फोटो सौजन्य- istock
गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा प्रारंभ मानला जाणारा अत्यंत शुभ सण आहे. महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या या दिवसामागे पौराणिक आणि ऐतिहासिक अशा दोन्ही कथा जोडलेल्या आहेत. पौराणिक श्रद्धेनुसार या दिवशी भगवान ब्रह्मा यांनी सृष्टीची निर्मिती सुरू केली, म्हणूनच हा दिवस नव्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. तसेच भगवान राम यांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत परतल्याच्या आनंदातही गुढी उभारण्याची परंपरा सांगितली जाते. इतिहासाच्या दृष्टीने पाहिले तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली गेल्याचेही मानले जाते. विजय, यश आणि समृद्धीचे प्रतीक असलेली गुढी घराघरांत उभारून लोक नववर्षाचे स्वागत करतात. त्यामुळे गुढीपाडवा हा केवळ सण नसून नव्या आशा, उत्साह आणि सकारात्मकतेची सुरुवात करणारा पवित्र दिवस मानला जातो. गुढीपाडव्याची पौराणिक आणि ऐतिहासिक कथा जाणून घ्या.
सृष्टीची निर्मिती करणारा ब्रम्हदेव याने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली असं मानलं जातं. म्हणूनच हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात आणि नवचैतन्यच प्रतीक मानलं जातं. या दिवशी निसर्गही नव्या रूपात फुलू लागतो. झाडाला नवीन पालवी येते आणि वातावरण प्रसन्न होते.
दुसरी प्रसिद्ध कथा ही भगवान राम यांच्याशी जोडलेली आहे. रामाने रावणाचा पराभव करून अयोध्येत परत येताना लोकांनी विजयाचा ध्वज अर्थात गुढी उभारून आनंद साजरा केला. त्यामुळे गुढी ही विजय आणि यशाचं प्रतीक मानले जाते. तेव्हापासून गुढी उभारण्याची परंपरा आणि गुढीपाडवा साजरा करण्याची परंपरा चालू झाली असं देखील म्हणतात.
Chaitra Navratri 2026: नवरात्रीत रामायण पाठ केल्याने मिळतात हे अद्भुत लाभ, जाणून घ्या नियम
तसेच काही ऐतिहासिक दाखल्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विजयाच्या आठवणीमुळेही गुढी उभारली जाते. युद्धात मिळालेल्या यशानंतर विजयध्वज उभारण्याची परंपरा होती. याचाच पुढे गुडीपाडवा सणांशी संबंध जोडला गेला. गुढी म्हणजे घराबाहेर उभारलेला विजय ध्वज तो वाईटावरती चांगल्याचा विजय, नवीन सुरुवात आणि समृद्धी यांच प्रतीक आहे. म्हणूनच लोक या दिवशी नवीन कामाची सुरुवात करतात. गोडधोड बनवतात आणि आनंदाने सण साजरा करतात. अशा प्रकारे गुढीपाडवा हा सृष्टीची निर्मिती, विजय आणि नव्या वर्षाची सुरुवात या तिन्ही गोष्टीचं सुंदर असं मिश्रण आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: पौराणिक मान्यतेनुसार ब्रह्मदेव यांनी या दिवशी सृष्टीची निर्मिती केली. त्यामुळे हा दिवस सृष्टीच्या प्रारंभाचा आणि नव्या सुरुवातीचा प्रतीक मानला जातो.
Ans: भगवान राम यांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत परतल्यावर लोकांनी विजयध्वज (गुढी) उभारून आनंद साजरा केला. त्यामुळे गुढी ही विजयाचे प्रतीक मानली जाते.
Ans: इतिहासानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विजयाच्या स्मरणार्थ विजयध्वज उभारण्याची परंपरा होती. त्याचाच संबंध पुढे गुढीपाडव्याशी जोडला गेला.






