(फोटो सौजन्य: Pinterest)
जगभरात धार्मिक पर्यटनाला फार महत्त्व आहे. लोक श्रद्धेने या ठिकाणांना भेट द्यायला जातात आणि इथे जाऊन इथल्या शांततामय वातावरणाचा अनुभव घेतात. जगभरात शेकडो धार्मिक स्थळे आहेत. प्रत्येक ठिकाणाचा स्वतःचा इतिहास आणि श्रद्धा आहे. अशा ठिकाणी तुम्हाला भक्तांची लांबच लांब रांग पाहायला मिळेल. यातीलच अनेक ठिकाणी आजही देवांचा वास असल्याचे सांगितले जाते. बहुतेक ठिकाणी दैवी खेळ आणि चमत्कार झाल्याचे आपल्याला दिसून येते. परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की, यात अनेक अशी ठिकाणेही आहेत जी देवी-देवतांची निवास्थाने मानली जातात.
विशेषतः अनेक पर्वतांवर आजही देवाचा वास असल्याचे सांगितले जाते. ही पर्वते देवाचे घर आहेत आणि आजही इथे दैवी शक्तीचा आभास होत असल्याचा अनेकांचा दावा आहे. श्रद्धेनुसार, देव-देवतांनी स्वतः या पवित्र पर्वतांना आपले घर बनवले आहे. आजही या ठिकाणी त्यांची उपस्थिती जाणवल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. या ठिकाणी नेहमीच भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. अशात धार्मिक पर्यटनाची आवड असल्यास या पर्वतांना भेट द्यायला अजिबात विसरू नका. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
त्रिकूट पर्वत
जम्मूतील कटरा येथे त्रिकुट पर्वत आहे, जिथे वैष्णोमाता निवास करते. येथे माता राणी महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली या तीन रूपांमध्ये विराजमान आहेत. १२ किलोमीटरची लांब आणि कठीण चढाई पूर्ण केल्यानंतर, भाविक देवीच्या दर्शनासाठी इथे पोहचू शकतात. येथे माता एका अरुंद गुहेत तीन मूर्तींच्या रूपात विराजमान आहे. त्रिकुट पर्वतावर आजही देवीची एक अद्भुत शक्ती जाणवल्याने अनेकांचे म्हणणे आहे, ज्यामुळे लोक इथे मोठ्या संख्येने जातात आणि दैवी शक्तीचा अनुभव घेतात.
कैलास पर्वत
महादेवाचे निवास्थान असलेल्या कैलास पर्वताला कोण ओळखत नाही. याला धर्तीवरील स्वर्गाची उपमा देण्यात आली आहे. तिबेटमध्ये हे पर्वत वसले असून जगातील सर्वात रहस्यमयी ठिकाणांपैकी एक आहे. असे म्हटले जाते की, हा असा एकमेव पर्वत आहे ज्यावर आजवर कुणीही चढू शकलं नाही. भाविक इथे दर्शनासाठी येतात पण हा पर्वत चढला जात नाही तर प्रदक्षिणा घालत त्याची पूजा केली जाते. इथे भगवान शिवाची उपस्थिती जाणवल्याचे सांगितले जाते. इथे गेल्यावर एका वेगळ्याच दुनियेत गेल्यासारखे वाटते अशी मान्यता आहे.
ट्रॅव्हलर्सची पहिली पसंती बनत आहे Naked Flying; काय आहे यात इतकं खास? चला जाणून घेऊया
गोवर्धन पर्वत
वृंदावन धाम जवळील गोवर्धन पर्वत भगवान श्रीकृष्णाशी संबंधित आहे. आजही लोक या पर्वताची परिक्रमा करण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी दूरदूरून वृंदावनात येतात. गोवर्धन महाराजांना स्वतः देवाचा दर्जा दिला जातो आणि त्यांची विधिवत पूजा देखील केली जाते. या पर्वताबाबत एक कथा आहे ज्यानुसार, जेव्हा देव इंद्राने क्रोधीत येऊन वृदावनात वादळ आणि पाऊस आणला तेव्हा यापासून वृदांवन वासियांना वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलला. आजही भक्तांना इथे श्रीकृष्णची उपस्थिती जाणवल्याने म्हटले जाते.