Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात हाडांच्या वेदना कशामुळे वाढतात? शरीरात होणाऱ्या ‘या’ बदलांमुळे वाढतो आजारांचा धोका

पावसाळ्यात हाडांच्या वेदना वाढल्यानंतर पेनकिलरच्या गोळ्या खाल्ल्या जातात. पण त्याऐवजी घरगुती उपाय करून हाडांच्या वेदनांपासून आराम मिळवावा. जाणून घ्या पावसाळ्यात हाडांच्या वेदना का वाढतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 23, 2026 | 05:30 AM
पावसाळ्यात हाडांच्या वेदना कशामुळे वाढतात? शरीरात होणाऱ्या 'या' बदलांमुळे वाढतो आजारांचा धोका

पावसाळ्यात हाडांच्या वेदना कशामुळे वाढतात? शरीरात होणाऱ्या 'या' बदलांमुळे वाढतो आजारांचा धोका

Follow Us
Follow Us:

वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. पावसात भिजून आल्यानंतर सर्दी, खोकला, ताक तर काहीवेळा साथीच्या आजारांची सुद्धा लागण होते. पाऊस सुरु झाल्यानंतर सर्दी खोकल्यासोबत सांधेदुखी, गुडघेदुखी आणि जुन्या जखमांचे दुखणे वाढू लागते. हवामानात होणाऱ्या बदलांमुळे सगळीकडे गारवा निर्माण झाला आहे. थंड वातावरणामुळे हात-पाय आणि सांधे जखडून जातात. सांधेदुखी, फायब्रोमायल्जिया, नर्व्ह पेन इत्यादी अनेक गोष्टींचा त्रास वाढू लागतो. सांध्यांमध्ये वाढलेल्या वेदना काहीवेळा खूप असह्य होतात आणि आरोग्य बिघडून टाकतात. खाली बसताना किंवा वर उठताना पायांमध्ये वेदना जाणवू लागतात.(फोटो सौजन्य – istock)

वजन काटा कधीच हलत नाही? मग जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने होईल कमी

पावसाळ्यात शरीरसंबंधित कोणत्या ना कोणत्या समस्या कायमच उद्भवतात. वातावरणात होणारे बदल आणि मानसिक तणाव वाढल्यामुळे आरोग्य बिघडून जाते. हातापायांमध्ये किंवा गुडघ्यात वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी पेनकिलरच्या गोळ्या घेतल्या जातात. पण या गोळ्या खाल्ल्यामुळे तात्पुरता आराम मिळतो पण किडनीच्या आजारांची लागण होते. आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात सांध्यांमध्ये वेदना का होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. वारंवार सांधे दुखत असतील तर वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे.

डॉक्टरांच्या मते, पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर गुडघ्यांमध्ये वेदना वाढू लागतात. कारण पाऊस येण्याआधी आणि पाऊस आल्यानंतर बॅरोमेट्रिक प्रेशर वेगाने कमी जास्त होतो. याचा थेट परिणाम शरीरावर होतो. सांध्यांमध्ये वेदना आणि स्नायूंवर जास्तीचा तणाव येतो. हवेचा दाब कमी झाल्यामुळे शरीरातील ऊती किंचित प्रसरण पावतात, ज्याचा परिणाम सांध्यांवर होतो. तसेच जुन्या जखमा किंवा हाडांच्या वेदना वाढू लागतात. पावसाळ्यात रक्तभिसरण मंदावते. रक्तप्रवाह कमी झाल्यानंतर सांध्याच्या आसपासचे स्नायू, टेंडन्स आणि ऊतींमध्ये कडकपणा येतो. यामुळे सांधे जड होतात आणि हालचाल करताना वेदना वाढू लागतात.

Medical Success Story: 20 वर्षीय तरुणीवर वॉकहार्टमध्ये यशस्वी मिनिमली इन्व्हेसिव्ह माइट्रल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया

जुनी दुखापत , शस्त्रक्रिया किंवा सांधेदुखीमुळे शरीराचा एक भाग कमजोर होऊन जातो. तसेच बदलत्या वातावरणाचा परिणाम मज्जासंस्थेवर लगेच दिसून येतो. त्यामुळे हाडांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी थंड हवेपासून स्वतःचा बचाव करणे फार आवश्यक आहे. याशिवाय वेदना खूप जास्त वाढू लागल्यास गरम पाण्याचा किंवा मिठाचा शेक घ्यावा. यामुळे सांध्यांना आलेली सूज कमी होते आणि आराम मिळतो. तसेच नियमित व्यायाम आणि योगासने केल्यास शारीरिक आरोग्य सुधारण्यासोबतच मानसिक आरोग्य सुद्धा सुधारेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पावसाळ्यात हाडे आणि सांधे जास्त का दुखतात?

    Ans: पावसाळ्यात आर्द्रता (Humidity), वातावरणातील दाबातील बदल, कमी सूर्यप्रकाश आणि व्हिटॅमिन D ची कमतरता यामुळे सांधे आणि हाडांच्या वेदना वाढू शकतात.

  • Que: हाडांच्या वेदना कमी करण्यासाठी काय करावे?

    Ans: नियमित हलका व्यायाम, स्ट्रेचिंग, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D युक्त आहार, पुरेसा सूर्यप्रकाश आणि शरीर उबदार ठेवणे फायदेशीर ठरू शकते.

  • Que: हाडे मजबूत ठेवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?

    Ans: दूध, दही, पनीर, तीळ, बदाम, हिरव्या पालेभाज्या, अंडी, मासे आणि कॅल्शियम व व्हिटॅमिन D युक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.

Web Title: Why do bone pains worsen during the monsoon the risk of ailments increases due to these changes in the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • monsoon care
  • strong bones

संबंधित बातम्या

Kidney Health: जेवणातील ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे वाढतो किडनीच्या आजारांचा धोका, मुतखडा होऊन उद्भवू शकतात गंभीर समस्या
1

Kidney Health: जेवणातील ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे वाढतो किडनीच्या आजारांचा धोका, मुतखडा होऊन उद्भवू शकतात गंभीर समस्या

Physiotherapy: बदलत्या जीवनशैलीमुळे वाढली फिजिओथेरपीची गरज! जाणून घ्या यामागची प्रमुख कारणे
2

Physiotherapy: बदलत्या जीवनशैलीमुळे वाढली फिजिओथेरपीची गरज! जाणून घ्या यामागची प्रमुख कारणे

Mental Health: यशाच्या शर्यतीत मानसिक आरोग्य धोक्यात? सततच्या दबावामुळे उद्भवू शकतात ‘या’ समस्या
3

Mental Health: यशाच्या शर्यतीत मानसिक आरोग्य धोक्यात? सततच्या दबावामुळे उद्भवू शकतात ‘या’ समस्या

Gut Inflammation: आतड्यांना जखम झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल, शौचाच्या रंगातील बदल झाल्यास उद्भवतील गंभीर आजार
4

Gut Inflammation: आतड्यांना जखम झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल, शौचाच्या रंगातील बदल झाल्यास उद्भवतील गंभीर आजार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.