(फोटो सौजन्य: Pinterest)
Travel News : कचोरी कॅपिटलच्या नावाने फेमस आहे भारतातील शहर, तुम्हाला माहिती आहे का?
प्रवेश बिंदूत केला विस्तार
परदेशी पर्टकांची सुविधा लक्षात घेत भारत सरकारने ई-व्हिसा संबंधित काही एंट्री पाॅईंट्सची संख्या वाढवली आहे. या नव्या विस्तारामध्ये २ हवाई अड्डे आणि ९ लँड पोर्ट्ससह अटारी बाॅर्डरलाही यात सामील करण्यात आलं आहे. या निर्णयानंतर आता देशभरात एकूण ८८ असे एंट्री पाँईंट्स आहेच जिथून व्हिसा धारकांना भारतात प्रवेश दिला जाणार आहे.
पाकिस्तानी नागरिकांसाठी काय आहे नियम?
जरी ही सुविधा भारत सरकारने परदेशी पर्यटकांसाठी सुरु केली असली तरी पाकिस्तानी नागरिकाला मात्र याचा लाभ घेता येणार नाही. पासपोर्ट, व्हिसा असला पाकिस्तानी पर्यटकांना हा सुविधा लागू होत नाही, त्यांच्यासाठी भारत सरकार ई-व्हिसा जारी करत नाही. अधिकृत पोर्टलनुसार, या लोकांना पूर्वाीसारखेच भारतीय दूतावासाशी संपर्क साधून नियमित व्हिसासाठी अर्ज करावा लागेल. कॅनडा, रशिया, ग्रीस आणि जपानसह इतर १७४ देशांतील सर्व पात्र परदेशी प्रवासी या नवीन मार्गाचा लाभ घेऊ शकतात.
ई-व्हिसा असल्यास एंट्रीची गॅरंटी आहे का?
यात्रेपूर्वी हे लक्षात घ्या की केवळ ई-व्हिसा अप्रुव्ह झाल्यास भारतातील कोणत्याही बाॅर्डरवरुन तुम्हाला गॅरेंटेड एंट्री दिली जाईल असं नाहीये. पर्यटकांना आपल्या व्हिसावर लिहिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे लागेल. यात्रा सुरु होण्याआधी आपली व्हिसा व्हॅलिटीडी चेक करावी. यात अधिकृत एंट्री पाॅइंट्स नमूद केलेले असतील जिथून भारतात एंट्री दिली जाईल.
७२ तासात होईल काम
सध्या भारत सरकार मेडिकल, टूरिस्ट, विद्यार्थी, ट्रान्झिट, क्रूझ, समूह प्रवास आणि गिर्यारोहण यासह एकूण १७ वेगवेगळ्या श्रेणींंमध्ये ई-व्हिसा प्रदान करत आहे. या संपूर्ण प्रक्रियेची खासियत म्हणजे सुमारे ९५% अर्जांवर केवळ ७२ तासांत प्रक्रिया पूर्ण केली जाते. अटारी बाॅर्डरसारख्या ठिकाणांहून एंट्री खुली केल्याने परदेशी पर्यटकांना आता भारतात यात्रा करणं आणखी सुलभ होणार आहे.



