(फोटो सौजन्य: istock)
मधुमेह हा एक गंभीर आजार आहे, जो जगभरात एक चिंतेचा विषय बनला आहे. विशेषत: भारतात गेल्या काही काळापासून याची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. पूर्वी वयोवृद्धांना होणारा हा आजार आता तरुणांनाही जडू लागला आहे. अशात याची लक्षणे वेळीच जाणून घेणे फार गरजेचे ठरते. अनेकांना हे ठाऊक नाही पण मधुमेह होण्यापूर्वी प्री-डायबेटिस नावाची एक अवस्था असते.
या काळात रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा जास्त होते परंतु ती मधुमेहाच्या पातळीपर्यंत पोहोचत नाही. अशा स्थितीत मधुमेहाची लक्षणे दिसू लागतात. जेव्हा शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा उपलब्ध इन्सुलिन वापरू शकत नाही तेव्हा मधुमेह सुरू होतो. त्यामुळे रक्तात ग्लुकोज जमा होण्यास सुरुवात होते. या प्रारंभिक अवस्थेला प्री-डायबेटिस असे म्हणतात. हा प्री-डायबिटीज आपल्या शरीराला काही संकेत देत असतो ज्यांना वेळीच जाणून घेतल्यास तुम्ही डायबिटीजचा धोका टाळू शकतो.
रोजच्या या 5 सवयींमुळे तुमची स्मरणशक्ती हळूहळू होत आहे कमकुवत, वेळीच व्हा सावध नाहीतर महागात पडेल
शरीर देत असते प्री-डायबिटीजचे संकेत
प्री-डायबिटीजची कारणे
कसा करता येईल प्री-डायबिटीजपासून बचाव?
रक्तातील साखरेची पातळी वाढताच सतर्क राहणे ही बचावाची पहिली पायरी आहे. सतर्क राहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या काही पद्धतींचा अवलंब करू शकता.
पुरुषांच्या या सवयींवर लगेच भाळतात महिला; आजच अवगत करा ‘हे’ गुण नाहीतर आयुष्यभर सिंगल रहाल
नियमित व्यायाम करणे
व्यायाम हा आपल्या आरोग्यासाठी फार फायद्याचा असून यामुळे आपण अनेक आजारांना दूर पळवू शकतो. नियमित व्यायाम केल्याने इन्सुलिनचे कार्य सुधारते. यामुळे ग्लुकोज रेगुलेशन मध्ये मदत मिळते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते. म्हणून, ब्रिस्क वाॅक, जॉगिंग, रनिंग, योगासने, ध्यानधारणा, स्ट्रेंथ ट्रेनिंग, कार्डिओ इत्यादी काही प्रकारचे वर्कआउट करा. प्री-डायबिटीस टाळण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.
हेल्दी डाएट
कार्बोहायड्रेट आणि साखर थेट मधुमेहाला प्रोत्साहन देतात. त्याच वेळी, प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे युक्त आहार साखरेची पातळी नियंत्रित करून कमी करण्यास उपयुक्त आहे. साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सॅच्युरेटेड फॅट, प्रोसेस फूड आणि ट्रान्सफॅटयुक्त पदार्थांच्या सेवनापासून दूर राहिले पाहिजे. हे असे पदार्थ हळूहळू आपल्या शरीराला पोखरून काढत असतात.
वेट लॉस
टाईप 2 मधुमेह होण्यात लठ्ठपणाची मोठी भूमिका असते. हे प्रमुख रिस्क फॅक्टरपैकी एक आहे. BMI वाढल्याने प्री-डायबिटीज आणि मधुमेहाचा धोकाही वाढतो. लठ्ठपणामुळे, स्नायू आणि इतर ऊतक त्यांच्या स्वतःच्या इन्सुलिन हार्मोन प्रति रेजिस्टेंट बनतात. लठ्ठपणामुळे स्ट्रोक आणि हायपरटेन्शनचा धोकाही वाढतो. एकूणच, हेल्दी डाएट घेऊन आणि वजन कमी करून प्री-डायबिटीज टाळता येणे शक्य होते.