
आयुष्यात कधीच होणार नाही Diabetes! दैनंदिन आहारात नियमित करा 'या' पदार्थांचा समावेश
मधुमेहाची लक्षणे?
रक्तातील साखर वाढू नये म्हणून काय खावे?
मधुमेह होण्याची कारणे?
जगभरात मधुमेह आणि इतर गंभीर आजारांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. भारताला मधुमेहाची राजधानी म्हणतात. रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण शरीरासाठी अतिशयब घातक ठरते. यामुळे लहान मोठ्या अवयवांना इजा पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्तात साखरेचे प्रमाण वाढू लागल्यानंतर शरीरात अनेक धोकादायक लक्षणे दिसू लागतात. जीवनशैलीतील बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, मानसिक आरोग्य आणि पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. हल्ली तरुण वयातील मुलामुलींना मधुमेह होतो. हा कधीच न बरा होणारा आजार आहे. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. आज आम्ही तुम्हाला रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी रोजच्या आहारात कोणते पदार्थ खावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. आहारतज्ज्ञांच्या मते, हे पदार्थ शरीरासाठी सुपरफूड मानले जातात.(फोटो सौजन्य – istock)
पापडाची कुरकुरीत चटणी कधी खाल्ली आहे का? मसालेदार अन् झणझणीत रेसिपी नोट करा; आठवडाभर टिकून राहील
मधुमेहाच्या रुग्णांसाठी भेंडी अतिशय फायदेशीर मानली जाते. भेंडीच्या सेवनामुळे आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या दूर होतात. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी भेंडीचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. भेंडी खाल्ल्यामुळे शरीराची इन्सुलिन संवेदनशीलता वाढते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा भेंडीचे सेवन करावे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहील आणि शरीराला फायदे होतील.
आपल्यातील अनेकांना एवोकाडो खायला अजिबात आवडत नाही. कारण या पदार्थाला स्वतःची अशी काहीच चव नसते. पण यामध्ये ‘हेल्दी फॅट्स’ आणि फायबर भरपूर प्रमाणात आढळते. या फळाचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया मंदावते आणि कार्बोहायड्रेट्सचे रूपांतर साखरेत होण्यासाठी जास्त वेळ लागतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते. किमतीने महाग असलेले फळ शरीरासाठी मात्र खूप चांगले आणि पोषक आहे.
सकाळी उठल्यानंतर सगळ्यांचं ग्रीन टी किंवा दुधाचा चहा पिण्याची सवय असते. पण ग्रीन टी चे सेवन केल्यास शरीराला भरपूर फायदे होतील. यामध्ये असलेले घटक रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत करतात. ग्रीन टी मध्ये ‘कॅटेचिन्स’ नावाचे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आढळून येते, ज्यामुळे शरीरातील ग्लुकोज मेटाबॉलिज्म वाढते आणि पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होतो. शरीरातील चरबीचे प्रमाण कमी झाल्यानंतर रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि इन्सुलिनची कार्यक्षमता वाढते.
आतड्यांच्या निरोगी आरोग्यासाठी जवस बियांचे सेवन करावे. जवसाच्या बियांची चटणी नियमित खावी. यामध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते आणि शरीर डिटॉक्स होते. यासोबतच ग्लुकोज लेव्हल स्थिर राहण्यास मदत होते. जवसाचे सेवन केल्याने आंतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांची वाढ होऊन पोटाचे आरोग्य निरोगी राहते.
Ans: जेव्हा स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही किंवा शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही, तेव्हा रक्तातील साखर वाढते. या स्थितीला मधुमेह म्हणतात.
Ans: वारंवार लघवी होणे. खूप तहान लागणे, पाणी प्यायल्यानंतरही.
Ans: हृदयविकार, किडनीचे नुकसान, डोळ्यांचे विकार