हृदयाच्या आरोग्य कायमच निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या चहाचे करावे सेवन! चहा पिण्याआधी नक्की वाचा 'या' गोष्टी
मानवी शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे हृदय. हृदयाचे आरोग्य कायम निरोगी ठेवणे आवश्यक आहे. पण बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीराची योग्य काळजी घेतली जात नाही. शारीरिक हालचालींचा अभाव, मानसिक तणाव, आहारात होणारे बदल, अपुरी झोप, बिघडलेली जीवनशैली, बिघडलेली पचनक्रिया इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. हृदयाची पुरेशी काळजी न घेतल्यामुळे शरीरावर गंभीर परिणाम दिसून येतात. शरीरात व्यायाम आणि शारीरिक हालचालींचा अभाव निर्माण झाल्यानंतर आरोग्य बिघडते. याशिवाय शरीरात वाढलेल्या कोलेस्टरॉलमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात, ज्यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळे हृदय कायम निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आणि पोषण आहार घेणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
सकाळी उठल्यानंतर अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाचे होते तर काहींना सतत कॉफी प्यावा लागतो. पण वारंवार दुधाच्या चहाचे सेवन केल्यामुळे शरीरात ऍसिडिटी वाढण्याची जास्त शक्यता असते. गरम पाणी किंवा ग्रीन टी, हर्बल टी इत्यादी पेय शरीरासाठी फायदेशीर ठरतात. पण यातील कोणती पेय हृदयाच्या आरोग्यासाठी चांगली ठरतात, हे आपल्यातील अनेकांना माहित नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या चहाचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
शरीरासाठी ग्रीन टी अतिशय महत्वाचा आहे. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी ग्रीन टी चे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेली विषारी घाण बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होते. ग्रीन टी मध्ये कॅटेचिन आणि अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. चयापचय सुधारण्यासाठी मदत होते. शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी ग्रीन टी चे सेवन करावे. आतड्यांमध्ये साचलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी ग्रीन टी चे सेवन करावे.
सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याऐवजी आयुर्वेदिक मसाल्यांचा वापर करून बनवलेल्या चहाचे सेवन करावे. हा चहा बनवताना तुम्ही काळीमिरी, दालचिनी, आलं, हळद किंवा रेडिमेड मिळणाऱ्या हर्बल टी चे सेवन करू शकता. हर्बल टी चे सेवन केल्यामुळे पोट स्वच्छ होते. शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी हर्बल टी चे उपाशी पोटी सेवन करावे. हर्बल टीमध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी- बॅक्टेरियल गुणधर्म शरीर, त्वचा आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर ठरताता.
हृदयासाठी सर्वोत्तम चहा:
ग्रीन टीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहेत. हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
कोलेस्ट्रॉल म्हणजे काय?
कोलेस्ट्रॉल हा तुमच्या रक्तातील एक नैसर्गिक स्निग्ध पदार्थ (लिपिड) आहे, जो शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये आढळतो.