
चेहऱ्यावर आलेल्या काळ्या डागांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग जास्वदींच्या फुलांमध्ये मिक्स करा 'हे' पदार्थ, त्वचा होईल देखणी
त्वचेची काळजी घेण्यासाठी कायमच महागड्या केमिकल प्रॉडक्टचा वापर सर्वच महिला करतात. फेस सीरम, फेस मास्क, फेसपॅक, क्लीनअप, फेशिअल इतर वेगवेगळ्या ट्रीटमेंटसुद्धा केल्या जातात. ट्रीटमेंट केल्यानंतर काही दिवस त्वचा अतिशय देखणी आणि सुंदर दिसते. पण पुन्हा एकदा काही दिवसांनंतर चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मोठे फोड येतात आणि त्वचा निस्तेज होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. पण वारंवार महागडे केमिकल प्रॉडक्ट वापरल्यामुळे उतार वयात चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्वचेवर आलेले काळे डाग घालवण्यासाठी जास्वदींच्या फुलात कोणते पदार्थ मिक्स करून फेसपॅक बनवावा, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)
चेहऱ्यावर आलेले काळे डाग घालवण्यासाठी मध खूप जास्त फायदेशीर ठरते. फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, जास्वदींच्या फुलांची बारीक पेस्ट बनवून त्यात मध मिक्स करा. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ब्रशच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर फेसपॅक लावा. फेसपॅक लावून १० ते १५ मिनिटं ठेवल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्या. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा तुम्ही मध घालून तयार केलेला जास्वदींचा फेसपॅक चेहऱ्यावर लावू शकता. मध त्वचेमधील आर्द्रता कायम टिकवून ठेवण्यास मदत करेल.
जास्वदींच्या फुलांमध्ये टीऑक्सिडंट्स, विटामिन सी आणि नैसर्गिक वनस्पती युक्त घटक आढळून येतात. त्यामुळे महागड्या केमिकलचा वापर करण्याऐवजी जास्वदींच्या फुलांचा वापर करावा. यामुळे त्वचा आतून स्वच्छ होते आणि चेहऱ्यावर आलेले काळे डाग कमी होण्यास मदत होते. फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, जास्वदींच्या फुलांची पेस्ट तयार करून त्यात दही मिक्स करा आणि संपूर्ण चेहऱ्यावर तयार केलेला फेसपॅक लावून काहीवेळ तसेच ठेवून द्या. यामुळे त्वचेवर आलेले काळे डाग कमी होण्यास मदत होईल आणि चेहरा अतिशय सुंदर दिसेल.
वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे त्वचा खूप जास्त कोरडी होऊन जाते. अशावेळी त्वचेला पोषण देण्यासाठी कोरफड जेल लावले जाते. जास्वदींच्या फुलांची पेस्ट करून त्यात कोरफड जेल मिक्स करा. तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा आणि थंड पाण्याने त्वचा स्वच्छ करून घ्या. यामुळे त्वचेच्या वाढत्या समस्या कमी होण्यास मदत होते.
Ans: जास्वंदीच्या फुलांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि वनस्पतीजन्य घटक असतात. त्यामुळे त्वचेची निगा राखण्यासाठी त्याचा वापर केला जातो.
Ans: जास्वंदीच्या फुलांची पेस्ट करून त्यात अॅलोव्हेरा जेल मिसळून साधा घरगुती फेसपॅक तयार करता येतो.
Ans: साधारण 10–15 मिनिटे ठेवून कोमट किंवा साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवू शकता.