Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Physiotherapy: बदलत्या जीवनशैलीमुळे वाढली फिजिओथेरपीची गरज! जाणून घ्या यामागची प्रमुख कारणे

Physiotherapy: जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर थेट दिसून येत आहे. कंबर दुखी, पाठीमध्ये वेदना इत्यादी अनेक समस्या वाढू लागल्यामुळे आरोग्यावर त्याचा थेट परिणाम होत आहे. चला तर जाणून घेऊया बदलत्या जीवनशैलीत फिजिओथेरपीची का गरज आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 09, 2026 | 12:00 PM
बदलत्या जीवनशैलीमुळे वाढली फिजिओथेरपीची गरज! जाणून घ्या यामागची प्रमुख कारणे

बदलत्या जीवनशैलीमुळे वाढली फिजिओथेरपीची गरज! जाणून घ्या यामागची प्रमुख कारणे

Follow Us
Follow Us:

जीवनशैलीतील बदलांचा आरोग्यावर होणारा परिणाम?
फिजिओथेरपी कशासाठी केली जाते?
फिजिओथेरपी केल्यामुळे दिसून येणारे बदल?

Physiotherapy: दिवसभर लॅपटॉप,संगणकासमोर बसणे, मोबाईलचा वाढता वापर आणि व्यायामाचा अभाव यामुळे अनेकांना मानदुखी, पाठदुखी, खांदेदुखी तसेच सांधेदुखीच्या तक्रारी जाणवतात. दुखापत किंवा शस्त्रक्रियेनंतरही शरीराची हालचाल पूर्ववत करण्यासाठी फिजिओथेरपीची गरज भासते. अशा वेळी केवळ वेदना कमी करण्याबरोबरच शरीराची ताकद आणि हालचाल सुधारण्यासाठी फिजिओथेरपी महत्त्वाची ठरते. दरवर्षी ८ सप्टेंबर रोजी जागतिक फिजिओथेरपी दिन म्हणून साजरा केला जातो. शारीरिक हालचाल सुधारण्यास, शारीरीक हलचालींवर येणाऱ्या मर्यादा कमी करण्यास आणि जीवनमान सुधारण्यास फिजिओथेरपीचे महत्त्व या निमित्ताने अधोरेखित केले जाते. याविषयी आशु शिशोदिया, विभाग प्रमुख – फिजिओथेरपी आणि पुनर्वसन, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, खारघर, नवी मुंबई यांनी सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)

World Physiotherapy Day: वर्क फ्रॉम होम करून हैराण झाला आहात? सतत बसून काम केल्यामुळे वाढतोय पाठदुखीचा धोका

फिजिओथेरपीचा उपयोग केवळ वेदना कमी करण्यापुरता मर्यादित नाही तर स्नायूंची बळकटी आणि लवचिकता वाढवणे, शारीरीक समतोल सुधारणे, योग्य शारीरीक स्थिति राखणे आणि सांध्यांची हालचाल सुरळीत करणे यासाठीही फिजिओथेरपी उपयुक्त ठरते. दुखापत, आजार किंवा शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला पुन्हा दैनंदिन कामांकडे परतण्यासाठीही त्याची मदत होते.

विशेषतः ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियेनंतरचे पुनर्वसन, क्रीडा दुखापती, न्यूरोलॉजिकल समस्या तसेच दीर्घकाळ जाणवणाऱ्या वेदनांमध्ये फिजिओथेरपी महत्त्वाची भूमिका बजावते. रुग्णाच्या गरजेनुसार तयार केलेला व्यायामाचा कार्यक्रम आणि जीवनशैलीतील योग्य बदल यामुळे पुनर्वसनाची प्रक्रिया अधिक प्रभावी होऊ शकते.

फिजिओथेरपी म्हणजे केवळ वेदना कमी करण्याचा उपचार नाही. शरीराच्या हालचालींमधील अडचणी आणि स्नायूंची कमतरता ओळखून रुग्णाची ताकद, हालचाल आणि आत्मविश्वास पुन्हा वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार उपचार आणि योग्य व्यायाम केल्यास पुनर्वसन अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकते.

World Physiotherapy Day: हालचालक्षमता आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी वैयक्तिकृत फिजिओथेरपीचे काय आहे महत्त्व

दीर्घकाळ वेदना जाणवत असतील किंवा हालचालींमध्ये अडथळा येत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. स्वतःहून औषधे किंवा व्यायाम करण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य फिजिओथेरपी करणे अधिक सुरक्षित आणि परिणामकारक ठरू शकते. नियमित हालचाल ही निरोगी शरीराची गरज आहे. योग्य फिजिओथेरपीमुळे वेदनांवर नियंत्रण मिळवण्यासोबतच सक्रिय आणि स्वावलंबी जीवनाकडे पुन्हा वाटचाल करता येते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बदलत्या जीवनशैलीमुळे फिजिओथेरपीची गरज का वाढत आहे?

    Ans: बैठी जीवनशैली, तासन्तास बसून काम करणे, व्यायामाचा अभाव, चुकीची पोस्चर आणि वाढता ताण यामुळे मान, पाठ, खांदे आणि सांध्यांशी संबंधित तक्रारी वाढू शकतात. त्यामुळे काही लोकांमध्ये फिजिओथेरपीची गरज वाढू शकते.

  • Que: सतत बसून काम केल्यामुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात?

    Ans: दीर्घकाळ एकाच स्थितीत बसल्याने पाठदुखी, मानदुखी, स्नायूंमध्ये ताण, stiffness आणि हालचालींमध्ये मर्यादा जाणवू शकतात.

  • Que: फिजिओथेरपी कोणत्या समस्यांसाठी उपयोगी ठरते?

    Ans: दुखापतीनंतरचे पुनर्वसन, स्नायू-सांध्यांच्या समस्या, हालचालींची मर्यादा, काही पाठदुखी किंवा मानदुखीच्या समस्यांमध्ये फिजिओथेरपी उपयोगी ठरू शकते.

Web Title: Physiotherapy the need for physiotherapy has increased due to changing lifestyles find out the key reasons behind this

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

Mental Health: यशाच्या शर्यतीत मानसिक आरोग्य धोक्यात? सततच्या दबावामुळे उद्भवू शकतात ‘या’ समस्या
1

Mental Health: यशाच्या शर्यतीत मानसिक आरोग्य धोक्यात? सततच्या दबावामुळे उद्भवू शकतात ‘या’ समस्या

Gut Inflammation: आतड्यांना जखम झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल, शौचाच्या रंगातील बदल झाल्यास उद्भवतील गंभीर आजार
2

Gut Inflammation: आतड्यांना जखम झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल, शौचाच्या रंगातील बदल झाल्यास उद्भवतील गंभीर आजार

Inflammation मुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत? मग आहारात करा ‘हे’ बदल, सूज- वाढत्या वेदनांपासून मिळेल सुटका
3

Inflammation मुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत? मग आहारात करा ‘हे’ बदल, सूज- वाढत्या वेदनांपासून मिळेल सुटका

Easy Hacks: फोडलेला नारळ किती दिवस टिकतो? खोबर खराब होऊ नये म्हणून ‘या’ पद्धतीने करून ठेवा स्टोर
4

Easy Hacks: फोडलेला नारळ किती दिवस टिकतो? खोबर खराब होऊ नये म्हणून ‘या’ पद्धतीने करून ठेवा स्टोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.