
दुधाच्या पाकिटांवरील निळ्या, हिरव्या आणि नारंगी रंगांचा अर्थ काय? कोणते दूध आहे सर्वात चांगले; आजच जाणून घ्या
भारतातील सर्वात Haunted Beach, इथे आहे भयानक आत्मांचे वास्तव… चुकूनही जाण्याची हिंमत करू नका
दूधाच्या पाकीटावर वापरण्यात आलेले रंग हे केवळ डिझाईनसाठी नसतात तर ते दुधाची शुद्धता, फॅटचे प्रमाण आणि प्रक्रिया पद्धत अशा अनेक गोष्टी दर्शवत असतात. भारतातील FSSAI मानकांनुसार, या रंगांचे वेगवेगळे अर्थ आहेत. आज आपण या लेखात दूधाच्या पाकीटावरील निळ्या, हिरव्या आणि नारंगी रंगामागे नक्की कोणता अर्थ दडला आहे ते सविस्तर जाणून घेणार आहोत.
डेअरी कंपन्या या सामान्यत: ग्राहकांना सहज समजावे यासाठी दूधाच्या पॅकेट्सवर वेगवेगळ्या रंगांचा वापर करतात. या रंगाद्वारे तुम्हाला दूधातील वैशिष्ट्यांविषयी जाणून घेण्यास मदत होते.
निळे पाकीट
निळ्या रंगाचे दूधाचे पाकिट दर्शवते की, ते एक ‘टोन्ड मिल्क’ आहे. हे दूध स्किम्ड मिल्क पावडर आणि पाणी घालून फुल-क्रीम दुधातील फॅटचे प्रमाण कमी करून बनवले जाते. यात अंदाजे ३.०% फॅट आणि ८.५% एसएनएफ (सॉलिड नॉट फॅट) चे प्रमाण आढळून येते.
नारंगी पाकिटे
नारंगी रंगाच्या पाकीटात ‘फुल क्रीम’ किंवा ‘होल मिल्क’चे प्रमाण अधिक असते. या दूधातून क्रिम किंवा फॅट काढलेले नसते. यात ६.०% फॅट आणि ९.०% एसएनएफ (SNF) चे प्रमाण आढळून येते.
वृद्धांच्या सुरक्षेसाठी GPS ट्रॅकर्स ठरतात वरदान; सुरक्षिततेसाठी स्मार्ट उपाय, जाणून घ्या फायदे
हिरवी पाकिटे
हिरव्या रंगाचे दूधाचे पॅकेट दर्शवते की यातील चरबीचे प्रमाण एका विशिष्ट पातळीपर्यंत ‘स्टँडर्डाइज्ड’ केलेले असते. यात सामान्यतः ४.५% चरबी आणि ८.५% एसएनएफ (SNF) चे प्रमाण आढळून येते.
दूधाच्या पॅकेटचा रंग दूधाची गुणवत्ता दर्शवतो का?
हा लोकांचा सामान्य गैरसमज आहे पण तांत्रिकदृष्ट्या दूधाच्या पॅकेटचा रंग त्याची गुणवत्ता किंवा शुद्धता दर्शवत नाही. हे वेगवेगळे रंग खरंतर दूधातील फॅटचे प्रमाण दर्शवते.