कांद्यावर काळे थर का येतात? काळ्या बुरशीमुळे वाढू शकतो किडनी आणि लिव्हरच्या आजारांचा गंभीर धोका, वेळीच व्हा सावध
कांद्याचे सेवन करण्याचे फायदे?
कांद्यावर काळे थर का येतात?
काळा थर असलेला कांदा खाल्ल्यास लिव्हर खराब होते का?
भारतीय स्वयंपाक घरात आवर्जून वापरला जाणारा पदार्थ म्हणजे कांदा. जेवणात जर कांदा नसेल तर पदार्थाला अजिबात चव लागत नाही. भाजी, आमटी किंवा इतर कोणताही पदार्थ बनवताना कांद्याचा आवर्जून वापर केला जातो. बाजारातून एकदा किलोभर कांदे विकत आणले जातात. विकत आणलेले कांदे प्लॅस्टिकच्या टबमध्ये किंवा काहींना फ्रिजमध्ये ठेवण्याची सवय असते. पण फ्रिजमध्ये ठेवलेला कांदा शरीरासाठी अजिबात चांगला नाही. कांदा सोलल्यानंतर काहीवेळा काळ्या रंगाचा थर दिसून येतो. अशावेळी कांदा पाण्याने स्वच्छ धुवून नंतरच त्याचा वापर जेवणासाठी करतात. कांद्यावर असलेला काळा थर पाहून अनेक लोक दुर्लक्ष करतात.(फोटो सौजन्य – istock)
कांद्यामधील गडद काळा थर किंवा रेषा निरुपद्रवी वाटतात, पण यामुळे लिव्हर आणि किडनीचे गंभीर नुकसान होते. कांद्यामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्स आणि सल्फर संयुगांमुळे, विशेषतः लिव्हरच्या कार्याला मदत करण्यासाठी फायदेशीर मानला जातो. पण गडद रंगाचा काळा थर कांद्यावर असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. हे बुरशीजन्य संसर्गाचे लक्षण आहे. याला ॲस्परजिलस नायजर असे म्हंटले जाते. ही बुरशी यकृताच्या आरोग्यासाठी हानिकारक मायकोटॉक्सिन्स तयार करू शकते. त्यामुळे कांद्यावर असलेला काळा थर पाहून दुर्लक्ष न करता कांदा पाण्याने व्यवस्थित स्वच्छ करून नंतरच वापरावा. चला तर जाणून घेऊया कांद्यावर काळा थर कशामुळे तयार होतो? कांद्यावरील काळ्या थराचे शरीरावर होणारे दुष्परिणाम.
जर्नल ऑफ डायबेटिस अँड मेटाबोलिक डिसऑर्डर्स’ मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजसारख्या यकृताच्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कांदा फायदेशीर ठरतो. स्वच्छ आणि भेसळ नसलेल्या कांद्याचे शरीराला फायदे होतात, अन्यथा कांदा शरीरासाठी घातक ठरतो. वारंवार काळा पडलेला किंवा बुरशी आलेला कांदा खाल्ल्याने लिव्हरमध्ये विषारी घटक तयार होण्याची शक्यता असते. यामुळे लिव्हरचे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. किचनमध्ये जेवण बनवताना जर कांद्याचा रंग बदललेला असेल किंवा कांदा मऊ होऊन उग्र वास येत असेल तर कांद्याचा वापर अजिबात करू नका.
कांद्यावरील काळा थर सहसा बुरशीजन्य संसर्गामुळे येतो. ॲस्परजिलस नायजर ही एक बुरशी उष्ण आणि दमट परिस्थितीत वाढते आणि वाढीच्या काळात किंवा साठवणुकीदरम्यान कांद्यांना संक्रमित करू शकते. कांद्यावरील काळे डाग सगळ्यात आधी बाहेरील सालीवर येतात. त्यानंतर हळूहळू आतील कांद्यावर जमा होण्यास सुरुवात होते. योग्य साठवणूक आणि हाताळणीमुळे कांद्यांना बुरशी जन्य संसर्गापासून वाचवू शकता. काळे पापुद्रे असलेले कांदे खाल्ल्यास शरीरात मायकोटॉक्सिन्स प्रवेश करतात. हे विषारी घटक अयोग्यरित्या साठवलेल्या किंवा खराब झालेल्या कांद्यांमध्ये वाढणाऱ्या विशिष्ट बुरशीमुळे तयार होतात. वारंवार बुरशी जन्य कांद्याचे सेवन केल्यास यकृताचे आजार, पचनाच्या समस्या आणि इतर गंभीर आरोग्यविषयक गुंतागुंतीचा धोका वाढू शकतो.
पावसाळ्यात फळे-भाज्या लवकर खराब होतात? ताज्या ठेवण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या टिप्स
बाहेरील किंवा आतील थरांवर काळे किंवा गडद पट्टे
कांदा मऊ पडून जाणे
कुबट किंवा आंबट वास
सामान्य पांढऱ्या किंवा जांभळ्या रंगाच्या मांसाव्यतिरिक्त असामान्य रंग बदल दिसून येणे
Ans: कांद्यावर दिसणारे काळे थर अनेकदा बुरशीच्या वाढीमुळे तयार होतात. जास्त आर्द्रता, अयोग्य साठवण किंवा खराब हवेशीर जागेमुळे अशी बुरशी वाढू शकते.
Ans: काही विशिष्ट प्रकारच्या बुरशीद्वारे तयार होणारे मायकोटॉक्सिन्स दीर्घकाळ किंवा मोठ्या प्रमाणात शरीरात गेल्यास आरोग्यावर, विशेषतः यकृत (लिव्हर) आणि मूत्रपिंडांवर (किडनी) विपरीत परिणाम होऊ शकतो.
Ans: कांद्यावर काळी बुरशी, दुर्गंधी, मऊ पोत, कुजलेले भाग किंवा जास्त ओलावा दिसल्यास तो वापरणे टाळावे.






