Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breast Cancer चा सर्वाधिक धोका कोणाला? 40 व्या वर्षी स्वतःची तपासणी का करावी

ब्रेस्ट कॅन्सर जगभरात वाढताना दिसून येत आहे. मात्र ही जोखीम तुम्हाला आधीही कळू शकते आणि त्यासाठी तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षापासून याची चाचणी करणे आवश्यक आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ही चाचणी करणे किती आणि का आवश्यक ठरते याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 15, 2024 | 12:05 PM
कॅन्सरची तपासणी कधी करावी

कॅन्सरची तपासणी कधी करावी

Follow Us
Follow Us:

स्तनाचा कर्करोग हा जगभरातील स्त्रियांना प्रभावित करणाऱ्या सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक आहे आणि तुमचे जोखीम घटक जाणून घेतल्याने तुम्हाला प्रतिबंधात्मक उपाय करण्यात मदत होऊ शकते. स्तनाचा कर्करोग कोणत्याही वयात होऊ शकतो, परंतु काही घटक जोखीम वाढवतात. विशेषत: तुमचे वाढते वय. 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांना जास्त धोका असतो, म्हणूनच या वयाच्या आसपास मॅमोग्राम सारखी नियमित तपासणी करण्याची शिफारस केली जाते.

तर, स्तनाच्या कर्करोगाचा सर्वाधिक धोका कोणाला आहे? काही महत्वाचे घटक काय आहेत याबाबत डॉ. अजय शहा, व्यवस्थापकीय संचालक, न्यूबर्ग अजय शाह प्रयोगशाळा यांनी माहिती दिलीये. (फोटो सौजन्य – iStock)   

वय

कॅन्सरच्या चाचणीसाठी वय घटकही आहे महत्त्वाचा

वर सांगितल्या नुसार 40 पेक्षा जास्त वयाच्या महिलांना जास्त धोका असतो. 50 किंवा त्याहून जास्त वयाच्या महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग असल्याचे दिसून येते, तरीही संभाव्य धोका टाळण्यासाठी लवकर तपासणी करून घेणे महत्वाचे आहे. साधारण वयाची चाळीशी आल्यानंतर प्रत्येकाला आपली स्वयंचाचणी करून घेणे आवश्यक आहे. कारण कधी कॅन्सरसारखा आजार उद्भवू शकतो याबाबत काहीच सांगता येत नाही. 

हेदेखील वाचा – भारतात 30 पैकी एका महिलेला स्‍तनाचा कर्करोग, लक्षणे कशी दिसतात?

कौटुंबिक इतिहास

कॅन्सरचा कौटुंबिक इतिहास असेल तर चाचणी करावीच

जर आई, बहीण किंवा मुलगी सारख्या जवळच्या नातेवाईकांपैकी कुणाला स्तनाचा कर्करोग झालेला असेल तर तुम्हाला तो होण्याची शक्यता वाढते. स्तनाच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास खासकरून जर तरुण वयात झाल्याचे निदान झाले असल्यास तुमच्या बाबतीत अनुवांशिक धोका जास्त आहे. त्यामुळे वेळीच चाचणी करावी. 

आनुवंशिक घटक

काही लोकांच्या बाबतीत, बीआरसीए1 आणि बीआरसीए2 सारख्या विशिष्ट जनुकांमध्ये बदलाचा वारसा मिळतो, ज्यामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. तुमच्या कुटुंबाच्या बाबतीत असे काही असल्यास अनुवांशिक चाचणीचा विचार केला जाऊ शकतो. वंशात कोणाला कॅन्सर होऊन गेला असेल आणि तुम्हाला कल्पनाही नसेल तर त्यामुळे आधीच तुम्ही कॅन्सरची तपासणी करून घ्यावी 

जीवनशैली

धूम्रपान, मद्यपान, व्यायामाचा अभाव, जास्त वजन अशा जीवनशैली संबंधित घटकांमुळे स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. निरोगी जीवनशैली ठेवल्यास धोका कमी होऊ शकतो. रोजच्या जगण्यात तुम्ही वेळेवर जेवत नसाल अथवा तुम्हाला दारू पिण्याची वा सिगारेट ओढण्याची वाईट सवय असेल तर वेळीच त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. 

हेदेखील वाचा – Breast Cancer होऊ शकतो पूर्ण बरा, या पद्धतीने करा स्वतःची तपासणी

हार्मोन एक्सपोजर 

तिशीनंतर कॅन्सरची शक्यता अधिक वाढते

हार्मोन रीप्लेसमेन्ट थेरपीचा (एचआरटी) दीर्घकालीन वापर किंवा वयाची 30 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पहिले मूल झाल्यास स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. या गोष्टींचा विचार करता, वयाची 40 वर्षे पूर्ण झालेल्या महिलेने चाचण्या करून घेण्यास सुरूवात करणे गरजेचे आहे. लवकर निदान झाल्याने उपचार यशस्वी होण्याची शक्यता वाढते. मॅमोग्राम्स अर्थात छातीचा एक्स-रे ज्यामध्ये जाणवण्या पेक्षा लहान असलेले ट्यूमर्स लक्षात येतात. स्तनाच्या कर्करोगाची लवकर माहिती मिळाल्यास तो लहान असताना आणि पसरलेला नसताना त्याच्या वर केलेले उपचार यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते आणि त्यामुळे जीव वाचू शकतात.

का करावी चाचणी?

स्तनाच्या कर्करोगाची चाचणी करणे का आवश्यक आहे?

बऱ्याच महिलांना धोका जाणवतदेखील नसेल परंतु कुणालाही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो, आणि त्याची लक्षणे सुरुवातीच्या स्थितीत असताना जाणवत नाहीत. तुमच्या संरक्षणासाठी नियमित तपासणी हा उत्तम पर्याय आहे. तुमच्या कुटुंबात जरी कुणाला स्तनाचा कर्करोग झाला नसेल किंवा संभाव्य धोके नसले तरी वयाची 40 वर्षे पूर्ण झाल्यानंतर कर्करोगाचे लवकर निदान व्हावे म्हणून मॅमोग्राम करून घेतल्याने उपचार करणे सोपे आणि अधिक परिणामकारक ठरते.

थोडक्यात, 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रिया, विशेषत: ज्यांना कौटुंबिक इतिहास किंवा जीवनशैलीच्या समस्यांसारख्या जोखीम घटक आहेत, त्यांनी स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीला प्राधान्य दिले पाहिजे. ही एक साधी पायरी आहे जी तुमचे जीवन वाचवू शकते. आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि 40 व्या वर्षी स्वतःची तपासणी करा.

Web Title: Who has breast cancer risk the most why we need to check self test after 40 age

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2024 | 12:05 PM

Topics:  

  • Breast Cancer
  • Health News

संबंधित बातम्या

भरती, भरती, भरती! Health Department मध्ये ५००० नव्या पदांना मंत्रिमंडळाची मान्यता; मोठी घोषणा
1

भरती, भरती, भरती! Health Department मध्ये ५००० नव्या पदांना मंत्रिमंडळाची मान्यता; मोठी घोषणा

National Doctors Day : डॉक्टर गुगलवर विश्वास ठेवताय?आरोग्यासाठी ठरु शकते धोकादायक; तज्ज्ञांकडून महत्त्वपूर्ण इशारा
2

National Doctors Day : डॉक्टर गुगलवर विश्वास ठेवताय?आरोग्यासाठी ठरु शकते धोकादायक; तज्ज्ञांकडून महत्त्वपूर्ण इशारा

गंभीर जीवाणूजन्य संसर्गांवर प्रभावी उपचारासाठी BDR फार्माचे ‘XATRONEM-AV’ बाजारात दाखल, अँटिबायोटिक संयोजनाचे इंजेक्शन
3

गंभीर जीवाणूजन्य संसर्गांवर प्रभावी उपचारासाठी BDR फार्माचे ‘XATRONEM-AV’ बाजारात दाखल, अँटिबायोटिक संयोजनाचे इंजेक्शन

Breast Cancer: ब्रेस्ट कॅन्सरचे निदान म्हणजे शेवट नाही! सुरुवातीच्या टप्प्यातील कॅन्सरवर मात करण्याचे ५ प्रभावी मार्ग
4

Breast Cancer: ब्रेस्ट कॅन्सरचे निदान म्हणजे शेवट नाही! सुरुवातीच्या टप्प्यातील कॅन्सरवर मात करण्याचे ५ प्रभावी मार्ग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.