Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wrinkles Home Remedies: चेहऱ्यावरील सुरकुत्या कायमच्या होतील दूर! ‘या’ हिरव्या पानांचा फेसपॅक त्वचेवर आणेल तारुण्य

चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी कोथिंबिरीच्या फेसपॅकचा वापर करावा. यामुळे त्वचा अधिक सुंदर होण्यास मदत होईल. जाणून घ्या कोथिंबीर फेसपॅक बनवण्याची सोपी कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 07, 2025 | 10:11 AM
चेहऱ्यावरील सुरकुत्या कायमच्या होतील दूर! 'या' हिरव्या पानांचा फेसपॅक त्वचेवर आणेल तारुण्य

चेहऱ्यावरील सुरकुत्या कायमच्या होतील दूर! 'या' हिरव्या पानांचा फेसपॅक त्वचेवर आणेल तारुण्य

Follow Us
Follow Us:

हल्ली कमी वयात महिलांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसून येतात. चेहऱ्यावर सुरकुत्यांसोबतच पिंपल्स, वांग किंवा मोठे फोड इत्यादी त्वचेसंबंधित समस्या दिसून येतात. यामुळे त्वचा काहीशी खराब होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. कधी पार्लरमध्ये जाऊन फेशिअल केले जाते तर कधी वेगवेगळ्या महागड्या स्किन ट्रीटमेंट करून त्वचेची गुणवत्ता सुधारली जाते. याशिवाय त्वचा कायमच सुंदर दिसावी म्हणून महिला स्किन केअर रुटीन फॉलो करतात. स्किन केअर रुटीन फॉलो करताना महागड्या क्रीम किंवा इतर लोशन लावून त्वचेची काळजी घेतली जाते. पण यामुळे काही काळच त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसते. मात्र कालांतराने पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)

बदलत्या हवामानातही ओठांचे सौंदर्य आणि निरोगीपणा टिकवण्याचे सोपे घरगुती उपाय

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्यांमुळे त्वचा अधिकच निस्तेज दिसू लागते. याशिवाय चेहऱ्यावरील ग्लो कमी होऊन जातो. चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी बाजारातील महागड्या क्रीमचा वापर न करता घरगुती पदार्थांचा वापर करावा. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो कायमच टिकून राहतो आणि त्वचा अधिक सुंदर दिसते. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी कोथिंबिरीच्या पानांचा फेसपॅक बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हा फेसपॅक चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करेल.

नॅचरल फेसपॅक बनवण्याची सोपी कृती:

जेवणातील पदार्थांची चव वाढवण्यासाठी कोथिंबिरीचा वापर केला जातो. याशिवाय त्वचेच्या समस्येंपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही कोथिंबीरीचा वापर करू शकता. यामध्ये असलेले घटक त्वचेवर नैसर्गिक ग्लो देतात. कोथिंबिरीत अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट, बीटा कॅरोटिन, विटामिन सी आणि फोलेट इत्यादी अनेक घटक आढळून येतात. यामुळे त्वचा चमकदार आणि सुंदर होते. फ्री रॅडिकल्सपासून त्वचेचा बचाव करण्यासाठी कोथिंबिरीचा वापर करावा. कोथिंबिरीमध्ये अ‍ॅंटी-फंगल गुणधर्म आढळून येतात. याशिवाय स्किन इन्फेक्शनपासून त्वचेचा बचाव करण्यासाठी आणि त्वचेवर तेलकटपणा कमी करण्यासाठी कोथिंबिरीचा वापर करावा.

मॉईश्चरायझर लावून सुद्धा चेहरा सतत कोरडा पडत असेल तर ‘या’ सवयी वेळीच बदला, चुकीच्या सवयींमुळे होईल त्वचेचे नुकसान

फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर टाकून बारीक पेस्ट बनवून वाटीमध्ये काढून घ्या. त्यानंतर त्यात तांदळाचे पीठ टाकून मिक्स करून घ्या. तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचेवर जमा झालेले अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत होईल आणि सुरकुत्या कमी होतील. चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा कोथिंबिरीचा फेसपॅक लावावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Wrinkles on the face will be gone forever this face pack of green leaves will bring youth to the skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 10:11 AM

Topics:  

  • home remedies
  • skin care tips
  • skin problem

संबंधित बातम्या

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब
1

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल
2

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल

Soap Selection Tips: साबणामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होतेय? त्वचेसाठी साबण निवडताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
3

Soap Selection Tips: साबणामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होतेय? त्वचेसाठी साबण निवडताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

Hair Care Tips: शिल्लक राहिलेल्या जास्वदींच्या फुलांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कंडिशनर, केस होतील मुलायम
4

Hair Care Tips: शिल्लक राहिलेल्या जास्वदींच्या फुलांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कंडिशनर, केस होतील मुलायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.