा वापर केला जाऊ लागला. पेंटिंगमध्ये वापरलेले रंग पूर्णपणे नैसर्गिक असतात. याशिवाय शेण, काजळ, हळद, नील, फुलांचा रस, चंदन, तांदळाचे पीठ इत्यादी पदार्थांचा वापर रंग बनवले जातात. पूर्वीच्या काळी स्त्रिया घरातील शुभ प्रसंगी भिंतींवर किंवा मातीवर चित्र काढत होत्या. मात्र या चित्रांचे जतन करणे शक्य नसल्यामुळे हळूहळू ही चित्रे कागदावर, कापडावर आणि कॅनव्हासवर कोरण्यात आली होती. मधुबनी चित्रांमध्ये प्रामुख्याने लोककथा, दंतकथा, महाकाव्ये, पौराणिक कथा इत्यादी चित्र साड्यांवर काढली जात आहेत. बिहारमधील जितवारपूर , रांटी आणि रसीदपूर इत्यादी भागांमध्ये मधुबनी साडी तयार केली जाते.