
Thyroid Symptoms: थायरॉईड झाल्यानंतर दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा उद्भवतील गंभीर समस्या
थारयरॉइडमुळे हार्मोनल संतुलन का बिघडते?
थायरॉइडची लक्षणे कोणती?
थायरॉईडचे मुख्य प्रकार कोणते?
Thyroid Symptoms: हल्ली तरुण वयात शरीराला गंभीर आजारांची लागण होते. आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता आणि जीवनशैलीतील बदलांमुळे आरोग्यावर थेट परिणाम होतात. थायरॉईडची समस्या अतिशय सामान्य झाली आहे. पण वेळीच लक्ष न दिल्यास गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. मानेच्या पुढील बाजूला असलेली छोटी ग्रंथी म्हणजे थायरॉईड. शरीरातील चयापचय क्रिया , शरीराचे तापमान, हृदयाचे ठोके आणि ऊर्जेचा वापर नियंत्रित करणारे हार्मोन्स तयार करणे इत्यादी कामे थायरॉईड ग्रंथी करते. पण गरजेपेक्षा थायरॉईड ग्रंथी कमी किंवा जास्त झाल्यास शरीराच्या विविध अवयवांवर परिणाम होतो. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे वेळीच लक्ष देऊन योग्य ते उपचार करावेत.(फोटो सौजन्य – istock)
Hands Feet Itch: हातापायांच्या तळव्यांना कायमच खाज येते? जाणून घ्या त्यामागील कारणे आणि घरगुती उपाय
हायपोथायरॉईडिझम: थायरॉईड ग्रंथीतून आवश्यकतेपेक्षा कमी हार्मोन्स तयार करते.
हायपरथायरॉईडिझम: थायरॉईड ग्रंथीतून आवश्यकतेपेक्षा जास्त हार्मोन्स तयार करते.
वजनात होणाऱ्या बदलांकडे प्रामुख्याने लक्ष दिले जात नाही. पण वाढत्या किंवा कमी झालेल्या थायरॉईड हार्मोन्सचा शरीराच्या चयापचय क्रियेवर परिणाम होतो. हायपोथायरॉईडिझमची लागण झाल्यानंतर चयापचयाची गती मंदावल्यामुळे वजन वाढण्याची जास्त शक्यता असते. तर हायपरथायरॉईडिझममध्ये चयापचयाची गती वाढल्याने आहार व्यवस्थित असूनही वजन झपाट्याने कमी होऊन जाते.
थायरॉईड हार्मोन्सची पातळी वाढल्यानंतर हृदयाचे ठोके वेगाने वाढतात. याशिवाय काहीवेळा हृदयाची धडधड जाणवणे, अस्वस्थ वाटणे किंवा हात थरथरणे इत्यादी लक्षणे सुद्धा दिसू लागतात. महिलांमध्ये प्रामुख्याने थायरॉईड दिसून येतो. थायरॉईड हार्मोन्सच्या असंतुलनामुळे मासिक पाळीच्या चक्रात बदल होतात, ज्याच्या परिणामामुळे रक्तस्त्राव जास्त प्रमाणात होणे, कमी होणे किंवा अनियमित होणे इत्यादी अनेक लक्षणे दिसतात. याशिवाय वाढत्या थायरॉइडचा परिणाम गर्भधारणेवर सुद्धा होऊ शकतो.
बाळ जन्माला येताच रडतंच का? हसत का नाही? जाणून घ्या यामागचं क्रेझी लॉजीक आणि सायन्स
थायरॉईड ग्रंथीचा आकार वाढल्यानंतर मानेच्या पुढील भागात सूज किंवा गाठ दिसू लागते. याला गॉइटर असे म्हणतात. यामुळे काहीवेळा अन्नपदार्थ गिळताना त्रास होण्याची शक्यता असते. थायरॉइडचा पचनसंस्थेवर सुद्धा परिणाम होतो. हायपोथायरॉईडिझममध्ये पचनाची गती मंदावल्यामुळे बद्धकोष्ठता होते तर हायपरथायरॉईडिझममध्ये वारंवार शौचास होणे किंवा जुलाब लागल्यासारखे वाटू लागते.
Ans: थायरॉईड ही मानेच्या पुढील भागात असलेली फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे. ही ग्रंथी शरीरातील चयापचय, ऊर्जा निर्मिती, हृदयाचे ठोके आणि शरीराचे तापमान नियंत्रित करणारे हार्मोन्स तयार करते.
Ans: होय. हायपोथायरॉईडिझममध्ये थायरॉईड हार्मोन्सची निर्मिती कमी झाल्यामुळे चयापचयाची गती मंदावते. त्यामुळे काही व्यक्तींमध्ये वजन वाढू शकते.
Ans: थायरॉईडच्या समस्येच्या प्रकारानुसार उपचार ठरतात. काही रुग्णांमध्ये तात्पुरती समस्या असू शकते, तर काहींना दीर्घकाळ औषधे घ्यावी लागतात. नियमित तपासणी आणि योग्य उपचारांमुळे थायरॉईड नियंत्रणात ठेवता येतो.