नियमित योगा करताना चुकूनही करू नका 'या' चुका
निरोगी आरोग्यासाठी सकाळी उठल्यानंतर किंवा वेळ मिळेल तेव्हा योगासने, प्राणायाम करणे आवश्यक आहे. यामुळे शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतात. नियमित योगासने केल्यामुळे हाडांचे आरोग्य निरोगी राहते, त्वचा सुधारते, शरीराचा रक्तप्रवाह सुधारतो इत्यादी अनेक फायदे शरीराला होतात. त्यामुळे नियमित सकाळी उठल्यानंतर योगासने किंवा प्राणायाम करावे. मात्र अनेकदा काही लोक योगासने करताना बऱ्याच चुका करतात. चुकीची योगासने केल्यामुळे शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे योगा करताना आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आज आम्हीबी तुम्हाला योगासने करताना कोणत्या चुका करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या चुका केल्यास शरीरातील हाडांचे आणि इतर अवयवांचे नुकसान होऊ शकते.(फोटो सौजन्य – iStock)
योगासने करताना सांध्यांवर जास्त भार देऊ नये. कारण शरीराचे स्नायू अतिशय लवचिक असतात. गुडघ्यांच्या सांध्याला आधार देण्यासाठी आणि गुडघ्यांची झीज टाळण्यासाठी पायांना लॉक करण्याऐवजी मऊपणा ठेवणे महत्वाचे आहे. त्यामुळे योगासने करताना स्वतःच्या आरोग्याची योग्य काळजी घेत योगा करावा. योगा करायला जाताना योग गुरूंच्या सल्ल्यानेच योगासने करावीत. कारण चुकीच्या योगासनांमुळे शरीरातील स्नायूंना इजा पोहचते.
योगासने करताना शरीरातील हवा खेळती राहील असे कपडे परिधान करावे. त्यामुळे महिलांसह पुरुष देखील योगासने करताना सैल टीशर्ट आणि पॅन्ट घालतात. यामुळे शरीराला कोणताही त्रास होत नाही. टाईट कपडे घातल्यानंतर बऱ्याचदा शरीराला मोकळी हवा मिळत नाही, ज्यामुळे योगासने करताना शरीरातील अवयवांना इजा होऊ शकते.
योगासने. जिम किंवा कोणतेही प्राणायाम करताना वॉर्म अप करणे आवश्यक आहे. पण अनेक लोक घाईगडबडीमध्ये वॉर्म अप न करता योगासने आणि जिम करण्यास सुरुवात करतात. असे केल्यामुळे संपूर्ण शरीर दुखू लागते. वॉर्म अप न केल्यामुळे शरीरातील स्नायू आखडून जातात. याशिवाय शारीरिक हालचाली करताना अनेक समस्या उद्भवू लागतात. वॉर्म अप न केल्यामुळे शरीराला दुखापत होऊ शकते.
जेवल्यानंतर किंवा सकाळी नाश्ता केल्यानंतर योगासने करू नये. कारण जेवल्यानंतर लगेच योगासने केल्यामुळे शरीरातील अन्नपदार्थ लवकर पचन होत नाही. त्यामुळे योगासने केल्यानंतर २ ते ३ तासांनी योगासने करावीत.यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.