वयाच्या आठव्या- नव्या वर्षी मुलींना मासिक पाळी का येते?
जीवनशैलीतील बदल, आहारात होणारे बदल, अपुरी झोप, मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात. शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे महिलांचे आरोग्य काहीसे बिघडून जाते. मासिक पाळीमध्ये झालेल्या बदलांमुळे पीसीओडी, पीसीओस इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. पूर्वीच्या काळी मुलींना नववी किंवा दहावीमध्ये गेल्यानंतर मासिक पाळी यायची. पण हल्ली जीवनशैलीत होणाऱ्या बदलांमुळे आणि आहारामुळे वयाच्या नऊ किंवा दहा वर्षात मासिक पाळी येऊ लागली आहे. जेवढ्या लवकर मासिक पाळी येते तेवढ्याच लवकर मासिक पाळी जाण्याची शक्यता असते. कमी वयात मासिक पाळी आल्यामुळे मुलींच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतात. तसेच मासिक पाळी आल्यानंतर बालपण कुठेतरी हरवल्यासारखे वाटू लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मुलींना कमी वयात मासिक पाळी येण्यामागे नेमकी कारणे आहेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
अंघोळ करताना थंड की गरम पाणी वापरावे? जाणून घ्या शरीरासाठी कोणते पाणी आहे जास्त प्रभावी
हल्ली कमी वयात मुलींना मासिक पाळी येण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि शरीरात वाढलेल्या लठ्ठपणामुळे मुलीच्या शरीरात अनेक बदल होतात. या बदलांमुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. लठ्ठपणा शरीरातील एडिपोज टिश्यू वाढल्यामुळे येतो. हे टिश्यू शरीरात वाढू लागल्यानंतर हार्मोन्समधील स्त्राव वाढतो आणि कमी वयात मुलींना मासिक पाळी येते. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयींकडे योग्य लक्ष देणे आवश्यक आहे. रोजच्या आहारात फॅटयुक्त पदार्थांचे कमीत कमी प्रमाणात सेवन करावे.
मुलीच्या शरीरातील स्लीप सायकल खूप विस्कळीत झाल्यामुळे शरीरात अनेक बदल होऊ लागतात. बराच वेळ टीव्ही किंवा मोबाईल पाहत राहिल्यामुळे झोप पूर्ण होत नाही., अपुऱ्या झोपेचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. रात्री उशिरा पर्यंत जागरण केल्यामुळे सकाळची सुरुवात अतिशय कंटाळवाणी होते. त्यामुळे रात्री लवकर झोपणे आवश्यक आहे. जास्त वेळ जागरण केल्यामुळे मुलींच्या शरीरातील हार्मोन्समध्ये अनेक बदल होतात.
मासिक पाळी लवकर येण्याची काही प्रमुख कारणे:
मुलीच्या आईला किंवा कुटुंबातील इतर मादी सदस्यांना लवकर मासिक पाळी येत असेल, तर तिलाही लवकर मासिक पाळी येण्याची शक्यता असते.पौष्टिक स्थिती, बॉडी मास इंडेक्स (BMI) आणि तणाव पातळी यांसारख्या घटकांमुळे मासिक पाळी लवकर येऊ शकते, असे काही अभ्यासातून दिसून आले आहे.
मासिक पाळीचे चक्र काय आहे?
मासिक पाळीचे चक्र म्हणजे दोन मासिक पाळींच्या मधला कालावधी. साधारणपणे, हे चक्र 21 ते 35 दिवसांचे असते, असे काही आरोग्य स्त्रोतांचे म्हणणे आहे.
मासिक पाळी न येणे म्हणजे काय?
जर तुमची मासिक पाळी 15 वर्षांची झाल्यावरही सुरू झाली नसेल किंवा ती अनियमित झाली असेल, तर त्या स्थितीला अमेनोरिया म्हणतात.