मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान ठरेल कच्ची पपई
भारतासह जगभरात मधुमेहासारख्या गंभीर आजाराने अनेक लोक त्रस्त आहेत. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू लागते. शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे शरीरातील इतर अवयवांना सुद्धा इजा होते. त्यामुळे मधुमेहाची लक्षणे शरीरात दिसू लागल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. यामुळे शरीरात वाढलेली साखरेची पातळी नियंत्रणात राहील. याशिवाय मधुमेह झाल्यानंतर डॉक्टरांच्या गोळ्या औषधांसोबतच घरगुती पदार्थांचे सुद्धा सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. मधुमेहाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे दृष्टी जाणे, जखम लवकर बरी न होणे, तणाव इत्यादी अनेक समस्या उद्भवू शकतात.(फोटो सौजन्य-istock)
शरीरात वाढलेला मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी रोजच्या कच्ची पपई खावी. कच्ची पपई खाल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तसेच आरोग्याला देखील अनईक फायदे होतात. कच्ची पपई हे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक फळ आहे. मात्र आपल्यातील अनेकांना कच्ची पपई खाल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात हे माहित नसेल. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कच्ची पपई खाल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी कच्ची पपई खूप फायदेशीर आहे. यामध्ये पपेन नावाचे एंजाइम असते जे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते. मधुमेहाच्या रुग्णांनी नियमितपणे कच्च्या पपईचे सेवन केले तर रक्तातील साखरेचे प्रमाण कायमच नियंत्रणात राहील आणि आरोग्यासंबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही.
कच्च्या पपईचे सेवन केल्यामुळे बिघडलेली पचनसंस्था मजबूत होते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते. कच्ची पपई खाल्यामुळे शरीरात साचून राहिलेले हानिकारक घटक बाहेर पडून जातात आणि शरीराची पचनक्रिया सुधारते. त्यामध्ये असलेले फायबर आणि पपेन पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता, गॅस आणि इतर पचन समस्या कमी करते.
वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी रिकाम्या पोटी कच्च्या पपईचे सेवन करावे. कच्च्या पपईच्या सेवनामुळे शरीरातील चरबी वितळून जाते आणि शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते. यामध्ये असलेले फायबर आणि पाण्याचे प्रमाण शरीराची भूक नियंत्रणात ठेवते. तसेच पपई किंवा पपईचा रस प्याल्यास लवकर भूक लागत नाही.
कच्ची पपई त्वचा सुधारते. कारण त्यामध्ये असलेले विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स, त्वचा निरोगी आणि चमकदार बनवतात. कच्च्या पपईची पेस्ट बनवून त्यात दूध आणि हळद घालून चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे चेहऱ्यावर खूप चमक येते. निस्तेज किंवा कोरडा झालेला चेहरा सुधारण्यासाठी पपईचे नियमित सेवन करावे.