Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात किडनीवर ताण का वाढतो? मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ खास टिप्स, आरोग्य तज्ज्ञांचा महत्वपूर्ण सल्ला

पावसाळ्यात किडनीच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. संसर्ग, दूषित पाण्यामुळे होणारे आजार आणि निर्जलीकरणामुळे किडनीच्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 19, 2026 | 03:43 PM
पावसाळ्यात किडनीवर ताण का वाढतो? मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' खास टिप्स, आरोग्य तज्ज्ञांचा महत्वपूर्ण सल्ला

पावसाळ्यात किडनीवर ताण का वाढतो? मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' खास टिप्स, आरोग्य तज्ज्ञांचा महत्वपूर्ण सल्ला

Follow Us
Follow Us:

पावसाळ्यात कोणती काळजी घ्यावी?
पावसाळ्यात किडनीच्या आजारांचा धोका का वाढतो?
किडनी स्वच्छ राहावी म्हणून उपाय?

पावसाळा उष्णतेपासून दिलासा देणारा असला तरी या ऋतूमध्ये संसर्ग, दूषित पाण्यामुळे होणारे आजार आणि निर्जलीकरणाचा (डिहायड्रेशन) धोका वाढतो. त्यामुळे मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त रुग्णांनी या काळात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. योग्य खबरदारी घेतल्यास पावसाळ्यातही मूत्रपिंडांचे आरोग्य चांगले राखता येते. याबद्दल डॉ. ज्योती बनसोडे, नेफ्रॉलॉजिस्ट व किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ, न्यूईरा हॉस्पिटल्स, वाशी, नवी मुंबई यांनी सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)

Food Divorce म्हणजे नेमकं काय? आवडत्या पदार्थांपासून दूर जाण्याचा वाढत आहे अनोखा ट्रेंड

पावसाळा हा आल्हाददायक वातावरण घेऊन येतो, मात्र त्याचबरोबर संसर्गजन्य आजार, दूषित अन्न-पाणी आणि हंगामी आजारांचाही धोका वाढतो. त्यामुळे मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. दीर्घकालीन मूत्रपिंड विकार (सीकेडी), डायलिसिस सुरू असलेले रुग्ण, किडनी प्रत्यारोपण झालेले रुग्ण किंवा वारंवार किडनी स्टोनचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. नियमित तपासण्या, योग्य उपचार आणि आवश्यक ती खबरदारी घेतल्याने पावसाळ्यात मूत्रपिंडांचे आरोग्य सुरक्षित ठेवता येते.

पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका

मूत्रपिंडाच्या आजारामुळे अनेक रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. त्यामुळे त्यांना मूत्रमार्गाचा संसर्ग (यूटीआय), निर्जलीकरण, पोटाचे संसर्ग, लेप्टोस्पायरोसिस तसेच विविध विषाणूजन्य संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. हे संसर्ग मूत्रपिंडांवर अतिरिक्त ताण निर्माण करतात.

याशिवाय, किडनी प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांना किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारी औषधे घेणाऱ्या रुग्णांना मूत्रमार्गाचा संसर्ग, न्यूमोनिया, इन्फ्लूएंझासारखे श्वसनाचे विषाणूजन्य आजार आणि बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे अशा रुग्णांनी पावसाळ्यात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

पावसाळ्यात कोणती काळजी घ्यावी?

पावसाळ्यात स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. उकळून थंड केलेल किंवा शुद्ध पाणी प्या. अस्वच्छ ठिकाणचे अन्न आणि उघड्यावरील (स्ट्रीट फूड) पदार्थ खाणे टाळा. शक्यतो ताजे, घरगुती आणि संतुलित आहाराचे सेवन करा.

डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमितपणे घ्या त्यात खंड पडू देऊ नका.डायलिसिस सुरू असलेल्या रुग्णांनी मुसळधार पाऊस किंवा इतर कारणांमुळे डायलिसिस चुकवू नका. मूतखडा असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुरेसे पाणी प्यावे, तर दीर्घकालीन मूत्रपिंडाचा विकार असलेल्या रुग्णांनी द्रवपदार्थांचे प्रमाण आणि आहारासंबंधी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

ताप, लघवी करताना वेदना किंवा जळजळ, पाय किंवा चेहऱ्यावर सूज, लघवीचे प्रमाण कमी होणे, उलट्या किंवा जुलाब यांसारखी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

स्वमर्जीने औषधोपचार करणे टाळा. विशेषतः ताप किंवा अंगदुखीसाठी वैद्यकीय सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधे घेऊ नका, कारण काही औषधांमुळे मूत्रपिंडांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

चिखल किंवा साचलेल्या पाण्यात अनवाणी चालणे टाळावे. यामुळे लेप्टोस्पायरोसिस आणि बुरशीजन्य संसर्गाचा धोका कमी होतो. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी ही काळजी विशेष महत्त्वाची आहे.

दारू न पिणाऱ्यांमध्ये का वाढत आहे Liver Cancer चा धोका? जीवनशैलीत केलेल्या ‘या’ बदलांमुळे लिव्हरवरील चरबी होईल नष्ट

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इन्फ्लूएंझा आणि न्यूमोकोकल लसी वेळेवर घेणे फायदेशीर ठरते. विशेषतः दीर्घकालीन मूत्रपिंड विकार असलेले आणि किडनी प्रत्यारोपण झालेले रुग्ण यांनी या लसीकरणाबाबत जागरूक राहावे.

पावसाळ्यात योग्य आहार, स्वच्छता, नियमित औषधे, वेळेवर तपासण्या आणि डॉक्टरांच्या सूचनांचे पालन केल्यास मूत्रपिंडाशी संबंधित गुंतागुंत टाळता येऊ शकते. त्यामुळे किडनीच्या रुग्णांनी पावसाळ्यात अधिक सतर्क राहून स्वतःच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पावसाळ्यात किडनीवर ताण का वाढू शकतो?

    Ans: पावसाळ्यात तापमान आणि आर्द्रतेतील बदल, पाणी कमी पिण्याची सवय, संसर्गाचा वाढलेला धोका आणि बदललेला आहार यामुळे काही व्यक्तींमध्ये किडनीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

  • Que: पावसाळ्यात किडनी निरोगी ठेवण्यासाठी किती पाणी प्यावे?

    Ans: शरीराला पुरेसे पाणी मिळणे महत्त्वाचे आहे. मात्र पाण्याची गरज व्यक्तीनुसार बदलते.

  • Que: पावसाळ्यात किडनी इन्फेक्शनचा धोका वाढतो का?

    Ans: पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो. मूत्रमार्गाचा संसर्ग (UTI) झाल्यास त्यावर योग्य वेळी उपचार न केल्यास संसर्ग किडनीपर्यंत पोहोचू शकतो.

Web Title: Why does the strain on the kidneys increase during the monsoon follow these special tips to keep your kidneys healthy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • kidney damage
  • Kidney Health Tips
  • monsoon care

संबंधित बातम्या

पावसाळ्यात कान आणि सायनसच्या संसर्गाचा का वाढतो धोका? संसर्ग टाळण्यासाठी अशी पद्धतीने घ्या काळजी
1

पावसाळ्यात कान आणि सायनसच्या संसर्गाचा का वाढतो धोका? संसर्ग टाळण्यासाठी अशी पद्धतीने घ्या काळजी

किडनी स्टोनमुळे वारंवार पोटात वेदना होतात? मग ‘या’ पद्धतीने करा लिंबू पाण्याचे सेवन, लघवीवाटे स्टोन पडून जाईल बाहेर
2

किडनी स्टोनमुळे वारंवार पोटात वेदना होतात? मग ‘या’ पद्धतीने करा लिंबू पाण्याचे सेवन, लघवीवाटे स्टोन पडून जाईल बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.