किडनी स्टोनच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय
चुकीच्या जीवनशैली, जंक फूडचे अतिसेवन, शरीरात निर्माण झालेला पाण्याचा अभाव, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे रोजच्या आहारात शरीराला पचन होणाऱ्या पौष्टिक आणि पचनास हलक्या असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. किडनीसंबंधित समस्या वाढू लागल्यानंतर शरीराला हानी पोहचते. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर किंवा जास्त वेळ लघवी थांबवून ठेवल्यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता असते. किडनी स्टोन झाल्यानंतर पोटामध्ये असह्य वेदना होऊ लागतात. या वेदनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे स्टोनचा आकार वाढतो आणि किडनीचे आरोग्य बिघडते.(फोटो सौजन्य – iStock)
मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान ठरेल कच्ची पपई, नियमित सेवन केल्यास शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे
किडनी स्टोन झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये जाणवणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे स्टोनचा आकार वाढतो. मोठ्या आकाराचा स्टोन काढण्यासाठी शस्त्रक्रियाच करावी लागते तर आकाराने लहान असलेला किडनी स्टोन घरगुती उपाय करून पडून जातो. किडनी स्टोनची समस्या उद्भवू लागल्यानंतर लघवी करताना जळजळ होणे, पाठदुखी, ओटीपोटात तीव्र वेदना, आणि लघवीतून रक्त येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय केल्यास लघवीतून किडनी स्टोन बाहेर पडून जाईल आणि आराम मिळेल.
जवाच्या पाण्यात असलेले गुणधर्म किडनीमधील स्टोन बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतो. याशिवाय किडनीमध्ये असलेले टॉक्सिन्स आणि स्टोन बाहेर पडून जाण्यासाठी मदत होते. यासाठी एक ग्लास पाण्यात २ चमचा जव टाकून काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर तेच पाणी टोपात टाकून व्यवस्थित उकळवून घ्या. उकळवून घेतलेले पाणी तुम्ही थंड करून पिऊ शकता. या पाण्याचे सेवन करून किडनीमधील स्टोन एक दोन आठवड्यात बाहेर निघून जाईल. या पाण्याच्या सेवनामुळे किडनीचे सर्व आजार बाहेर होतात.
आयुर्वेदामध्ये कुळीथ दाण्याला विशेष महत्व आहे. या दाण्याच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक घटक देखील मिळतात. कुळीथ दाण्याच्या सेवनामुळे किडनीमधील स्टोन लघवीवाटे बाहेर पडून जाईल. आठवड्यातून दोन ते तीन वेळा कुळीथ डाळीचे सेवन केल्यास किडनी स्टोनचा धोका कमी होतो. याशिवाय दैनंदिन आहारात कुळीथ डाळीचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे.
लिंबामध्ये असलेले घटक आरोग्याच्या दृष्टीने अतिशय प्रभावी आहेत. लिंबू पाण्याचे सेवन केल्यामुळे किडनीमधील स्टोन विरघळून जातो. शिवाय शरीराला अनेक फायदे देखील होतात. यामध्ये आढळून येणारे सायट्रिक ऍसिड किडनीमधील साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतो. त्यामुळे किडनी स्टोनच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन करावे.