जेवणाला येईल स्वादिष्ट चव! झटपट घरी बनवा आंध्रप्रदेश स्टाईल स्पेशल टोमॅटो लोणचं, नोट करून घ्या रेसिपी
Food Recipe: राज्यासह संपूर्ण देशभरात मोठ्या आनंद आणि उत्साहात दिवाळी साजरा केली जाते. सणावारांच्या दिवसांमध्ये घरात गोड पदार्थ बनवले जातात. पण नेहमीच गोड पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास काहींना काही तिखट आणि चमचमीत पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही गरमागरम भाकरी आणि भातासोबत खाण्यासाठी आंध्रप्रदेश स्टाईल स्पेशल टोमॅटो लोणचं बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. टोमॅटोपासून भाजी, सूप किंवा चटणी इत्यादी ठराविक पदार्थ बनवले जातात. टोमॅटोचं लोणचं कोणत्याही पदार्थासोबत खायला सुंदर लागते. हे लोणचं दोन ते तीन आठवड्यांपर्यंत व्यवस्थित टिकून राहते. जेवणात भाजी बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर तुम्ही टोमॅटोचे लोणचं बनवू शकता. चला तर जाणून घेऊया टोमॅटो लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






