Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World COPD Day: राज्यात वायुप्रदूषणामुळे श्वसनविकारांचे आजार! प्रदूषणामुळे सीओपीडीचा धोका; धूम्रपान न करणाऱ्यांनाही वाढत धोका

World COPD Day: फुफ्फुसांमध्ये फायब्रॉसिस, ब्रॉन्किएक्टेसिस किंवा श्वसनमार्गात कायमस्वरूपी अडथळे निर्माण होतात. अशा व्यक्तींना प्रदूषित वातावरणात खोकला, कफ आणि धाप लागण्याचा त्रास वाढू शकतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 18, 2026 | 09:00 AM
राज्यात वायुप्रदूषणामुळे श्वसनविकारांचे आजार! प्रदूषणामुळे सीओपीडीचा धोका; धूम्रपान न करणाऱ्यांनाही वाढत धोका

राज्यात वायुप्रदूषणामुळे श्वसनविकारांचे आजार! प्रदूषणामुळे सीओपीडीचा धोका; धूम्रपान न करणाऱ्यांनाही वाढत धोका

Follow Us
Follow Us:

World COPD Day: धूम्रपान करणाऱ्यांनाच फुफ्फुसांचा गंभीर आजार होतो, हा समज चुकीचा ठरत आहे. वाहनांचा धूर, औद्योगिक प्रदूषण, बांधकामांची धूळ आणि घरातील चुलीचा धूर यांमुळे धूम्रपान न करणाऱ्यांनाही फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी करणारा सीओपीडी आजार होण्याचा धोका वाढत आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील वाढते वायुप्रदूषण श्वसनसंस्थेसाठी चिंतेचा विषय बनले असून, दमा आणि सीओपीडीच्या रुग्णांना त्याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः क्षयरोगातून बरे झालेल्या रुग्णांच्या फुफ्फुसांवरही प्रदूषणाचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असा इशारा शिवडी टीबी रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधीक्षक ज्येष्ठ फुफ्फुसरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र टी. ननावरे यांनी दिला आहे. आजच्या १८ नोव्हेंबर रोजी जागतिक सीओपीडी दिनानिमित्त त्यांनी श्वसनविकारांच्या लवकर निदानाचे महत्त्व स्पष्ट केले.(फोटो सौजन्य – istock)

Bloating Remedies: सतत आंबट ढेकर किंवा पित्ताचा त्रास कशामुळे होतो? अपचनाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

क्षयरोगातून बरे झाल्यानंतरही धोका:

क्षयरोगातून रुग्ण बरा झाला तरी काहींच्या फुफ्फुसांमध्ये फायब्रॉसिस, ब्रॉन्किएक्टेसिस किंवा श्वसनमार्गात कायमस्वरूपी अडथळे निर्माण होतात. अशा व्यक्तींना प्रदूषित वातावरणात खोकला, कफ आणि धाप लागण्याचा त्रास वाढू शकतो. सतत खोकला येणे, छातीत घरघर आणि चालताना दम लागणे ही सीओपीडीची लक्षणे असू शकतात. त्याकडे केवळ वयोमानामुळे होणारा त्रास म्हणून दुर्लक्ष करू नये.

मुंबईत सीओपीडीचे प्रमाण ६.८ टक्के

मुंबई आणि पुणे येथे करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय बोल्ड संशोधनानुसार ४० वर्षांवरील व्यक्तींमध्ये सीओपीडीचे प्रमाण अनुक्रमे ६.८ टक्के आणि ६.२ टक्के आढळले. मुंबईतील पी. डी. हिंदुजा रुग्णालयात २०१४-१५ दरम्यान करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत ३२६ व्यक्तींपैकी ३८ जणांना, म्हणजेच सुमारे १२ टक्के व्यक्तींना, पूर्वी निदान न झालेला सीओपीडी आढळून आला. हे सांगताना डॉ. ननावरे यांनी वाढते वायुप्रदूषण, धूम्रपान, औद्योगिक धूळ आणि क्षयरोगानंतर फुफ्फुसांमध्ये राहणारे बदल या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन खोकला व धाप लागणाऱ्या रुग्णांची स्पायरोमेट्री तपासणी महत्त्वाची आहे.

National Epilepsy Day: फिट्सबद्दलचे गैरसमज करा दूर! प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत ‘हे’ महत्त्वाचे गैरसमज आणि सत्य

स्पायरोमेट्रीने लवकर निदान होतेय शक्य

सीओपीडीचे निदान करण्यासाठी स्पायरोमेट्री ही महत्त्वाची तपासणी आहे. योग्य इनहेलर उपचार, धूम्रपानापासून दूर राहणे, लसीकरण आणि श्वसन पुनर्वसनामुळे रुग्णांचे जीवनमान सुधारू शकते. आपण उंच इमारती बांधल्या, मोठे महामार्ग उभारले आणि औद्योगिक प्रगती साधली; मात्र नागरिकांना शुद्ध हवा मिळत नसेल तर त्या विकासाचा उपयोग काय? प्रदूषण ही केवळ पर्यावरणाची समस्या नसून मानवी आरोग्य आणि भविष्यातील पिढ्यांच्या अस्तित्वाशी संबंधित गंभीर समस्या आहे. प्रदूषणाच्या काळात दमा आणि सीओपीडीच्या रुग्णांनी औषधे नियमित घेणे, प्रदूषण जास्त असताना बाहेरचा व्यायाम टाळणे आणि आवश्यकतेनुसार एन९५ मास्क वापरणे गरजेचे आहे. दीर्घकाळ खोकला किंवा धाप लागत असल्यास वैद्यकीय तपासणी करून घेण्याचे आवाहनही डॉ ननावरे यांनी केले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: वायुप्रदूषणामुळे कोणते श्वसनविकार होऊ शकतात?

    Ans: वायुप्रदूषणामुळे दमा, ब्राँकायटिस, सीओपीडी आणि फुफ्फुसांशी संबंधित इतर श्वसनविकारांचा धोका वाढू शकतो. प्रदूषित हवेमधील सूक्ष्म कण श्वसनमार्ग आणि फुफ्फुसांवर परिणाम करतात.

  • Que: सीओपीडी म्हणजे काय?

    Ans: सीओपीडी (Chronic Obstructive Pulmonary Disease) हा फुफ्फुसांचा दीर्घकालीन आजार आहे. यामध्ये श्वसनमार्ग अरुंद होतात आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.

  • Que: धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींनाही सीओपीडी होऊ शकतो का?

    Ans: होय. धूम्रपान हे सीओपीडीचे प्रमुख कारण असले तरी वायुप्रदूषण, घरातील धूर, औद्योगिक धूळ, रासायनिक वायू आणि बायोमास इंधनाच्या धुराच्या संपर्कामुळेही धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींना सीओपीडी होऊ शकतो.

Web Title: World copd day air pollution in the state is leading to respiratory ailments pollution increases the risk of copd sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • healthy lungs
  • Lung health

संबंधित बातम्या

Thyroid Symptoms: थायरॉईड झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा उद्भवतील गंभीर समस्या
1

Thyroid Symptoms: थायरॉईड झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा उद्भवतील गंभीर समस्या

National Epilepsy Day: फिट्सबद्दलचे गैरसमज करा दूर! प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत ‘हे’ महत्त्वाचे गैरसमज आणि सत्य
2

National Epilepsy Day: फिट्सबद्दलचे गैरसमज करा दूर! प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत ‘हे’ महत्त्वाचे गैरसमज आणि सत्य

Hands Feet Itch: हातापायांच्या तळव्यांना कायमच खाज येते? जाणून घ्या त्यामागील कारणे आणि घरगुती उपाय
3

Hands Feet Itch: हातापायांच्या तळव्यांना कायमच खाज येते? जाणून घ्या त्यामागील कारणे आणि घरगुती उपाय

Male Fertility Tips: फॉलिक ॲसिड केवळ महिलांसाठीच नाही; तर पुरुषांच्या प्रजनन आरोग्यासाठीही आवश्यक, जाणून घ्या सविस्तर
4

Male Fertility Tips: फॉलिक ॲसिड केवळ महिलांसाठीच नाही; तर पुरुषांच्या प्रजनन आरोग्यासाठीही आवश्यक, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.