
यामी गौतमी नितळदार आणि सुंदर त्वचेसाठी फॉलो करते आजीने सांगितलेला पारंपरिक घरगुती उपाय
बॉलिवूडमधील सर्वच अभिनेत्री त्यांच्या अभिनयामुळे जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहेत. त्यातील फेमस अभिनेत्रींच्या यादीतील चर्चेतील नाव म्हणजे यामी गौतम. अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी महागड्या ब्यूटी प्रॉडक्ट्सची आणि ट्रीटमेंटची मदत घेतात. यामुळे त्वचा कायमच चमकदार आणि सुंदर गोरीपान राहते. यामीच्या चेहऱ्यावरील निखळ सौंदर्य साऱ्यांचे खूप जास्त आवडते. तिची त्वचा मुलायम आणि चमकदार आहे. यामी तिच्या त्वचेवरील सौंदर्य कायम टिकवून ठेवण्यासाठी बाजारातील महागड्या प्रॉडक्टचा वापर न करता तिच्या आजीने सांगितलेला पारंपरिक घरगुती उपाय करते. यामुळे चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि मुरुमांचे डाग कमी होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अभिनेत्री यामी गौतमच्या सुंदर त्वचेचे रहस्य सांगणार आहोत. हा घरगुती उपाय केल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एकही पिंपल्स किंवा मुरुमांचा डाग नाही.(फोटो सौजन्य – pinterest)
त्वचेमधील ओलावा आणि नैसर्गिक सौंदर्य कायम टिकवून ठेवण्यासाठी हल्ली सर्वच महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन ट्रीटमेंट, ब्युटी प्रॉडक्ट, स्किन केअर, डाएट, सप्लिमेंट्स इत्यादी अनेक गोष्टी करतात. यामुळे काही काळापुरती त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार दिसते. मात्र कालांतराने पुन्हा एकदा त्वचेच्या समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी कायमच घरगुती उपाय करावेत. स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर केल्यामुळे त्वचा अधिक सुंदर राहते.
यामी गौतम स्किन टोनिंगसाठी नारळ पाण्याचे सेवन करते. नारळ पाण्याच्या सेवनामुळे त्वचा हायड्रेट होते. याशिवाय त्वचेमधील विषारी घटक बाहेर पडून जातात.त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा नारळ पाण्याचे सेवन करावे. नारळ पाण्याच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. सुरकुत्या, त्वचेवरील डाग, पिंपल्स यांसारख्या अनेक समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी नारळ पाणी प्यावे. सकाळी उपाशी पोटी नियमित नारळ पाणी प्यायल्यास त्वचा सुंदर आणि मुलायम राहते.
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना हळदीचा वापर केला जातो. यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स, मुरूम आणि त्वचेच्या इतर समस्या कमी होतात. यासाठी वाटीमध्ये हळद, साखर आणि थोडस गुलाब पाणी घालून पेस्ट बनवा. तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून टाका. हा उपाय आठवडाभर नियमित केल्यास चेहऱ्यावर चमकदार ग्लो येईल.
जाड आयब्रो मिळवा! घरच्या घरी करा हे सोपे उपाय, परिणाम दिसतील फक्त 15 दिवसांत
सकाळी उठल्यानतंर उपाशी पोटी तुपाचे पाणी प्यायल्यास शरीरातील घाण बाहेर पडून जाईल. एक ग्लास कोमट पाण्यात एक ते दोन चमचे तूप टाकून प्यायल्यास आतड्यांमध्ये चिटकून राहिलेला विषारी मल बाहेर पडून जाईल. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे चेहऱ्यावर पिंपल्स किंवा वारंवार मुरूम येतात. तूपातील नैसर्गिक फॅटी अॅसिड ओठांना पोषण देते. याशिवाय केस कायमच मजबूत आणि निरोगी राहण्यासाठी नियमित एक आवळा खावा.