
हिवाळ्यात वाढलेला सर्दी खोकला बराच होत नाहीये? मग स्वयंपाक घरातील लसूणचे 'या' पद्धतीने करा सेवन
लसूण खाल्ल्याने शरीराला होणारे फायदे?
सर्दी खोकला कमी करण्यासाठी उपाय?
घशात वाढलेली खवखव कमी करण्यासाठी काय करावे?
राज्यासह संपूर्ण देशभरात कडाक्याची थंडी पडली आहे. थंड वातावरणात संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. सर्दी, खोकला, ताप इत्यादी साथीच्या आजारांची लागण झाल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. बऱ्याचदा थंडीच्या दिवसांमध्ये उद्भवणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र याच समस्या कालांतराने वाढू लागतात. नाकातून पाणी येणे, घसा खवखवणे, नाक झोंबणे यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात. अशावेळी लसूण पाकळीचे नियमित सेवन करावे. लसूण संपूर्ण शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे. जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी लसूणचा वापर केला जातो. लसूण फोडणीमध्ये टाकल्यास पदार्थाची चव वाढण्यासोबतच सुगंध वाढतो. त्यामुळे रोजच्या जेवणात नियमित भरपूर लसूण टाकावा. लहान मुलांना लसूण खायला अजिबात आवडत नाही. अशावेळी मुलांना वेगवेगळ्या पदार्थांमधून लसूण खाण्यास द्यावी. (फोटो सौजन्य – istock)
लसूण हा पदार्थ सर्दी खोकल्यावर कायमच प्रभावी मानला जातो. मागील अनेक पिढ्यांपासून दैनंदिन आहारात आणि औषधांसाठी लसूणचा वापर केला जात आहे. यामध्ये नैसर्गिक जंतुनाशक आणि दाह कमी करणारे गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. सर्दी खोकला झाल्यानंतर शरीरात विषाणू वाढू लागतात. हे विषाणू संपूर्ण शरीरात पसरल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी करून टाकतात. ज्यामुळे कायमच थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लसूण खावी. घशात खवखव, जडपणा किंवा कफ साचून राहिल्यास लसूण खावा. यामध्ये असलेले उष्ण घटक शरीरातील घाण बाहेर काढून टाकतात.
फुफ्फुसांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी लसूणचे सेवन करावे. यामुळे श्वसनमार्ग मोकळा होतो. थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणात सतत काहींना काही बदल होत असतात. या बदलांकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. थंडी वाजणे, डोके दुखणे किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर कच्ची लसूण पाकळी चावून खावी. याशिवाय सकाळी उठल्यानंतर मधात मिक्स केलेली लसूण खाल्ल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील आणि चेहऱ्यावर चमकदार ग्लो येईल.
लसूणमध्ये अॅलिसिन नावाचा महत्वपूर्ण घटक आढळून येतो. ज्यामुळे सर्दी खोकल्यापासून लवकर सुटका मिळते. तसेच लसूणमध्ये जंतुनाशक आणि अँटी व्हायरल, विटामिन सी, विटामिन बी ६, मॅंगनीज, सेलेनियम आणि थोड्या प्रमाणात लोह व कॅल्शियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. यामध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट्स शरीरातील दाह कमी करतात. घसा दुखणे आणि अंगदुखीच्या समस्येपासून लगेच आराम मिळेल.
गर्भावस्थेत वाढतोय उच्च रक्तदाब धोका! ‘कामा आणि ऑलब्लेस’मधील अभ्यासात करण्यात आला धक्कादायक खुलासा
रक्तात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी नियमित एक पाकळी लसूण चावून खावी. यामुळे रक्तात जमा झालेली घाण स्वच्छ होते. तसेच रक्ताच्या गुठळ्या झाल्यानंतर रक्त पुन्हा पातळ करण्यासाठी लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो. पण अतिप्रमाणात लसूण खाल्ल्यास शरीरात जळजळ वाढू शकते. त्यामुळे शरीरास सहन होईल इतक्या प्रमाणात लसूणचे सेवन करावे.
Ans: संसर्गाशी लढण्यास मदत करते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
Ans: दोन्ही फायदेशीर आहेत. कच्चा लसूण रोगप्रतिकारशक्तीसाठी उत्तम, तर शिजवलेला लसूण चवदार आणि पचनासाठी चांगला असतो.
Ans: अतिसेवन केल्यास त्रास होऊ शकतो; त्यामुळे त्याचे योग्य प्रमाण आणि शरीरातील प्रतिक्रिया तज्ज्ञांच्या सल्ल्याने पाळणे महत्त्वाचे आहे.