योगामुळे प्रजननक्षमता वाढते
आजच्या काळात प्रजनन क्षमता ही एक मोठी समस्या आहे. विशेष म्हणजे पुरुष आणि महिला दोघांमध्येही ते वेगाने वाढत आहे. जर तुम्हालाही याचा त्रास होत असेल आणि त्यामुळे तुमचे पालक होण्याचे स्वप्न पूर्ण होत नसेल तर योग हा एक सुरक्षित आणि प्रभावी मार्ग असू शकतो. येथे काही योगासने आहेत जी गर्भधारणेची शक्यता वाढवू शकतात.
योग केवळ आपल्या शरीरासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी नाही तर अगदी गर्भधारणेसाठीही उत्तम ठरतो. तुम्हाला निरोगी गरोदरपणा हवा असेल आणि बाळ लवकर कन्सिव्ह करायचे असेल तर त्यासाठी योगाचे काही योगासन तुम्हाला फायदेशीर ठरतील. यासाठी नक्की कोणते योग करावेत यासाठी योग प्रशिक्षक दीक्षा दाभोळकर यांनी सांगितले आहे (फोटो सौजन्य – iStock)
प्रजननक्षमतेसाठी सेतुबंधासन
प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी हे सर्वोत्तम योगासन आहे. हे पुनरुत्पादक अवयवांमध्ये रक्त प्रवाह वाढवते आणि प्रजनन समस्या दूर करते. सेतुबंधासन हे तणाव, नैराश्य आणि थकवा कमी करण्यासाठीदेखील प्रभावी मानले जाते. योगामधील हे सेतुबंधनासन गर्भधारणेसाठी उत्तम ठरते. नियमित तुम्ही सेतुबंधासन करावे
सेतू बंधासन कसे करावे
शारीरिक संबंधानंतर पडून राहिल्याने लवकर Conceive होते बाळ, काय आहे तथ्य?
पश्चिमोत्तानासन करताना काय करावे
पश्चिमोत्तानासन स्नायूंना ताण देते. या आसनाचा सराव केल्याने प्रजनन क्षमता सुधारू शकते. ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी हे प्रभावी आहे. असे म्हणता येईल की हे एक योगासने आहे जे पुरुष आणि महिलांना वंध्यत्वाच्या समस्येपासून मुक्तता मिळविण्यास मदत करते. हे करणं अत्यंत सोपं आहे मात्र तुम्ही याचा वापर प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली करावे
कसे करावे
तुमचा पाठीचा कणा सरळ ठेवून, “दंडासन” मध्ये बसा, म्हणजेच दोन्ही पाय सरळ पुढे पसरवा, बोटे तुमच्या दिशेने निर्देशित करा, खांदे आरामशीर करा आणि हात मांड्यांवर ठेवा. आता श्वास घेताना हळूहळू हात वर करा आणि तो तुमच्या डोक्यावर आणि पाठीच्या कण्यावर पसरवा.
बटरफ्लाय करताना काय करावे
बालासनाप्रमाणे, बटरफ्लाय आसनदेखील प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी ओळखले जाते. हे आसन प्रसूतीदरम्यान होणारा त्रास कमी करण्यासाठीदेखील प्रभावी आहे. त्यामुळे शरीरात लवचिकतादेखील येते. बटरफ्लाय योगा करणं अत्यंत सोपं आहे. तसंच हा योग तुम्ही रोजच्या रोज करू शकता आणि आपले शरीर हेल्दी ठेऊ शकता
कसे करावे
बटरफ्लाय पोझ करण्यासाठी, तुमचे दोन्ही पाय समोर सरळ करून बसा आणि तुमचा पाठीचा कणा सरळ ठेवा. आता तुमचे पाय वाकवा आणि तुमच्या हाताच्या बोटांना तुमच्या पायाच्या बोटांवर आणा आणि त्यांना एकत्र जोडा. या दरम्यान, तुमच्या टाचा शरीराच्या जवळ असाव्यात. सामान्यपणे श्वास घेत असताना, दोन्ही पाय एकत्र वर उचला आणि नंतर खाली आणा.
नियमित योगा करताना चुकूनही करू नका ‘या’ चुका, संपूर्ण शरीरावर दिसून येतील गंभीर परिणाम
बालासन करण्यासाठी काय करावे
बालासन हे प्रजनन समस्या सोडवण्यासाठी ओळखले जाते. याचा नियमित सराव केल्याने आपल्या शरीरातील रक्तप्रवाह वाढतो आणि शरीराला फायदे मिळतात. प्रजनन क्षमता वाढवण्यासोबतच, हे आसन पाठ, गुडघे, कंबर आणि मांड्यादेखील मजबूत करते. बालासन करताना तुम्ही प्रशिक्षकांची मदत घ्यावी
कसे करावे
तुमचे तळवे जमिनीला स्पर्श करेपर्यंत. यानंतर, या आसनात आल्यानंतर, तुमचे डोके जमिनीवर ठेवा आणि शरीर मोकळे सोडा आणि आराम करा. श्वास घ्या आणि बाहेर काढा. श्वास घेताना आणि सोडताना घाई करू नका.
ही चार योगासनं तुम्हाला बाळ लवकर कन्सिव्ह करण्यास मदत करतील आणि याशिवाय पुरूष आणि महिलांची प्रजननक्षमता यामुळे वाढण्यास मदत होईल.