
National Epilepsy Day: फिट्सबद्दलचे गैरसमज करा दूर! प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत 'हे' महत्त्वाचे गैरसमज आणि सत्य
National Epilepsy Day: अपस्मार (Epilepsy) या आजाराबाबत आजही समाजात भीती, गैरसमज आणि भेदभाव दिसून येतो. त्यामुळे या आजारासोबत जगणाऱ्या रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या आजाराबाबत जनजागृती करणे, वेळेवर उपचार घेणे आणि फिट्स आल्यास रुग्णाला कशी मदत करावी, हे समजून घेणे महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. याविषयी डॉ. आकाश छेडा, न्यूरोलॉजिस्ट, झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटल, घाटकोपर, मुंबई यांनी सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)
Hands Feet Itch: हातापायांच्या तळव्यांना कायमच खाज येते? जाणून घ्या त्यामागील कारणे आणि घरगुती उपाय
अपस्मार हा मेंदूशी संबंधित आजार असून जगभरातील लाखो लोकांना याचा त्रास होतो. मात्र, या आजाराबाबत अनेक गैरसमज आजही समाजात आहेत. अपस्मार हा संसर्गजन्य आजार आहे, या रुग्णांना नेहमी गंभीर त्रास होतो किंवा ते सामान्य जीवन जगू शकत नाहीत, असे अनेकांना वाटते. अशा गैरसमजांमुळे रुग्णांना भेदभाव, सामाजिक एकटेपणा आणि वेळेवर उपचार न मिळण्यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे भीती न बाळगता योग्य माहिती समजून घेणे आणि अपस्माराच्या रुग्णांना सहकार्य करणे गरजेचे आहे.
अपस्मार हा मेंदूशी संबंधित आजार आहे. यामध्ये मेंदूतील विद्युत हालचालींमध्ये अनियमितता निर्माण झाल्यामुळे वारंवार फिट्स येतात. योग्य निदान, औषधोपचार आणि डॉक्टरांच्या नियमित सल्ल्याने अनेक रुग्ण हा आजार नियंत्रणात ठेवून सक्रिय आणि सामान्य जीवन जगू शकतात.
सत्य: अपस्मार हा संसर्गजन्य आजार नाही. रुग्णाला स्पर्श केल्याने, मिठी मारल्याने, त्याच्यासोबत जेवण केल्याने किंवा त्याच्या जवळ राहिल्याने हा आजार पसरत नाही. मेंदूतील विद्युत हालचालींमधील अनियमिततेमुळे हा त्रास होतो. त्यामुळे अपस्माराच्या रुग्णांना इतरांप्रमाणेच प्रेम, आदर आणि स्वीकार मिळायला हवा.
सत्य: हा एक सामान्य आणि धोकादायक गैरसमज आहे. फिट्स आल्यावर व्यक्ती स्वतःची जीभ गिळू शकत नाही. अशा वेळी रुग्णाच्या तोंडात बोटे, चमचा किंवा इतर कोणतीही वस्तू घालू नये. त्याऐवजी रुग्णाच्या आजूबाजूच्या धोकादायक वस्तू दूर कराव्यात, डोक्याखाली मऊ वस्तू ठेवावी, गळ्याभोवतीचे घट्ट कपडे सैल करावेत आणि शक्य असल्यास रुग्णाला हळूच एका कुशीवर वळवावे.
सत्य: प्रत्येक रुग्णाला सारखेच फिट्स येतात असे नाही. काही रुग्णांना शरीराला जोरदार झटके येतात, तर काही रुग्ण काही वेळ एकटक पाहत राहतात, गोंधळल्यासारखे वागतात, विचित्र संवेदना अनुभवतात किंवा काही काळासाठी आजूबाजूच्या गोष्टींचे भान हरवतात. काही प्रकारचे फिट्स ओळखणे कठीण असते. त्यामुळे योग्य वैद्यकीय तपासणी करणे महत्त्वाचे आहे.
Health Update: अतिउष्णतेमुळे गर्भवतींना गंभीर धोका! मुदतपूर्व प्रसूती झाल्यास गर्भातच मृत्यूची भीती
सत्य: योग्य उपचार आणि डॉक्टरांकडून नियमित तपासणी केल्यास अपस्माराचे अनेक रुग्ण शिक्षण घेऊ शकतात, नोकरी करू शकतात, सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात आणि आनंदी जीवन जगू शकतात. फिट्स नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घेणे आणि त्यांच्या सल्ल्याचे पालन करणे आवश्यक आहे.
अपस्माराच्या आजाराबाबत कुटुंबीय, शाळा आणि कामाच्या ठिकाणीही योग्य माहिती असणे गरजेचे आहे. फिट्स आल्यास प्रथमोपचार कसे करावेत, चुकीचे समज टाळावेत आणि रुग्णांना मानसिक आधार द्यावा. यामुळे अपस्माराच्या रुग्णांना सन्मानाने आणि आत्मविश्वासाने जीवन जगण्यास मदत होऊ शकते.
Ans: फिट्स म्हणजे मेंदूतील विद्युत क्रियेमध्ये अचानक होणाऱ्या असामान्य बदलांमुळे उद्भवणारी स्थिती. यामध्ये व्यक्तीला झटके येणे, शुद्ध हरपणे, शरीराला कंप सुटणे किंवा काही काळ गोंधळल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसू शकतात.
Ans: नाही. एकदा फिट्स आल्याने व्यक्तीला मिरगी आहे असे म्हणता येत नाही. ताप, रक्तातील साखरेची कमतरता, मेंदूला झालेली दुखापत किंवा इतर कारणांमुळेही झटके येऊ शकतात. मिरगीचे निदान डॉक्टर करतात.
Ans: अजिबात नाही. फिट्स येत असताना व्यक्तीच्या तोंडात चमचा, बोट, पाणी किंवा कोणतीही वस्तू घालू नये. यामुळे दात, जीभ आणि तोंडाला गंभीर दुखापत होऊ शकते.