
वयाच्या ३० नंतर पोटावर चरबीचा घेर का वाढतो? जाणून घ्या पोटावर चरबीचा थर वाढण्याची कारणे
वजन वाढण्याची कारणे?
वयाच्या तिशीनंतर पोटावर चरबीचा घेर का वाढतो?
वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय?
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, पोषक घटकांची कमतरता, पाण्याची कमतरता, शारीरिक हालचाल न करणे, मानसिक तणाव, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे वाढत्या वयात शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. वयाच्या ३० नंतर पोटावर चरबीचा थर साचून राहण्यास सुरुवात होते, ज्यामुळे शरीराचे अनावश्यक वजन वाढून आरोग्याला हानी पोहचते. वाढत्या वयात शरीराची पचनक्रिया मंदावते, ज्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ पचन होण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो. वजन वाढण्यास आहार कारणीभूत ठरतो. आहारात होणाऱ्या बदलांमुळे शरीराच्या वजनावर परिणाम दिसून येतात. (फोटो सौजन्य – istock)
नाईट शिफ्ट करताय! मग आजच सोडा नोकरी, ‘या’ आरोग्याच्या समस्येला पडाल बळी
वयाच्या तिशीनंतर स्नायूंचे नुकसान, हार्मोन्समधील बदल आणि इन्सुलिनच्या कार्यक्षमता घटल्यामुळे पोटावर चरबीचा थर वाढून आरोग्य बिघडते. वजन वाढल्यानंतर अनेक कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. कधी महागडा डाएट घेतला जातो तर कधी शारीरिक हालचाली करून वजन कमी केले जाते. पण चुकीचा डाएट आणि जास्त व्यायाम केल्यामुळे शरीराचे गंभीर नुकसान होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वयाच्या तिशीनंतर वजन का वाढते? वजन कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यास सकारात्मक परिणाम दिसून येतील आणि वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल.
वयाच्या तिशीनंतर दर दहा वर्षांनी शरीरातील स्नायूंचे प्रमाण ३ ते ८ टक्क्यांनी कमी होण्यास सुरुवात होते. ज्यामुळे विश्रांती घेताना सुद्धा शरीरात कॅलरीज बर्न होतात. स्नायूंची संख्या कमी झाल्यानंतर शरीरातील ऊर्जा सुद्धा कमी होण्यास सुरुवात होते. ऊर्जा वाढवण्यासाठी स्नायू रक्तातील साखरेचा वापर करतात. स्नायूंचे मांस कमी झाल्यामुळे साखर रक्तात तशीच साचून राहते, ज्याच्या परिणामामुळे पोटावर चरबीचा थर वाढून शरीराचे अनावश्यक वजन वाढते.
वयाच्या तिशीनंतर शरीरातील ह्युमन ग्रोथ हार्मोन, टेस्टोस्टेरोन आणि एस्ट्रोजन यांसारखे महत्वपूर्ण हार्मोन्सची पातळी कमी होऊन जाते. पण धावपळीच्या जीवनशैलीमुळे ‘कोर्टिसोल’ सारख्या स्ट्रेस हार्मोन्सचे प्रमाण वाढते आणि शरीरात अनेक बदल दिसू लागतात. हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे पोटाच्या आत खोलवर चरबी साठून राहते. ही चरबी व्यायाम केल्यानंतर सुद्धा कमी होत नाही. पोटावर चरबीचा थर तसाच साचून राहिल्यामुळे भविष्यात मधुमेह, रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉलसारख्या गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता वाढते.
हिवाळ्यात किडनी नाही सडणार, दैनंदिन जीवनशैलीत 5 सवयींना कवटाळा; निरोगी रहा
वाढलेले वजन कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही सप्लिमेंट्सचे सेवन करण्याऐवजी घरगुती उपाय करून आराम मिळवावा. सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध मिक्स करून प्यायल्यास पोटावर वाढलेला चरबीचा थर कमी होण्यास मदत होईल. याशिवाय शरीरात जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल. तसेच वजन कमी करताना चुकीचा डाएट करण्याऐवजी संतुलित आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे नियमित सेवन करावे. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच दिवसभरात ३ लिटरपेक्षा जास्त पाणी प्यावे.