Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्रभर चेहऱ्यावर मुलतानी माती लावून ठेवल्यास काय होईल? चेहऱ्यावर दिसून येतील ‘हे’ परिणाम

Beauty Tips: फार पूर्वीपासून त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी मुलतानी मातीचा वापर केला जातो. मात्र रात्रभर याचा पॅक चेहऱ्यावर लावून ठेवल्यास त्वचेवर कोणते बदल घडून येतात तुम्हाला माहिती आहे का?

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 22, 2025 | 08:15 PM
रात्रभर चेहऱ्यावर मुलतानी माती लावून ठेवल्यास काय होईल? चेहऱ्यावर दिसून येतील 'हे' परिणाम

रात्रभर चेहऱ्यावर मुलतानी माती लावून ठेवल्यास काय होईल? चेहऱ्यावर दिसून येतील 'हे' परिणाम

Follow Us
Close
Follow Us:

आपला चेहरा सुंदर दिसावा असे सर्वांनाच वाटत असते. विशेषतः महिला यासाठी अनेक निरनिराळे प्रयत्न करताना दिसतात. फक्त बाजारातील रासायनिक घटकचं नव्हे तर काही नैसर्गिक घटकांनीही चेहऱ्याचे सौंदर्य वाढवता आणि जपता यते. यातीलच एक प्रभावी आणि नैसर्गिक उपाय म्हणजे मुलतानी माती. फार पूर्वीपासून चेहऱ्यासाठी मुलतानी मातीचा वापर केला जातो. तेलकट त्वचेसाठी मुलतानी माती चांगली मानली जाते. तसेच याच्या नियमित वापरामुळे त्वचेच्या अनेक समस्याही दूर केल्या जातात.

बदलत्या ऋतूनुसार आपल्या चेहऱ्यावरही बदल जाणवू लागतात. खास करून हिवाळ्यात तर चेहऱ्याच्या समस्या आणखीनच वाढतात. या ऋतूत हवेत आद्रता कमी असते ज्यामुळे त्वचा कोरडी, निर्जीव आणि निस्तेज दिसते. अशा परिस्थितीत चेहऱ्याचे तेज वाढवण्यासाठी आपण मुलतानी मातीचा वापर करतो. याचा फेसपॅक चेहऱ्यासाठी फार फायदेशीर ठरतो. मुलतानी मातीमध्ये अनेक खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेला उजळवतात आणि त्वचा हायड्रेटेड आणि निरोगी देखील ठेवण्यास मदत करतात.

प्री-डायबिटीज काय आहे? वेगाने वाढत आहे हा आजार; वेळीच याचे संकेत जाणून घ्या आणि स्वतःचे संरक्षण करा

आता अनेकांना कामाच्या व्यापामुळे दिवसा हा फेसपॅक लावायला वेळ मिळत नाही अशात बहुतेकजण हा फेसपॅक रात्री आपल्या चेहऱ्यावर लावतात. आता रात्री लावलेला हा फेसपॅक जर चुकून रात्रभर तुमच्या चेहऱ्यावर राहिला तर काय होईल असा विचार अनेकांच्या मनात येतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, मुलतानी माती रात्रभर चेहऱ्यावर राहिल्यास चेहऱ्याला याचे कोणतेच तोटे होत नाहीत उलट यामुळे तुमचा चेहरा आणखीन उजळून येईल.

मुलतानी माती फेसपॅकचा वापर कसा करावा?

  • तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मुलतानी माती रात्रभर लावून ठेवू शकता
  • यासाठी एका वाटीत दोन चमचे मुलतानी माती, गुलाबजल आणि कच्चे दूध एकत्र मिसळा
  • आता ही पेस्ट व्यवस्थित चेहऱ्यावर लावा आणि रात्रभर चेहऱ्यावर तशीच राहू द्या
  • सकाळी उठल्यावर पाण्याने चेहरा स्वछ करा
  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हा पॅक 15-20 मिनिटांनीही धुवू शकता
रोजच्या या 5 सवयींमुळे तुमची स्मरणशक्ती हळूहळू होत आहे कमकुवत, वेळीच व्हा सावध नाहीतर महागात पडेल

मुलतानी माती चेहऱ्यावर लावण्याचे फायदे

  • तेलकट त्वचेसाठी मुलतानी माती फायद्याची ठरते
  • मुलतानी मातीचा नियमित वापर चेहऱ्यावरील डाग दूर करण्यास मदत करतात
  • मुलतानी माती त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते
  • याच्या वापराने त्वचेला थंडावा मिळतो आणि त्वचेची पीएच पातळी संतुलित राहते
टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: What will happen if you apply multani mitti on your face overnight lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • lifestyle tips
  • Multani mitti face pack
  • Skin Care

संबंधित बातम्या

२०२५ मध्ये ‘या’ अभिनेत्रींच्या ब्रायडल लुकची सोशल मीडियावर होतील मोठी चर्चा, मिनिमल आणि आकर्षक लुकने वेधले साऱ्यांचे लक्ष
1

२०२५ मध्ये ‘या’ अभिनेत्रींच्या ब्रायडल लुकची सोशल मीडियावर होतील मोठी चर्चा, मिनिमल आणि आकर्षक लुकने वेधले साऱ्यांचे लक्ष

सापांच्या अधिवासातील छोट्या बदलांचा मोठा परिणाम! हाफकिन अभ्यासाला मिळाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार
2

सापांच्या अधिवासातील छोट्या बदलांचा मोठा परिणाम! हाफकिन अभ्यासाला मिळाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

अभिनेत्री प्राजक्ता माळी वयाच्या ३६ व्या वर्षीसुद्धा कायमच दिसते तरुण! जाणून घ्या तिच्या स्लिम फिट फिगर आणि फिटनेसचे रहस्य
3

अभिनेत्री प्राजक्ता माळी वयाच्या ३६ व्या वर्षीसुद्धा कायमच दिसते तरुण! जाणून घ्या तिच्या स्लिम फिट फिगर आणि फिटनेसचे रहस्य

लग्नापासून ते ऑफिसपर्यंत कोणत्याही कार्यक्रमात हातांमध्ये शोभून दिसतील १ ग्रॅम सोन्याचे लेटेस्ट फॅशन सुंदर गोठ, पहा डिझाईन
4

लग्नापासून ते ऑफिसपर्यंत कोणत्याही कार्यक्रमात हातांमध्ये शोभून दिसतील १ ग्रॅम सोन्याचे लेटेस्ट फॅशन सुंदर गोठ, पहा डिझाईन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.