'असा' एक प्राणी जो मृत्यूजवळ आला की आत्महत्या करतो, काय आहे या प्राण्याची रंजक माहिती
माणसाप्रमाणेच बुद्धीमान प्राणी कोण या प्रश्नावर आपसुकच उत्तर येतं ते म्हणजे हत्ती. स्मरण शक्ती, कुटुंब आणि शिकण्याची क्षमता, ही माणसांप्रमाणे हत्तींमध्ये देखील पाहायला मिळते. माणसांप्रमाणेच हत्ती देखील त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतात आणि कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी देखील पार पाडतात. मात्र हेच कर्तव्यदक्ष नर हत्ती जेव्हा वृद्ध होतात तेव्हा त्यांचं आयुष्य हे भयानक असतं. हत्तींच्या बाबतीतलं हे रंजक रहस्य नेमकं आहे तरी काय हे जाणून घेऊयात.
जंगलातील नियम कोणालाही चुकलेले नाहीत ते नियम हत्तींना देखील चुकलेला नाही. प्राण्यांच्या आयुष्यातला नेमक्य़ा घटना काय असतात याबाबत लेखक मारुती चित्तमपल्ली यांनी आपल्या पुस्तकात माहिती दिली आहे. मारुती चित्तमपल्ली यांचा प्राण्यांविषयीतचा अभ्यास खूप सखोल आहे. प्राण्यांच्या आयुष्याबाबत अनेक रंजक कथा आहे. त्यातील एक म्हणजे हत्तींच्या आयुष्याबद्दल आहे.
हत्ती त्याच्या कुटुंबाचं संरक्षण करण्यास अग्रेसर असतो. मात्र असं असलं तरी हत्तींच्या कळपावर मादी हत्तीणीचं नियंत्रण असतं. कळपातले इतर हत्ती हे तिच्या आदेशानुसार तिच्या मागून जात असतात. हत्ती म्हातारा झाल्य़ावर मात्र त्याचं आयुष्य भयाण होतं. म्हाताऱ्या हत्ती कळपात येऊ दिलं नाही. वृद्ध हत्तीला एकटं पाडलं जातं. त्यामुळे म्हातारा झालेला हत्ती चक्क नदीच्या डोहात जलसमाधी घेतो किंवा डोंगरकड्यावरुन उडी मारतो आणि स्वत:चं आयुष्य संपवतो. त्यामुळे इतर प्राण्यांप्रमाणे हत्तीचं शव जंगलात कधीचस आढळत नाही.
मारुती चित्तमपल्ली हत्तीच्या आयुष्याबाबात आणखी सखोल माहिती देताना सांगतात की, हस्तिदंतांसाठी हत्तींची शिकार केली जाते हे मादी हत्तीच्या लक्षात आल्यानंतर त्यांना होणाऱ्या पिलांमध्ये ‘जेनेटिकली’ बदल घडून येऊ लागले. हा बदल म्हणजे जंगलात हस्तिदंताशिवाय काही हत्ती जन्माला येऊ लागले. जंगलातल्या हत्तींच्या कळपात एखादा तरी ‘मुकना हत्ती’ असतो आणि त्याला मादीसोबत समागम करण्याची परवानगी नसते. हत्तींच्या बाबतीत आणखी एक गोष्ट म्हणजे हत्ती म्हातारा झाला की हत्तींचा कळप म्हाताऱ्या हत्तीने त्यांच्यासोबत येऊ नये असं ठरवतो. अशा वेळी तो म्हातारा हत्ती नदीच्या काठाजवळ असलेल्या डोहात जलसमाधी तरी घेतो किंवा उंचावरून उडी मारून मृत्यू पत्करतो. असा हा जंगलातला बुद्धीमान प्राणी असला तरी त्याचं वृद्ध झाल्यावरचं आयुष्य अत्यंत खडतर असतं.