माल वाहतुकीसाठी मध्य रेल्वे आणि टपाल विभागाची हातमिळवणी

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक गोष्टींची मालवाहतूक करणे कठीण जात आहे. पार्सल पाठविण्यासाठी स्पीड पोस्ट सेवा मोठ्या प्रमाणात लोक वापरत आहेत. तथापि, मोठ्या वजनाच्या असलेल्या

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक गोष्टींची मालवाहतूक करणे कठीण जात आहे. पार्सल पाठविण्यासाठी स्पीड पोस्ट सेवा मोठ्या प्रमाणात लोक वापरत आहेत. तथापि, मोठ्या वजनाच्या असलेल्या या वस्तू, ग्राहकांना बुकिंगसाठी टपाल  ऑफिस कार्यालयामध्ये नेणे अवघड आहे. मध्य रेल्वेमार्फत चालविण्यात येणाऱ्या विशेष पार्सल गाड्या लक्षात घेता मध्य रेल्वे आणि महाराष्ट्र टपाल सर्कलने १५ मे पासून भारतीय टपाल रेल्वे पार्सल सेवा ऑफर करून भारतीय टपाल सेवा व भारतीय रेल्वेने एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला आहे.  

सुरूवातीस, भारतीय टपाल  रेल्वे पार्सल सेवा मुंबई, पुणे आणि नागपूर स्थानकांमध्ये तसेच दरम्यान उपलब्ध होईल आणि नंतर इतर स्थानकांपर्यंत विस्तारित केली जाईल.  भारतीय टपाल सेवा ग्राहकांच्या आवारातून वस्तू घेईल आणि मध्य रेल्वे व टपाल मेल मोटर सेवा द्वारे चालविल्या जाणार्‍या खास पार्सल गाड्यांच्या माध्यमातून गंतव्यस्थानावर वस्तू पोहोचवेल.  प्रायोगिक तत्वावर ९ मे ला  नागपूरच्या हिंगणा येथून घेण्यात आलेल्या मालाची वाहतूक भारतीय टपाल रेल्वे पार्सल सेवा मार्फत केली गेली आणि १० मे रोजी मुंबई येथे पोहोचली.  अशा प्रकारे, प्रवासाचा पहिला आणि शेवटचा टप्पा भारतीय टपाल सेवा कव्हर करेल तर मूळ आणि गंतव्य स्थानक दरम्यान वाहतूक रेल्वेमार्गे करेल. ही सेवा ग्राहकांना किफायतशीर दराने आणि दरवाजापर्यंतच्या सेवा सुविधेसह वाहतुकीचा लाभ घेण्यास सक्षम करेल.  दोन क्विंटल किंवा त्याहून अधिक मोठ्या मालवाहतूकीसाठी ही योजना किफायतशीर असल्याने पोस्टल सेवांमध्ये लॉजिस्टिक विभागात मोठ्या प्रमाणात आणखी विविधता आणण्याचे संकेत दाखवित आहे.   ग्राहकांना सुविधा आणि मूल्ये देण्यासाठी १८५३ मध्ये सुरू झालेल्या भारतीय  रेल्वे आणि १८५४ मध्ये सुरू झालेल्या भारतीय टपाल सेवा एकत्रित येणे विशेष आहे.

अधिक माहितीसाठी ग्राहक – ९३२४६५६१०८ मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकतात किंवा adpsmailmah@gmail.com वर ईमेल करू शकतात.