बाळ होण्यासाठी काय दिला तज्ज्ञांनी सल्ला
लग्नाला 6 महिने होतील न होतील तोपर्यंत सगळीकडून ‘आता Good News कधी?’ या प्रश्नाचा दबाव येऊ लागतो. आता काही अंशी वातावरणात बदल झाला असला तरीही प्रश्न हा असतोच. आपल्या सोयीनुसार आणि विचारनुसार हल्ली जोडपी बाळाला जन्म देण्याचा विचार करताना दिसतात. मात्र हल्ली लग्न ही वयाच्या तिशीनंतर होत असल्यामुळे अनेकांना वंध्यत्वाच्या समस्या येतात तर काही महिलांना अंडाशयाचा त्रास होत असतो असे अनेक प्रॉब्लेम्स असल्याचे दिसून येतात. काही महिला या अनेक प्रयत्नानंतरही आई लवकर होऊ शकत नाहीत.
अशावेळी घरातून आणि मित्रमैत्रिणींकडूनही अनेक सल्ले देण्यात येतात. मात्र याबाबत काही तथ्य आहेत तर काही Myths आहेत. तुम्ही जर प्रेग्नेन्सीची योजना आखत असाल अर्थात तुम्हाला गरोदर राहयचे असेल तर स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. श्वेता पाटील यांनी काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत आणि त्याशिवाय सत्यता पडताळून सांगितली आहे (फोटो सौजन्य – iStock)
काय आहेत मिथक
गर्भवती होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर सगळीकडे अगदी गुगलपासून खूपच माहिती आहे. यामध्ये शारीरिक संबंध ठेवल्यानंतर तुम्ही जास्त वेळ पडून राहायला हवे, महिलांना शारीरिक संबंधांनंतर आपले पाय वर करावेत, दारू पिऊ नये, प्रसवपूर्व विटामिन्स खावे तसंच शारीरिक संबंध ठेवतानाही एका विशिष्ट पोझिशनमध्येच ठेवावे आणि शारीरिक संबंधांनंतर लघ्वी करू नये अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात. पण यापैकी नक्की खरं काय आणि खोटं काय याबाबत आपण जाणून घेणे आणि त्यानुसार बाळासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
हेदेखील वाचा – सकाळीच शारीरिक संबंध ठेवाल तर मिळतील कमालीचे फायदे, रिसर्चमध्ये खुलासा
शारीरिक संबंधांनंतर पडून राहावे?
शारीरिक संबंधानंतर पडून राहणे योग्य की अयोग्य
या मुद्द्यावर आपण सर्वप्रथम येऊ. शारीरिक संबंधांनंतर पडून राहिल्यानंतर त्वरीत बाळ कन्सिव्ह होण्याची शक्यता असते याचा आतापर्यंत कोणताही पुरावा नाहीये. हेलसिंकीध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, सहभागी झालेल्या व्यक्तींनी सांगितले की ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामुळे वीर्य अर्थात Sperm हे सरळ गर्भाशयात इजेक्ट होतात त्यामुळे 15 मिनिट्स आराम करावा. अभ्यासात सांगण्यात आले की 32% महिला ज्या पडून राहिल्या त्यांचा गर्भ राहिल्या आणि 40% महिला ज्या शारीरिक संबंधांनंतर लगेच उठल्या त्यादेखील गरोदर राहिल्या. त्यामुळे हा आकडा काहीतरी वेगळेच दर्शवतो.
कोणत्याही पद्धतीचा वापर करून शुक्राणूंना फॅलोपियन ट्यूबपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 2 मिनिटे लागतात. याचा अर्थ असा की तुम्ही इतर कोणतीही गोष्ट करायच्या आधी शुक्राणू अंतिम रेषेच्या जवळ येतात.
समागमानंतर किती वेळ पडावे?
साधारण किती वेळ पडावे
शारीरिक संबंधानंतर पडून राहण्याचे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नसले तरी यामुळे कोणतेही नुकसान होत नाही हेदेखील खरं आहे. त्यामुळे किती वेळ प्रतीक्षा करावी? असा प्रश्न असेल तर आपण उठण्यापूर्वी 15 मिनिटे थांबावे. तुमच्या जोडीदाराचे स्खलन झाल्यानंतर 2-10 मिनिटांच्या आत शुक्राणू फॅलोपियन ट्यूबमध्ये पोहोचू शकतात तर या प्रक्रियेला सरासरी 5 मिनिटे लागतात हेदेखील लक्षात घ्या.
हेदेखील वाचा – वयानुसार दर महिन्यात किती वेळा ठेवावे शारीरिक संबंध? धक्कादायक आकडे अहवालातून समोर
गरोदर राहण्याची योग्य वेळ?
स्त्री कधी गरोदर राहू शकते
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, महिलांनी त्यांच्या ओव्ह्युलेशन पिरियडदरम्यान शारीरिक संबंध ठेवायला हवेत. हा काळ म्हणजे ओव्ह्युलेशनचा दिवस आणि त्याच्याही 3-5 दिवस आधीचा काळ असतो. ओव्ह्युलेशनच्या 12-24 तासांमध्ये गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असते, त्यामुळे ओव्ह्युलेशनच्या आधीच शारीरीक संबंध ठेवावेत. इतकंच नाही तर स्पर्म्स हे गर्भाशयात साधारण 5 दिवस टिकून राहतात, त्यामुळे ही संभावना वाढते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.