आरोग्यासंबंधित कोणते आजार उद्भवल्यानंतर कोणत्या रसाचे करावे सेवन
धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीरात वाढलेला तणाव आरोग्य बिघडण्यासाठी कारणीभूत राहतो. आहारात निर्माण झालेली पोषक घटकांची कमतरता, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे शरीराला हानी पोहचते. शरीराला आजाराची लागण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित काही सामान्य समस्या उद्भवू लागतात. मात्र समस्यांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये शरीर हायड्रेट असणे आवश्यक आहे. मात्र शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतरर किंवा साथीच्या आजारांची लागण झाल्यानंतर शरीरात बदल होऊ लागतात.(फोटो सौजन्य – iStock)
लघवी करताना आग होते? ‘हे’ घरगुती उपाय केल्यास तात्काळ मिळेल आराम, मुतखडा पडेल लघवीतून बाहेर
अशक्तपणा, थकवा किंवा उलट्या, मळमळ होण्यास सुरुवात झाल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. यामुळे शरीरात झालेल्या आजाराचे निदान करणे सोपे जाते. अनेकदा आजारी असल्यानंतर फळांचा रस पिण्याचा सल्ला डॉक्टरांसह इतर सगळेच देतात. पण कोणत्या फळांचा रस कोणत्या आजारावर प्रभावी ठरतो, हे आपल्यातील अनेकांना माहित नसेल. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणत्या आजाराची लागण झाल्यानंतर कोणत्या रसाचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तयार जाणून घेऊया.
भूक कमी झाल्यानंतर शरीराचे वजन हळूहळू कमी होऊ लागते. कमी झालेल्या भुकेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे पोटभर अन्नपदार्थांचे सेवन करावे. भूक कमी झाल्यानंतर खाण्यापिण्याची इच्छा होत नाही. कोणताही पदार्थ बनवल्यानंतर भूक नाही म्हणून खाणे टाळले जाते. मात्र या समस्येपासून सुटका मिळ्वण्यासाठी लिंबाच्या रसाचे सेवन करावे. लिंबाचा रस सैंधव मीठ टाकून उपाशी पोटी प्यायल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. भूक वाढवण्यासाठी तुम्ही लिंबू, गाजर, बीट, पालक, तुळशी, कडूलिंब, बेलाची पानं आणि कोबीच्या रसाचे सेवन करू शकता. या रसाच्या सेवनामुळे निस्तेज झालेली त्वचा पुन्हा एकदा चमकदार आणि सुंदर होईल.
कावीळ झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते. याशिवाय डोळे, नखं पिवळे पडून जातात. कावीळ झाल्यानंतर द्राक्ष, सफरचंद आणि मोसंबीचा ज्यूस पिण्याचा सल्ला दिला जातो. या रसाच्या सेवनामुळे शरीरातील कावीळ बरी होण्यास मदत होते. या रसांशिवाय तुम्ही गाजर, पालक, तुळशी, द्राक्ष आणि मोसंबी इत्यादी भाज्या आणि फळांच्या रसाचे सेवन करावे.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान ठरेल कच्ची पपई, नियमित सेवन केल्यास शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे
त्वचेच्या सौंदर्य वाढवण्यासाठी महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. मात्र केमिकल प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचे सेवन करून त्वचेचे सौंदर्य वाढवावे. दैनंदिन आहारात गाजर, कलिंगड, कांदा, तुळशीच्या रसाचे सेवन केल्यामुळे त्वचा आतून स्वच्छ होते आणि त्वचेचे सौंदर्य वाढते. नारळाच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे त्वचा ताज़ीटवटवीत दिसते.