Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलींना लहान वयातच मासिक पाळी का येते? मुलींचे बालपण टिकवून ठेवण्यासाठी आईवडिलांनी घ्याला हवी ‘या’ गोष्टींची काळजी

जीवनशैलीतील बदलांच्या परिणामामुळे हल्ली लहान वयातच मुलींना मासिक पाळी येत आहे. लवकर मासिक पाळी आल्यामुळे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावर सुद्धा गंभीर परिणाम होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: May 21, 2026 | 12:09 PM
मुलींना लहान वयातच मासिक पाळी का येते? मुलींचे बालपण टिकवून ठेवण्यासाठी आईवडिलांनी घ्याला हवी 'या' गोष्टींची काळजी

मुलींना लहान वयातच मासिक पाळी का येते? मुलींचे बालपण टिकवून ठेवण्यासाठी आईवडिलांनी घ्याला हवी 'या' गोष्टींची काळजी

Follow Us
Close
Follow Us:

लहान वयात मुलींना मासिक पाळी का येते?
मासिक पाळी लवकर येण्याची कारणे?
पाळीच्या दिवसांमध्ये उद्भवणाऱ्या समस्या?

वयाच्या १४ ते १६ या वर्षांमध्ये सर्वच मुलींना मासिक पाळी येते. मासिक पाळी येणे ही शरीराची नैसर्गिक क्रिया आहे. महिन्यातील चार ते पाच दिवस सर्वच महिलांना पाळी येते. पाळीच्या दिवसांमध्ये कंबर दुखणे, उलट्या, मळमळ, पोटात वेदना, क्रम्प्स इत्यादी सर्वच त्रासांना महिलांना सामोरे जावे लागते. पण हल्ली मुलींना ८ ते १० वर्ष चालू असतानाच मासिक पाळी येते. ही समस्या हल्ली फारच कॉमन झाली आहे. जीवनशैलीतील बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. वजन वाढल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालातंराने आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम दिसू लागतात. चला तर जाणून घेऊया मुलींना लहान वयातच मासिक पाळी का येते? याबद्दल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

Weight Loss Tips: जिमशिवायही होईल वजन कमी! दररोजच्या ‘या’ हेल्दी सवयी ठरतील गेमचेंजर

लहान वयात मुलींना मासिक पाळी का येते?

वयाच्या ११ ते १४ व्या वर्षी सामान्यपणे मुलींना मासिक पाळी येते. पण जर कोणत्याही मुलीला लवकर मासिक पाळी आली तर त्या स्थितीला अर्ली मेनार्की असे म्हंटले जाते. शरीरात होणाऱ्या बदलांमुळे मुलींना लवकर मासिक पाळी येते. तसेच या कालावधीमध्ये स्तनांचा विकास सुद्धा होतो. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. लहान मुलींना वाढलेल्या वजनामुळे सुद्धा लवकर मासिक पाळी येऊ शकते. शरीरावर जमा झालेल्या अतिरिक्त चरबीमुळे मासिक काहीवेळा मासिक पाळी लवकर येते. याशिवाय जंक फूड, साखरयुक्त ड्रिंक्स आणि कमी शारीरिक हालचाल केल्यामुळे मुलींचे वजन झपाट्याने वाढू लागते.

जीवनशैलीतील बदलांचे आरोग्यावर होणारे परिणाम:

मासिक पाळी लवकर येण्यामागील प्रमुख कारण म्हणजे जीवनशैलीत होणारे बदल. बाहेरचे अन्नपदार्थ, पॅकेज्ड फूड, लाल मांस किंवा अल्कोहोल युक्त पेयांचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे शरीरसंबंधित समस्या उद्भवू लागतात. दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. मोबाईल, टिव्ही आणि टॅबलेट अतिप्रमाणात केलेला वापर दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करतो. कमी झोप, कमी शारिरीक हालचाली, ताण-तणाव इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणाम हार्मोन्सवर लगेच दिसून येतो.

शिल्लक राहिलेला भात सतत गरम करून खाता? फूड पॉयझनिंग होऊन आतड्यांचे होईल गंभीर नुकसान, जाणून घ्या भात शिजवण्याची पद्धत

लहान मुलींची कशा पद्धतीने काळजी घ्यावी:

लहान मुलींसह मोठ्यांनीसुद्धा दैनंदिन आहारात पौष्टिक आणि शरीरास सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. यामुळे आरोग्य चांगले राहते. दैनंदिन आहारात ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यास कायमच निरोगी आणि उत्साही राहाल. तसेच सकाळी उठल्यानंतर नियमित व्यायाम, शारीरिक हालचाली, प्राणायाम किंवा ध्यान केल्यास आरोग्यासंबंधित समस्या कधीच उद्भवणार नाहीत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: लहान वयात मासिक पाळी येणे सामान्य मानले जाते का?

    Ans: काही प्रकरणांमध्ये हे नैसर्गिक असू शकते, मात्र खूप कमी वयात पाळी सुरू झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

  • Que: मुलींमध्ये लवकर प्युबर्टीची कोणती लक्षणे दिसतात?

    Ans: शारीरिक बदल, उंची वाढणे, भावनिक चढउतार आणि मासिक पाळी सुरू होणे ही लवकर प्युबर्टीची लक्षणे असू शकतात.

  • Que: लहान वयात पाळी आल्यास मुलींवर मानसिक परिणाम होऊ शकतो का?

    Ans: होय. अशा वेळी मुलींमध्ये गोंधळ, भीती किंवा लाज निर्माण होऊ शकते. त्यामुळे पालकांनी त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधणे गरजेचे आहे.

Web Title: Why do girls get periods at an early age parents should take care of these things to preserve girls childhood

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • menstruation
  • period news
  • women health

संबंधित बातम्या

मासिक पाळीत Alcohol पिताय? होऊ शकतो महिलांच्या Fertility वर परिणाम, तज्ज्ञांनी दिला इशारा
1

मासिक पाळीत Alcohol पिताय? होऊ शकतो महिलांच्या Fertility वर परिणाम, तज्ज्ञांनी दिला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.