(फोटो सौजन्य: Pinterest)
हृदयविकाराचा झटका कधीही कुठेही येऊ शकतो. यातून बाहेर पडणे जवळजवळ अशक्यच… सध्या हार्ट अटॅकचे प्रमाण फार वाढले असून यामुळे एका झट्क्यातच लोक मृत्यूला बळी पडतात आणि असेच काहीसे बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूरच्या नवऱ्यासोबत घडलं. १२ जून रोजी संजय कपूरचे निधन झाले, यावेळी ते अवघ्या ५३ वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण सिनेसृष्टी हादरली कारण त्यांना आधी कोणताही आजार नव्हता, ज्यामुळे त्यांचा हा अकस्मात मृत्यू अनेकांसाठी धक्कादायक ठरला. त्यातच आता त्यांच्या मृत्यूचे मूळ कारण समोर आले आहे जे ऐकून आता अनेकजण कोड्यात पडले आहेत. हे कारण जरा विचित्र असून एका शुल्लक कारणामुळे ते मृत्यूला बळी पडल्याचे समजले आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
सतत लिपस्टिक लावून काळवंडलेले ओठ काही क्षणात होतील गुलाबी! ‘या’ पद्धतीने घरी तयार घरगुती लीप मास्क
वृत्तानुसार, संजय कपूर पोलो खेळत होते, त्यादरम्यान त्यांच्या तोंडात मधमाशी गेली आणि इथूनच मृत्यूचा खेळ सुरु झाला. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये संजय कपूरच्या मृत्यूसंबंधिची माहिती शेअर केली. तिने लिहिले की पोलो ग्राउंडवर खेळत असताना अचानक एक मधमाशी त्यांच्या तोंडात गेली ज्यांनंतर त्यांची श्वासनलिका बंद केली. त्यांना श्वास घेता येत नव्हता ज्यामुळे त्यांनी मध्यातच आपला खेळ थांबवला पण पुढच्या काही क्षणातच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातील हृदयरोग विभागातील सल्लागार डॉ. प्रवीण कहाळे म्हणाले की, या प्रकरणाचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. परंतु मधमाशीमुळे दोन संभाव्य परिस्थिती उद्भवू शकतात. माहितीनुसार, मधमाशी त्यांच्या तोंडात शिरली असावी आणि श्वासनलिकेपर्यंत पोहोचली. त्यामुळे श्वासनलिका बंद झाली आणि त्यांचा श्वास गुदमरला. ही एक किरकोळ स्थिती आहे, परंतु श्वास गुदमरल्याने शरीराला आणि मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो. जर एखाद्याला आधीच हृदयविकाराचा त्रास असेल तर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तथापि, अशा परिस्थितीत निरोगी हृदय सहसा पंपिंग थांबवत नाही.
दुसरे कारण अॅनाफिलेक्टिक प्रतिक्रिया असू शकते. जर मधमाशीने घशात किंवा तोंडात दंश केला असेल, तर त्याचे विष रक्तात गेल्याने रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो. श्वसनमार्ग फुगू शकतो आणि ऑक्सिजनची पातळी कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत, शरीर अॅलर्जीनविरुद्ध प्रतिक्रिया देते आणि ज्या व्यक्तीला आधीच हृदयविकार आहे किंवा हृदयरोग आहे त्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
हृदयविकाराची लक्षणे
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.