हृदयरोग किंवा उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात करावा 'या' मिठाचा समावेश
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. हल्ली कामाच्या धावपळीमध्ये आरोग्याकडे लक्ष देण्यास जास्त वेळ मिळत नाही. सतत काम करत राहिल्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. पण असे केल्यामुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होण्याची जास्त शकता असते. दिवसभरात खाल्लेल्या अन्नपदार्थांचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. अननपदार्थांमधील तेल, मसाला, मीठ इत्यादी प्रत्येक गोष्टीचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. काहींना जेवणात खूप जास्त मीठ खाण्याची सवय असते. पण आहारात मीठ किंवा इतर कोणत्याही गोड पदार्थांचे अतिसेवन केल्यास शरीराला हानी पोहचते.(फोटो सौजन्य – istock)
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना मिठाचा वापर केला जातो. मीठ जेवणातील अविभाज्य घटक आहे. जेवणात जर मीठ नसेल तर पदार्थाची चव अजिबात लागणार नाही. जेवण अतिशय बेचव लागेल. पण काहींना जेवणातील सर्वच पदार्थांमध्ये खूप जास्त मीठ खाण्याची सवय असते. अतिप्रमाणात मिठाचे सेवन केल्यामुळे हार्ट अटॅक, उच्च रक्तदाब आणि संधिवाताची समस्या निर्माण होते. जेवणात खालेल्या अतिमीठाचा थेट परिणाम हृदयावर दिसून येतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हृदयाच्या आरोग्यासाठी कोणते मीठ गुणकारी आहे? मिठाचे प्रकार किती? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
दैनंदिन आहारात लो-सोडियम युक्त मिठाचे सेवन करावे. लो-सोडियम युक्त मिठाच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. या मिठामध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे शरीरात पोटॅशियम कायमच संतुलित राहते. रक्तवाहिन्यांना आराम देण्यासाठी पोटॅशियम अतिशय महत्वाचे ठरते. त्यामुळे उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात लो-सोडियम मिठाचे सेवन करावे. पण किडनीसंबंधित आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी लो-सोडियम मीठ खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा.
सैंधव मिठाला उपवासाचे मीठ असे सुद्धा म्हंटले जाते. हे मीठ सरबत किंवा डिटॉक्स पेय बनवताना प्रामुख्याने वापरले जाते. सैंधव मिठामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम यांसारखी इतर खनिजे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. तसेच या मिठात सोडियमचे प्रमाण अतिशय कमी असते. त्यामुळे दैनंदिन वापरात तुम्ही सैंधव मिठाचा समावेश करू शकता.
दैनंदिन आहारात खूप जास्त मीठ खाल्ल्यास शरीरावर गंभीर परिणाम होतात. यामुळे हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा झटका, हृदय निकामी होणे आणि हार्ट स्ट्रोक इत्यादी गंभीर समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आहारात चवीनूसारच मिठाचे सेवन करावे. मिठामध्ये असलेल्या सोडियममुळे किडनी निकामी होऊन जाते. याशिवाय जास्त मीठ खाल्ल्यानंतर सतत तहान लागणे किंवा वारंवार लघवीला जावे लागते. तसेच मिठामध्ये असलेल्या उच्च सोडियम क्लोराईडमुळे हृदयावर जास्तीचा तणाव येतो.
हृदयरोग्यांसाठी कोणते मीठ सर्वोत्तम आहे?
हृदयरोग्यांसाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे त्यांच्या एकूण दैनंदिन सोडियम सेवनावर मर्यादा घालणे, कारण कोणत्याही मीठाचे जास्त सेवन केल्याने रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयाची स्थिती बिघडू शकते.
कोणत्या मिठाचे सेवन आहारात करू नये?
लोणचे, पापड, खारट नट आणि चिप्स यांसारखे जास्त मीठ असलेले प्रक्रिया केलेले आणि पॅकेज केलेले पदार्थ टाळा, कारण ते सोडियमच्या सेवनात लक्षणीय योगदान देतात.
या क्षारांची शिफारस का केली जाते?
काही क्षारांमध्ये नियमित टेबल मिठापेक्षा कमी सोडियमचे प्रमाण असल्याचे मार्केटिंग केले जाते, जे त्यांच्या सोडियम सेवनाचे निरीक्षण करणाऱ्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकते.