Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीखंड आणि कडुलिंब का खाल्ले जाते, काय सांगते आयुर्वेदशास्त्र जाणून घ्या

हिंदू धर्मामध्ये सण उत्सवाला जसे धार्मिक महत्त्व आहे. तसेच आयुर्वेदात देखील त्याला विशेष महत्त्व आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीखंड आणि कडुलिंब खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 19, 2026 | 03:50 PM
फोटो सौजन्य-pinterest

फोटो सौजन्य-pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीखंड आणि कडुलिंब का खाल्ले जाते
  • आयुर्वेदशास्त्रात काय आहे महत्त्व
  • श्रीखंड आणि कडुलिंब खाण्याचे धार्मिक आणि आयुर्वेदिक महत्त्व
आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सण उत्सवाला महत्त्व आहे. प्रत्येक सण उत्सवाचे जसे धार्मिक महत्त्व आहे. तसे धर्मशास्त्राने आयुर्वेदशास्त्राशी देखील जोडले गेले आहे. जसे की, मकरसंक्रांतीला तीळगूळ खातात, होळीच्या दिवशी पुरणपोळी खाल्ली जाते. तसे हिंदू नवीन वर्षाच्या सुरुवातीला येणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंब आणि श्रीखंड खाल्लं जातं. यामागे काय आयुर्वेदशास्त्र काय सांगते ते जाणून घेऊया

कडुलिंबाची पाने आरोग्यवर्धक आहेत. कडुलिंब जरी कडू असले तरी त्याचे औषधी गुणधर्म खूप मोठे आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसाची सुरुवात कडुलिंबाचे कडू पान खावून करावे हे आजच्या पिढीला हायसे नक्कीच वाटेल पण कडुलिंबाचे औषधी गुणधर्म खूपच मोठे आहेत. ज्याची गरज ग्रीष्म ऋतू अधिक महत्त्वाची असते. कडुलिंब आरोग्य, त्वचा आणि केसांसाठी अत्यंत गुणकारी आहेत. यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. रक्तातील साखर नियंत्रित करणे, त्वचा रोग (मुरुम, खाज) बरे करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, दात व हिरड्या मजबूत करणे आणि केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. तसेच या महिन्यात होणाऱ्या सर्दी खोकल्याच्या संसर्गांपासूनदेखील कडुलिंबाच्या पानांचे सेवन शरीराला वाचवते.

Gudi Padwa 2026: काय आहे गुढीपाडव्याची पौराणिक आणि ऐतिहासिक कथा, जाणून घ्या

श्रीखंड का खातात

नवीन वर्षासोबत बहारदार वसंत घेऊन येतो आणि त्यासोबत ‘कफ’ देखील येतो. नीट निरीक्षण केले असेल तर तुम्हाला लक्षात येईल की, या दिवसात कफाचे त्रास सुरू होतात. सर्दी, खोकला, घसा दुखणे, डोकं जड होणे, दम्याचा त्रास वाढणे, त्वचेचे आजार वाढणे अशी लक्षणे दिसू लागतात. हा काळच असतो कफ पाझरण्याचा, आपण फक्त कफ नीट सुटण्यासाठी आणि वाहून जाण्यासाठी मदत करायची असते. शिशिरात साचलेली रुक्षता जेवढी जास्त तेवढा कफ घट्ट चिकटून बसतो, सहज सुटत नाही. अशा वेळी जेष्ठमध, सितोपलादि आणि कंटकारी मदत करतातच, पण त्याच्या जोडीला ताजे श्रीखंड अशा वेळी अमृत प्राशनासारखे आहे.

श्रीखंड स्निग्ध आहे, मधुर आहे, असे ताजे स्निग्ध व मधुर श्रीखंड प्रमाणात खाल्ले असता, शरीरातली उष्णता कमी होते, रुक्षता/कोरडेपणा कमी होऊन घट्ट चिकटलेला कफ अलगद सुटतो, पिकतो आणि सहजतेने बाहेर पडतो. नाक, घसा आणि इतर सायनसेसमध्ये अडकून बसलेल्या कफाने वाढलेली बेचैनी, जडपणा आणि वेदना सगळेच कमी होते, अन्न पचन उत्तम होते आणि आपला वसंत ऋतू उत्साहात जातो.

Surya Gochar 2026: सूर्य करणार शनिच्या नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांच्या करिअरमध्ये होतील मोठे बदल

थोडक्यात काय, कफ साचू द्यायचा नाही. कफ म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर नाकातून किंवा खोकल्यातून पडणारा कफ येतो, पण कफ ही संकल्पना त्याहून व्यापक आहे. कफ फक्त फुफ्फुसात साचत नाही, तो शरीरातल्या प्रत्येक घटकात असतो, त्याच्या वाढीसाठी पोषक वातावरण मिळाले की, तो शरीरात सर्वत्र वाढू लागतो. गरजेपेक्षा जास्त वाढलेली गोष्ट त्रासदायकच ठरते. जड, घट्ट आणि मंद असलेला कफ पचनशक्ती मंदावतो, अन्न नीट पचत नाही, न पचलेले अन्न अनेक आजारांना आमंत्रण देते. त्यामुळेच या ऋतूत कडुलिंब आणि श्रीखंड खाल्ल्यास शरीराला आवश्यक ते गुणधर्म मिळतात आणि शरीर निरोगी राहण्यासाठी मदत होते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: गुढीपाडव्याला श्रीखंड आणि कडुलिंब खाण्याची परंपरा का आहे?

    Ans: या दिवशी गोड (श्रीखंड) आणि कडू (कडुलिंब) पदार्थ खाण्याची परंपरा आहे. जीवनातील गोड-तिखट अनुभव स्वीकारण्याचा हा प्रतीकात्मक संदेश मानला जातो.

  • Que: गोड आणि कडू एकत्र खाण्याचा काय अर्थ आहे?

    Ans: गोड आणि कडू चवींचे संतुलन हे जीवनातील सुख-दुःखांचे प्रतीक आहे. दोन्ही गोष्टी समान भावनेने स्वीकारण्याचा संदेश यातून मिळतो.

  • Que: ही परंपरा केवळ धार्मिक आहे का?

    Ans: नाही, ही परंपरा धार्मिकसोबतच आरोग्यदायीही आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातूनही याचे महत्त्व आहे.

Web Title: Why are shrikhand and neem eaten on the day of gudi padwa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • benefits of neem
  • Gudi Padwa
  • lifestye

संबंधित बातम्या

शालिवाहन राजा कोण होता? मातीच्या सैन्याने कसा मिळवला विजय, जाणून घ्या विजयाची ऐतिहासिक कथा
1

शालिवाहन राजा कोण होता? मातीच्या सैन्याने कसा मिळवला विजय, जाणून घ्या विजयाची ऐतिहासिक कथा

Gudi Padwa 2026 : सणानिमित्त थोडा वेळ काढा, झटपट घरी बनवा ‘गव्हाच्या पिठाचा हलवा’, तोंडात टाकताच विरघळेल…
2

Gudi Padwa 2026 : सणानिमित्त थोडा वेळ काढा, झटपट घरी बनवा ‘गव्हाच्या पिठाचा हलवा’, तोंडात टाकताच विरघळेल…

Gudi Padwa 2026: काय आहे गुढीपाडव्याची पौराणिक आणि ऐतिहासिक कथा, जाणून घ्या
3

Gudi Padwa 2026: काय आहे गुढीपाडव्याची पौराणिक आणि ऐतिहासिक कथा, जाणून घ्या

Hindu Nav Varsh 2026: हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी काय करू नये, अन्यथा नाराज होईल देवी लक्ष्मी
4

Hindu Nav Varsh 2026: हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी काय करू नये, अन्यथा नाराज होईल देवी लक्ष्मी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.