फोटो सौजन्य - Social Media
डोळ्यांच्या आरोग्यासाठी आपण सदैव काळजीपूर्वक राहिले पाहिजे. डोळे शरीरातील एक महत्वाचे ज्ञानेंद्रिय आहेत. डोल्याशिवाय जगणे कठीण आहे. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. जगभरात असंख्य माणसे डोळ्यांच्या आजाराने तसेच विकारांनी त्रस्त आहेत. मायोपिया तसेच हायपरपिया सारख्या समस्यांना अगदी लहान मुलेही झुंज देत आहेत. अशामध्ये बहुतेक लोकं चष्म्याकडे वळत आहेत. परंतु, काही लोकं अशी आहेत कि, ज्यांना कशाची निवड करावी? चष्मा कि लेन्स? याचा उत्तर अद्याप सापडत नाही आहे. अशा लोकांनी कोणता पर्याय डोळ्यांसाठी चांगला आहे? यावर आधी संशोधन करणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊयात, कोणता पर्याय आहे डोळ्यांसाठी बेस्ट?
हे देखील वाचा : तुमच्या ऑफिसचे टेबल सजवण्यासाठी वापरा या अनोख्या टिप्स
चष्मा हा अतिशय सामान्य आणि सुरक्षित पर्याय आहे. चष्मा वापरण्यासही फार सोपा आहे. चष्मा घालण्यासाठी कोणत्याही प्रकारची थेट हाताळणी आवश्यक नसते. त्यामुळे डोळ्यांना संसर्ग होण्याची भीती नसते. तसेच चष्मा घालायला इतर पर्यायांच्या तुलनेत फार सोपे असते. बाजारात विविध फॅशन फ्रेम्स उपल्बध आहेत. याची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे. आता चष्मा घालणारे लोकं पूर्वीसारखे जास्त अभ्यासू न दिसता, त्यांचा चष्मा त्याच्या रुपाला चार चांद लावत आहेत. तसेच, चष्मा घालणे म्हणजे डोळ्यांना थेट धूळ, प्रदूषण आणि हानिकारक यूव्ही किरणांपासून संरक्षण मिळते.
कॉन्टॅक्ट लेन्स दिसण्याच्या बाबतीत फार आकर्षक ठरतात. आपला साजेशा साधा लुक जपण्यासाठी काही लोकं कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात. तर काही लोकं आपल्या लुकला आणखीन आकर्षक बनवण्यासाठी विविध रंगांचे लेन्स वापरतात. लेन्स खेळाडू आणि सक्रिय जीवनशैली असणाऱ्या लोकांसाठी सोयीच्या असतात कारण त्यात घसरण्याचा किंवा तुटण्याचा धोका नसतो. काही लेन्स डोळ्यांच्या रंगात बदलही आणू शकतात, ज्यामुळे विविध लूक मिळवता येतो.
हे देखील वाचा : मैदा नाही तर यावेळी साबुदाण्यापासून तयार करा मोमो, व्हायरल रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा
दोन्ही पर्याय चांगले आहेत. आपल्या सोयीनुसार, आरोग्यनुसार तसेच जीवनशैलीनुसार पर्याय निवडणे कधीही उत्तम ठरेल. आरामदायी आणि दीर्घकाळ चालणाऱ्या पर्यायांच्या शोधात आहात तर चष्मा हा चांगला पर्याय आहे. जर तुम्ही खेळाडू आहात किंवा फॅशन शोज वगैरे करता तर कॉन्टॅक्ट लेन्सचा पर्याय निवडणे बरे पडेल. पण डोळ्यांच्या बाबतीत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी डोळ्यांच्या तज्ञाचा सल्ला घेणे गरजेचे आहे.






