Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kidney Health: जेवणातील ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे वाढतो किडनीच्या आजारांचा धोका, मुतखडा होऊन उद्भवू शकतात गंभीर समस्या

Kidney Health: रोजच्या आहारात अतिप्रमाणात साखर, मीठ आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे किडनीचे आरोग्य बिघडून जाते आणि शरीराला हानी पोहचते. किडनी स्टोन झाल्यानंतर वेळीच लक्ष न दिल्यास गंभीर आजारांचा धोका सुद्धा वाढू शकतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 10, 2026 | 08:15 AM
जेवणातील 'या' पदार्थांच्या सेवनामुळे वाढतो किडनीच्या आजारांचा धोका, मुतखडा होऊन उद्भवू शकतात गंभीर समस्या

जेवणातील 'या' पदार्थांच्या सेवनामुळे वाढतो किडनीच्या आजारांचा धोका, मुतखडा होऊन उद्भवू शकतात गंभीर समस्या

Follow Us
Follow Us:

किडनीचे आरोग्य कशामुळे बिघडते?
किडनी खराब करणारे पदार्थ कोणते?
किडनी स्वच्छ ठेवण्यासाठी उपाय?

Kidney Health: किडनी शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव आहे. पण बऱ्याचदा खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणाऱ्या बदलांमुळे किडनीच्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो आणि आरोग्य बिघडून जाते. रक्त शुद्ध करणे, लघवीवाटे विषारी घटक बाहेर काढून टाकणे यांसारखी असंख्य कामे किडनी करते. पण कमी पाण्याचे सेवन केल्यामुळे किडनीचे आजार होतात, असे कायमच मानले जाते. किडनी फेल किंवा किडनी स्टोन होण्यामागे कमी पाणीच नाहीतर आनुवंशिकता, चयापचय आणि आहारातील विविध घटकांचे संतुलन कमी झाल्यामुळे किडनीच्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. आहारातील काही छोटे घटक किडनीला इजा पोहचवतात. त्यामुळे दैनंदिन आहारात किडनीच्या आजारांचा धोका वाढवणाऱ्या या पदार्थांचे अजिबात सेवन करू नये.(फोटो सौजन्य – istock)

वारंवार Acidity होतेय? आंबट ढेकर आणि वाढत्या पित्ताच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

आहारात मिठाचे अतिसेवन करणे:

आपल्यातील अनेकांना आहारात खूप जास्त मीठ खाण्याची सवय असते. जेवणात मीठ असून सुद्धा पुन्हा एकदा वरून मीठ खाण्याची सवय शरीरासाठी गंभीर धोका निर्माण करते. सोडियमची पातळी वाढल्यानंतर किडनीमध्ये खडे तयार होण्यास सुरुवात होते. हेच खडे जास्त प्रमाणात गेलेले सोडियम लघवीवाटे बाहेर पडणाऱ्या कॅल्शियमचे प्रमाण वाढवते. त्यामुळे आहारात कमीत कमी प्रमाणात मिठाचे सेवन करावे. आवश्यकतेनुसारच मीठ खावे, जास्त मिठाचे सेवन करू नये. याशिवाय पॅकेज्ड स्नॅक्स, इन्स्टंट फूड, विविध सॉस, लोणचे, प्रक्रिया केलेले मांस आणि हॉटेलमधील जेवण इत्यादी पदार्थांमध्ये मिठाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

लाल मांस:

मांस आणि इतर प्राणिज प्रथिनांचे अतिप्रमाणात सेवन केल्यास किडनीच्या आजारांचा धोका वाढतो. लघवीचे रासायनिक संतुलन बिघडल्यामुळे किडनीत खडे तयार होतात. त्यामुळे आहारातून प्रथिने खाणे पूर्णपणे बंद करून न टाकता आवश्यक प्रमाणात सेवन करावे. लाल मांस किंवा शिळे मासे, चिकन, मटण खाण्याऐवजी ताजे आणि संतुलित अन्नपदार्थ खाण्यावर जास्त भर द्यावा.

अतिप्रमाणात साखरेचे सेवन:

अतिरिक्त साखर किंवा आहारात अतिप्रमाणात गोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. या पेयांमध्ये फ्रुक्टोजचे प्रमाण जास्त असते. साखरेची पेये लघवीतील खडे तयार करणाऱ्या घटकांना उत्तेजित करतात. साखरेच्या अतिसेव्हनामुळे लघवीतील कॅल्शियम आणि युरिक ॲसिडचे प्रमाण वाढून लघवीमध्ये खडे तयार होतात. त्यामुळे कृत्रिम साखरेची पेये, सोडा आणि गोड सरबते पिण्यास अजिबात प्राधान्य देऊ नये.

Physiotherapy: बदलत्या जीवनशैलीमुळे वाढली फिजिओथेरपीची गरज! जाणून घ्या यामागची प्रमुख कारणे

ऑक्झालेटचे प्रमाण वाढवणारे पदार्थ:

पालक, बीट, ड्रायफ्रूट्स आणि काही वनस्पतीजन्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर ऑक्झालेट असते. त्यामुळे हे पदार्थ अचानक खाणे पूर्णपणे बंद करू नये. हळूहळू अन्नपदार्थांमधून ऑक्झालेट असलेले पदार्थ खाणे बंद करावे. याशिवाय किडनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी भरपूर पाण्याच्या सेवनासोबतच आहारात बदल, नियमित व्यायाम आणि शारीरिक हालचाल करणे आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोणत्या पदार्थांच्या सेवनामुळे किडनीच्या आजारांचा धोका वाढू शकतो?

    Ans: जास्त मीठ असलेले पदार्थ, अतिप्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, साखरयुक्त पेये आणि काही परिस्थितींमध्ये अतिप्रमाणात प्राणीजन्य प्रथिने घेतल्याने किडनीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

  • Que: जास्त मीठ खाल्ल्याने किडनीवर परिणाम होतो का?

    Ans: होय. जास्त सोडियम सेवनामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि काही प्रकारच्या किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो. त्यामुळे आहारातील मीठाचे प्रमाण नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे आहे.

  • Que: मुतखडा होण्याचा धोका कोणत्या आहारामुळे वाढू शकतो?

    Ans: कमी पाणी पिणे, जास्त मीठाचे सेवन आणि काही प्रकारच्या मुतखड्यांमध्ये ऑक्सलेटयुक्त पदार्थांचे अतिसेवन किंवा आहारातील असंतुलन धोका वाढवू शकते. मुतखड्याचा प्रकारानुसार आहारातील सल्ला बदलतो.

Web Title: Kidney health consuming these foods increases the risk of kidney disease

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 08:15 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Kidney Health Tips
  • Kidney stones

संबंधित बातम्या

Physiotherapy: बदलत्या जीवनशैलीमुळे वाढली फिजिओथेरपीची गरज! जाणून घ्या यामागची प्रमुख कारणे
1

Physiotherapy: बदलत्या जीवनशैलीमुळे वाढली फिजिओथेरपीची गरज! जाणून घ्या यामागची प्रमुख कारणे

Mental Health: यशाच्या शर्यतीत मानसिक आरोग्य धोक्यात? सततच्या दबावामुळे उद्भवू शकतात ‘या’ समस्या
2

Mental Health: यशाच्या शर्यतीत मानसिक आरोग्य धोक्यात? सततच्या दबावामुळे उद्भवू शकतात ‘या’ समस्या

Gut Inflammation: आतड्यांना जखम झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल, शौचाच्या रंगातील बदल झाल्यास उद्भवतील गंभीर आजार
3

Gut Inflammation: आतड्यांना जखम झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल, शौचाच्या रंगातील बदल झाल्यास उद्भवतील गंभीर आजार

Inflammation मुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत? मग आहारात करा ‘हे’ बदल, सूज- वाढत्या वेदनांपासून मिळेल सुटका
4

Inflammation मुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत? मग आहारात करा ‘हे’ बदल, सूज- वाढत्या वेदनांपासून मिळेल सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.