Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किडनी स्टोनमुळे वारंवार पोटात वेदना होतात? मग ‘या’ पद्धतीने करा लिंबू पाण्याचे सेवन, लघवीवाटे स्टोन पडून जाईल बाहेर

किडनी स्टोन झाल्यानंतर नियमित लिंबू पाण्याचे सेवन करावे. लिंबू पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया लिंबू पाणी प्यायल्यामुळे खरचं किडनी स्टोनचा धोका कमी होतो का.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 15, 2026 | 01:10 PM
किडनी स्टोनमुळे वारंवार पोटात वेदना होतात? मग 'या' पद्धतीने करा लिंबू पाण्याचे सेवन, लघवीवाटे स्टोन पडून जाईल बाहेर

किडनी स्टोनमुळे वारंवार पोटात वेदना होतात? मग 'या' पद्धतीने करा लिंबू पाण्याचे सेवन, लघवीवाटे स्टोन पडून जाईल बाहेर

Follow Us
Follow Us:

लिंबू पाणी किडनीच्या आरोग्यासाठी खरंच चांगले आहे का?
लिंबू पाणी पिण्याचे फायदे?
किडनी स्टोन झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढता तणाव, पोषक घटकांची कमतरता, शारीरिक हालचालींचा अभाव आणि चुकीच्या वेळी अन्नपदार्थांचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींचा आरोग्यावर लगेच परिणाम दिसून येतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. शरीरसंबंधित समस्या उद्भवल्यानंतर कायमच दुर्लक्ष केले जाते. पण हेच छोटे आजार कालांतराने गंभीर स्वरूप घेतात आणि शरीराला हानी पोहचवतात. त्यातील अतिशय वेदनादायी आजार म्हणजे किडनी स्टोन. यामुळे पोटात कायमच वेदना होतात. मुतखडा मूत्रपिंडात तयार होणारा कठीण खनिज आणि क्षारांचा साठा आहे. हा साठा शरीरात तसाच साचून राहिल्यामुळे पोटात वेदना होतात काहीवेळा लघवीमध्ये सुद्धा अडथळे निर्माण करतो.(फोटो सौजन्य – istock)

सकाळी उठल्यानंतर पोटात कायमच जडपणा जाणवतो? मग ‘या’ पद्धतीने करा इरंडेल तेलाचे सेवन, आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ

लघवीवाटे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून न गेल्यामुळे घाण किडनीमध्ये तशीच साचून राहते. ज्याच्या परिणामामुळे किडनीमध्ये छोटे छोटे खडे तयार होतात. अशावेळी अनेक लोक सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून पितात. यामुळे केवळ किडनीलाच नाहीतर संपूर्ण शरीराला फायदे होतात. वाढलेले वजन नियंत्रणात राहते, शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते आणि आतड्यांमधील विषारी घाण बाहेर पडून जाते. आज आम्ही तुम्हाला किडनी स्टोन झाल्यानंतर कोणती लक्षणे दिसून येतात? नियमित लिंबू पाणी प्यायल्यामुळे किडनीचे आरोग्य चांगले राहते का? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.

किडनी स्टोन झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

  • पाठीच्या बाजूला किंवा पोटात असह्य वेदना होणे
  • लघवी करताना जळजळ किंवा तीव्र वेदना
  • लघवीतून रक्त पडणे
  • अचानक उलट्या किंवा मळमळ होणे.
  • संसर्ग झाल्यास थंडी ताप भरणे

लिंबू पाणी किडनीच्या आरोग्यासाठी खरंच चांगले आहे का?

लिंबू पाणी किडनीच्या आरोग्यासाठी जादुई उपाय मानला जात नाही. लिंबामधील सायट्रेट शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करते. शरीरास आवश्यक असलेल्या प्रमाणात पाणी प्यायल्यास शरीर हायड्रेट रहाण्यासोबतच लघवी पातळ होण्यास मदत होते. तसेच लिंबू पाणी प्यायल्यामुळे किडनी स्टोन होणारे घटक नष्ट होण्यास मदत होते. लिंबामध्ये सायट्रेट नावाचे सायट्रिक ऍसिड असते, ज्यामुळे लघवीतील कॅल्शियमसोबत संयोग स्फटिकांना एकत्र चिकटण्यापासून रोखण्यास मदत करतात. मुतखडा होण्याचे प्रमुख कारण म्हणजे शरीरात कॅल्शियम साचून राहणे.

Body Muscles: स्नायू मजबूत करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा आवर्जून समावेश करा!

कोणत्याही वेळी लिंबू पाण्याचे सेवन करू नये. सर्दी, खोकला किंवा संसर्ग होत असल्यास लिंबू पाणी कोमट पाण्यामध्ये प्यावे. लिंबू पाणी पिण्याची सामान्य पद्धत म्हणजे कोमट पाण्यात एक चमचा लिंबाचा रस मिक्स करून पिणे. लिंबू पाण्याची चव आणखीनच वाढवण्यासाठी तुम्ही त्यात पुदिना किंवा काकडीसुद्धा मिक्स करू शकता. दातांवरील सायट्रिक ऍसिडचा प्रभाव कमी करण्यासाठी लिंबू पाणी प्यायल्यानंतर साध्या पाण्याने चूळ भरावी. यामुळे दात आंबट होणार नाहीत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: किडनी स्टोनमुळे पोटात किंवा कंबरेत वेदना का होतात?

    Ans: किडनी स्टोन मूत्रवाहिनीत अडकला किंवा त्याच्या हालचालीमुळे तीव्र वेदना होऊ शकतात. वेदना कंबर, पोटाच्या खालच्या भागात किंवा जांघेपर्यंत जाणवू शकतात.

  • Que: किडनी स्टोनसाठी लिंबू पाणी फायदेशीर आहे का?

    Ans: लिंबामध्ये सायट्रेट असते, जे काही प्रकारच्या किडनी स्टोनच्या निर्मितीपासून बचाव करण्यास मदत करू शकते. तसेच पुरेसे द्रवपदार्थ घेतल्याने लघवीचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

  • Que: लिंबू पाणी प्यायल्याने किडनी स्टोन लघवीवाटे बाहेर पडतो का?

    Ans: लिंबू पाणी प्यायल्याने प्रत्येक किडनी स्टोन नक्कीच बाहेर पडेल असे नाही. स्टोनचा आकार, प्रकार आणि तो कुठे अडकला आहे यावर उपचार अवलंबून असतात.

Web Title: Do you experience frequent abdominal pain due to kidney stones then consume lemon water in this way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 01:10 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • kidney damage
  • Kidney stones

संबंधित बातम्या

Kidney Detox Food: किडनीमधील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी खा ‘हे’ हेल्दी पदार्थ, शरीर होईल स्वच्छ
1

Kidney Detox Food: किडनीमधील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी खा ‘हे’ हेल्दी पदार्थ, शरीर होईल स्वच्छ

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल
2

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
3

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
4

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.