सतत आंबट ढेकर किंवा पित्ताचा त्रास कशामुळे होतो? अपचनाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी करा 'हे' उपाय
Bloating Remedies: धावपळीच्या जीवनशैलीमुळे बऱ्याचदा स्स्वयंपाक बनवण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. सतत कामात व्यस्थ राहिल्यामुळे शरीराकडे खूप जास्त दुर्लक्ष केले जाते. जेवल्यानंतर लगेच आंबट ढेकर येणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, पोटातून आवाज येणे, वारंवार गॅस बाहेर पडणे इत्यादी समस्या उद्भवतात. खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन न झाल्यामुळे अपचनाच्या समस्या कायमच उद्भवतात. आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून न गेल्यामुळे सकाळी पोटात जडपणा जाणवतो आणि गॅस झाल्यासारखे वाटते. कायमच साधा पचनाचा त्रास म्हणून शरीराकडे दुर्लक्ष केले जाते. पण असे केल्यामुळे गंभीर आजार सुद्धा वाढतात. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करणे सुद्धा फार आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
अन्नपदार्थांचे सेवन करताना किंवा कोणताही पदार्थ पिताना काही प्रमाणात पोटामध्ये हवा सुद्धा जाते. घाईघाईने जेवणे, अन्नपदार्थ व्यवस्थित चावून न खाणे, जेवताना बोलणे, स्ट्रॉने पेये पिणे किंवा सतत काहींना काही खात राहिल्यामुळे पोटात हवा जाण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन न झाल्यामुळे घशात जळजळ आणि आंबट ढेकर येऊन घशाजवळ काहीतरी अडकल्यासारखे वाटते.
काही पदार्थ पचन होताना आतड्यांमध्ये विघटन होतात. या प्रक्रियेमुळे गॅस तयार होण्याची जास्त शक्यता असते. कडधान्ये, हरभरा, राजमा, वाटाणे, कोबी, फ्लॉवर, कांदा यांसारखे पदार्थ आतड्यांमध्ये गॅस वाढवतात. तर काहींना दूध सहज पचन होत नाही. दुधामध्ये असलेल्या लॅक्टोजमुळे पोट फुगणे किंवा गॅस होण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय शरीरात वाढलेली बद्धकोष्ठता, कमी शारीरिक हालचाल, गोळ्या औषधांचे सेवन, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम यांसारख्या पचनाच्या विविध समस्या उद्भवल्यामुळे पोटात गॅस तयार होतात.
आतड्यांमध्ये वाढलेला गॅस कमी करण्यासाठी जेवणानंतर लगेच झोपणे टाळावे. जेवण आणि झोप यामध्ये ३ तासांचे अंतर असणे फार आवश्यक आहे. जेवण झाल्यानंतर १५ ते २० मिनिटं चालावे. यामुळे पचनसंस्था सुधारते आणि खाल्लेले अन्नपदार्थ पचन होण्यास मदत होते. दिवसभर एका जागेवर बसून काम करत राहिल्यामुळे अपचनाच्या तक्रारी वाढू लागतात. त्यामुळे १ किंवा २ तासांचे अंतराने उभं राहणे किंवा चालणे आवश्यक आहे. पोटात वाढलेला गॅस कमी करण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यासोबतच आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाते. आहारात फायबरचा समावेश करावा. सोडा, कोल्ड्रिंक्स आणि कार्बोनेटेड पेये पिणे टाळावे. दूध, गहू, कांदा, कडधान्ये किंवा विशिष्ट फळे खाल्ल्यानंतर गॅस होत असेल तर आहारात अजिबात समावेश करू नये.
Ans: सतत आंबट ढेकर येण्यामागे अॅसिडिटी, अपचन, पोटात जास्त आम्ल तयार होणे किंवा पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत येणे ही कारणे असू शकतात.
Ans: पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत आल्यामुळे आंबट ढेकर, छातीत जळजळ आणि घशात आंबटपणा जाणवू शकतो. या स्थितीला अॅसिड रिफ्लक्स म्हणतात.
Ans: वारंवार आंबट ढेकर येणे हे अॅसिड रिफ्लक्स किंवा GERD (Gastroesophageal Reflux Disease) चे लक्षण असू शकते. काही वेळा गॅस्ट्रायटिस किंवा पचनाशी संबंधित इतर समस्यांमुळेही असा त्रास होतो.






