World Diabetes Day 2025 : डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणजे काय? जाणून घ्या कोणाला जास्त धोका आणि कसे कराल संरक्षण ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) 30-40% मधुमेही रुग्णांना मूत्रपिंड विकारांचा धोका.
रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रित ठेवणे : डायबेटिक नेफ्रोपॅथी रोखण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय.
अस्वास्थ्यकर जीवनशैली, लठ्ठपणा, धूम्रपान आणि दीर्घकाळचा मधुमेह : मूत्रपिंड बिघाडाचे मुख्य कारण.
World Diabetes Day 2025 : दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी ‘जागतिक मधुमेह दिन’ (World Diabetes Day) साजरा केला जातो, ज्याचा प्रमुख उद्देश म्हणजे जगभर झपाट्याने वाढणाऱ्या मधुमेहाबद्दल जनजागृती करणे. अनियमित जीवनशैली, चुकीचे आहारमान आणि सतत वाढणारा ताण यामुळे आज मधुमेह हा वैश्विक आरोग्यसंकट ठरला आहे. भारतात तर या आजाराचे प्रमाण इतक्या वेगाने वाढत आहे की देशाला “जगातील मधुमेहाची राजधानी” असेही म्हटले जाते. ICMR च्या अहवालानुसार भारतात तब्बल १० कोटींपेक्षा अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत, आणि ही संख्या आगामी वर्षांत आणखी वाढेल, असे तज्ज्ञ सतत सांगतात. मात्र केवळ मधुमेहच नाही, तर त्यातून होणारे दुष्परिणामही अधिक चिंताजनक आहेत—विशेषतः मूत्रपिंडांवरील ताण.
ज्येष्ठ एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. वसीम गोहारी यांच्या मते, ज्यांच्या रक्तातील साखरेची पातळी दीर्घकाळ जास्त असते, त्यांच्यात मूत्रपिंड विकाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. रक्तातील जास्त साखर शरीरातील सूक्ष्म रक्तवाहिन्यांना हळूहळू नुकसान पोहोचवते. ह्या अतिसूक्ष्म रक्तवाहिन्यांचे मुख्य कार्य म्हणजे रक्त शुद्ध करणे. परंतु साखर सतत वाढलेली राहिल्यास या रक्तवाहिन्या कमजोर होतात, गळू लागतात आणि त्यांची शुद्धीकरण क्षमता कमी होते. यालाच वैद्यकीय भाषेत डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, 30-40% मधुमेही रुग्णांना मूत्रपिंडाच्या समस्या उद्भवतात, जे चिंतेचे कारण आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Tehran Chaos : पाकिस्तानच्या सीमेवर ‘हा’ देश बांधणार आपली राजधानी; तेहरानमध्ये सध्या परिस्थिती अस्थिर
सर्व मधुमेही रुग्णांना मूत्रपिंडाचा आजार होतोच असे नाही, मात्र काही घटक धोका वाढवू शकतात
दीर्घकाळापासून असलेला मधुमेह
उच्च रक्तदाब
धूम्रपान
लठ्ठपणा
कुटुंबात मधुमेह किंवा मूत्रपिंड विकाराचा इतिहास
काही अभ्यासांनुसार पुरुषांमध्ये हा धोका महिलांपेक्षा थोडा अधिक आढळतो.
अमेरिकन डायबिटीज असोसिएशन स्पष्टपणे सांगते की,
रक्तातील साखर + रक्तदाब हे दोन्ही नियंत्रित ठेवणे हे मूत्रपिंडांचे सर्वात प्रभावी रक्षण आहे.
डॉक्टरांच्या मते, जीवनशैलीतील काही लहान बदल मोठा फरक घडवू शकतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ciel Dubai Marina : आकाशाला भिडणारी आलिशानता; ‘हे’ आहे दुबईतील 377 मीटर उंच आणि भव्यदिव्य हॉटेल
नियमित तपासणी, वेळेवर औषधे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू ठेवणे अत्यावश्यक.
जास्त मीठामुळे रक्तदाब वाढतो आणि मूत्रपिंडांवर ताण येतो.
नियमित शारीरिक हालचाल शरीराची इंसुलिन संवेदनशीलता वाढवते.
सफरचंद, पेरू, ओट्स, पालक यांसारखे पदार्थ मूत्रपिंडांसाठी फायदेशीर.
लवकर निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात.
या लेखातील सर्व माहिती तज्ज्ञ व डॉक्टरांशी झालेल्या चर्चेवर आधारित असून, आणि तज्ञांनी पडताळणी केलेली आहे. तथापि, कोणत्याही प्रकारची वैद्यकीय समस्या असल्यास, तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.






