निर्मला सीतारमण यांच्या साडीचै वैशिष्ट्य (फोटो सौजन्य - ANI)
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग आठव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्या आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्याच महिला अर्थमंत्री आहेत. 2025 चा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा पारंपरिक साडीची निवड केली आहे. मागील अनेक वर्षांपासून अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण पारंपारिक साड्यांची निवड करत आहेत. यामागे काही कारण सुद्धा आहेत. निर्मला सीतारामन केवळ फॅशन स्टेटमेंट न करता भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रचार करत आहेत आणि या पारंपारिक कलाप्रकाराला जिवंत ठेवणाऱ्या कारागिरांना पाठिंबा देत आहेत.(फोटो सौजन्य ANI)
आज निर्मला सीतारमण सादर करत असणाऱ्या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यातील सगळ्यात आकर्षणाचा विषय म्हणजे निर्मला सीतारमण यांनी परिधान केलेली पारंपरिक साडी. 2025 चे अर्थसंकल्प सादर करण्यासाठी त्यांनी सोनेरी बॉर्डर असलेली कॉटनची ऑफ व्हाईट मधुबनी कलाप्रकारातील साडी परिधान केली आहे. त्यावर त्यांनी लाल रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज परिधान केला आहे. त्यावर त्यांनी सोन्याच्या बांगड्या, चैन आणि सोन्याचे सुंदर नाजूक कानातले परिधान केले आहेत. त्यांनी परिधान केलेली मिनिमलिस्ट ॲक्सेसरीज त्यांच्या पोशाखाची शोभा वाढवत आहे.
Budget Session 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा पहा खास लूक; साडीवरील डिझाईनने वेधले लक्ष
निर्मला सीतारमण यांनी परिधान केलेली साडी मधुबनी कलाप्रकारातील आहे. त्यांनी परिधान केलेल्या साडीवर भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे सुंदर प्रतिनिधित्व करण्यात आले आहे. मधुबनी हा कला प्रकार बिहारच्या मिथिला प्रदेशातील एक पारंपरिक लोककला प्रकार आहे, ज्यामध्ये जटिल भौमितिक नमुने, फुलांचा आकृतिबंध आणि निसर्ग आणि पौराणिक कथांचे चित्रण करून साडी तयार केली जाते. हा कला प्रकार दोलायमान रंग, नाजूक रेषा आणि प्रतिकात्मक सादरीकरणासाठी ओळखला जातो.
निर्मला सीतारमण यांचे 8 वे बजेट
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यावर्षी देशाचे ८ वे बजेट सादर करणार आहेत आणि सर्वच महिलांना त्या यावर्षी कोणती वेगळी साडी नेसणार याची उत्सुकता असते. यावर्षी त्यांनी कॉटनची वेगळीच पारंपरिक साडी निवडून पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. आपल्या देशातील साड्यांमधील विविधता त्यांनी नेहमीच समोर आणली असून स्वदेशी कपड्यांना नेहमीच महत्त्व दिले आहे. यावेळी बिहारमधील मिथिला येथील लोककला प्रकारातील ही साडी निर्मला सीतारमण यांच्यामुळे चर्चेत आली आहे.
‘अगं थोडी तरी दया कर…’; मिताली मयेकरच्या फोटोंवर नेटकऱ्यांची मिश्किल टीप्पणी
साडीची किंमत
मधुबनी ओरिजनल साडीची किंमत ही महाग असून साधारण ५ ते ६ हजारापासून सुरू होते. त्यावरील संपूर्ण कारागिरी किती कुशल आणि बारीक आहे त्याप्रमाणे याची किंमत वाढते. त्याप्रमाणे कपड्याचा दर्जादेखील महत्त्वाचा ठरतो. निर्मला सीतारमण यांनी नेसलेली साडी साधारणतः १८ हजाराच्या पुढील किमतीची असावी असा अंदाज आम्ही गुगलवर सर्च केलेल्या साड्यांनुसार बांधला आहे. तुम्हीही याचे वेगवेगळे डिझाईन्स पाहून नक्कीच अंदाज लाऊ शकता. दरम्यान बजेटबरोबरच आता निर्मला सीतारमण यांच्या या साडीची चर्चा सुरू झाली आहे.