मॉईश्चरायझर लावून सुद्धा चेहरा सतत कोरडा पडत असेल तर 'या' सवयी वेळीच बदला
चेहऱ्याच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो तर कधी महागड्या ट्रीटमेंट करून त्वचेची काळजी घेतली जाते. पण सतत केमिकलयुक्त स्किन केअर प्रॉडक्ट चेहऱ्यावर लावल्यामुळे त्वचा अतिशय कोरडी होऊन जाते. सुंदर आणि डागविरहित त्वचेसाठी महिला पार्लरमध्ये जाऊन फेशिअल किंवा क्लीनअप करून घेतात. मात्र तरीसुद्धा चेहऱ्यावरील डाग किंवा कोरडेपणा कमी होत नाही. चुकीच्या पद्धतीने त्वचेची काळजी घेतल्यास चेहऱ्यावर ग्लो येण्याऐवजी त्वचा आणखीनच निस्तेज आणि रुक्ष होऊन जाईल. त्यामुळे त्वचेची काळजी योग्य पद्धतीने घ्यावी.(फोटो सौजन्य – istock)
Lip Care Tips: ओठ कायमच कोरडे आणि निस्तेज दिसतात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा गुलाबी ओठ
त्वचा स्वच्छ केल्यानंतर त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहण्यासाठी मॉईश्चराईझचा वापर केला जातो. त्वचेला सूट होईल असे जेल बेस किंवा क्रीम बेस मॉईश्चराईझ लावले जाते. पण तरीसुद्धा त्वचा कोरडीच दिसते. वारंवार चेहऱ्यावर मॉईश्चराईझ लावल्यामुळे त्वचेला हानी पोहचण्याची शक्यता असते.स्किन केअर करताना केलेल्या लहान लहान चुका त्वचा खराब होण्यास कारणीभूत ठरतात. त्वचेमधील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मॉईश्चराईझ लावले जाते. पण मॉईश्चराईझ लावूनसुद्धा त्वचा कोरडीच दिसते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्किन केअर करताना केलेल्या कोणत्या चुकांमुळे त्वचा अतिशय कोरडी आणि निस्तेज वाटते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
अनेकांना सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत स्किन केअर करायला खूप जास्त आवडत. पण वारंवार केमिकलयुक्त स्किन केअर प्रॉडक्ट चेहऱ्यावर लावल्यामुळे त्वचा अतिशय खराब होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. अंघोळ केल्यानंतर त्वचा काहीशी ओलसर असते, अशावेळी त्वचेवर मॉइश्चरायझर लावावे. पण त्वचा पूर्णपणे कोरडी झाल्यानंतर मॉइश्चरायझर लावल्यास त्वचेमधील ओलावा जास्तकाळ टिकून राहत नाही. ज्यामुळे त्वचा पुन्हा एकदा कोरडी होते.
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरात ओलावा कायम टिकून राहतो. पण तुम्ही पुरेसे पाणी पित नसाल तर तुम्ही शरीरात अनेक बदल दिसून येतील. यामुळे त्वचा अतिशय कोरडी होऊन जाते. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर त्वचेवर गंभीर परिणाम दिसून येतात. यामुळे मॉईश्चरायझर लावून सुद्धा त्वचा सुंदर आणि हायड्रेट दिसत नाही.
भात खाल्याने आरोग्य बिघडतंं का ? भात कोणी आणि किती खावा, काय सांगतात आरोग्यतज्ज्ञ ?
चुकीच्या मॉइश्चरायझरची निवड करणे:
स्किन केअर रुटीन फॉलो करताना चेहऱ्याला सूट होईल अशाच स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करावा. चुकीच्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे, डाग येणे, वांग इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. क्रीम-बेस्ड, जेल-बेस्ड किंवा लोशन इत्यादी प्रकारातील स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करावा.